नि. ३९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१०७५/०८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १८/९/२००८
तक्रार दाखल तारीख : २५/९/२००८
निकाल तारीख : २९/११/२०११
-------------------------------------------
१. श्री बाबूराव कृष्णा खोत
वय वर्ष – सज्ञान, धंदा – सेवानिवृत्त
२. सौ विजया बाबुराव खोत
वय वर्ष – सज्ञान, धंदा – गृहिणी
३. सौ ज्योती दिपक खोत
वय वर्ष – सज्ञान, धंदा – गृहिणी
४. दिपक बाबुराव खोत
वय वर्ष – सज्ञान, धंदा – नोकरी
५. संगिता राजेंद्र कदम
वय वर्ष – सज्ञान, धंदा – गृहिणी
सर्व रा.जयदीप निवास, गांधीनगर,
आष्टा, आष्टा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली
मुख्य शाखा कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
२. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सांगली
उपशाखा आष्टा
३. श्री नामदेवराव गणपती मोहिते, संचालक
चेअरमन रा.गणेश कृपा बंगला, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
४. श्री भुपाळ किसन आळवेकर, संचालक
व्हाईस चेअरमन, हरिपूर, वॉर्ड नं.१, ता.मिरज जि. सांगली
५. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
संचालक, पत्रकारनगर, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
६. श्री अशोक दशरथ मोहिते, संचालक
संचालक, हरिपूर, वॉर्ड नं.४, ता.मिरज जि. सांगली
७. श्री संभाजी तुकाराम पाटील, संचालक
संचालक, किसान चौक, सांगलवाडी,
ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.६/३/२०१० रोजीच्या आदेशान्वये वगळले)
८. राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
संचालक, हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि. सांगली
९. सलीम आब्बास पन्हाळकर, संचालक
संचालक, पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
१०. श्री विजय गंगाराम पाटील, संचालक
संचालक, मुजावर प्लॉट, एस.टी.स्टॅंडजवळ,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.६/३/२०१० रोजीच्या आदेशान्वये वगळले)
११. आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
संचालक, गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडजवळ, सांगली
ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.६/३/२०१० रोजीच्या आदेशान्वये वगळले)
१२. श्री शशिकांत पिराजी पोळ, संचालक
संचालक, प्रशिक चौक, गांवभाग, सांगली .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. पी.एम.मैंदर्गी
जाबदार क्र.१ ते ६, ८, ९ व १२ : म्हणणे नाही.
जाबदार क्र.७, १० व ११ : वगळले
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट व संचय ठेवीअन्वये तसेच बचत खात्यान्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे दामदुप्पट व संचय ठेवीअन्वये तसेच बचत खात्यान्वये रक्कम गुंतविली होती. तक्रारदार यांनी ठेवीची रक्कम मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम अदा केली नाही. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.३ अन्वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ७ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १ ते ६, ८, ९ व १२ यांना नोटीसची बजावणी झालेनंतर ते याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुध्द नो से चा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. ७, १० व ११ यांना मंचाच्या दि. ६/३/१० च्या आदेशानुसार वगळण्यात आले. प्रस्तुतचा तक्रारअर्ज सर्व तक्रारदारांनी एकत्रित दाखल केला आहे. त्याबाबत मंचातर्फे विचारणा केली असता तक्रारदार यांनी सर्व तक्रारदार हे एकत्र कुटुंबातील रहिवाशी असल्याचे शपथपत्र नि.३८ वर दाखल केले. त्यामुळे सर्व तक्रारदार हे एकत्र कुटुंबातील असल्याचे गृहीत धरुन प्रस्तुत तक्रारअर्जाचा निकाल देण्यात येत आहे.
४. तक्रारदारांनी त्यांची रक्कम जाबदार सोसायटीमध्ये गुंतविल्याबाबतच्या ठेवपावत्यांच्या व बचत खात्याच्या पासबुकांच्या प्रती नि.३७ चे यादीने दाखल केली आहे. तक्रारदार यांनी नि.१८ ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्ये सदरचे ठेवपावत्यांवर कोणतेही व्याज मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी दामदुप्पट ठेवपावती क्र.८४५९ अन्वये रक्कम रु.३,५००/- जाबदार यांचेकडे गुंतविल्याचे दिसून येते. सदर ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. सबब सदरचे पावतीवर मुदतीनंतर मिळणारी दामदुप्पट रक्कम मुदत संपलेचे दुसरे दिवशीपासुन म्हणजे दि.३/१/२०११ पासून द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दिनानाथ संचय ठेव पावती क्र.७५६० ची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही. सबब सदरच्या पावतीवरील ठेव रक्कम रु.३,०००/- ठेव ठेवल्या तारखेपासून म्हणजे दि.१०/११/२००३ पासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. तक्रारदार यांनी पावती क्र.७५७७ वरील रकमेची मागणी केली आहे. सदरची रक्कम ही साक्षी राजेंद्र कदम या अज्ञान मुलीचे नावे आहे. तक्रारअर्जामध्ये साक्षी राजेंद्र कदम यांना सामील केले नाही. त्यामुळे सदरची मागणी अमान्य करण्यात येत आहे. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बचत खाते क्र. ५५८/३, ४९३/०३ व ४६८/३ च्या सत्यप्रतींचे व व्याजनिवेदनाचे अवलोकन करता सदरच्या खात्यांमधील शिल्लक रकमा दि.३/६/२००८ पासून व्याजासह मंजूर करण्यात येत आहेत. बचत खाते क्र.५५८/३ मध्ये खात्यावर शिल्लक रक्कम रु.४८,४०८/- दिसून येते तथापि तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये रु.४०,४०८/- ची मागणी केली असल्याने सदरची मागणी मान्य करण्यात येत आहे.
५. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. ३ ते ६, ८, ९ व १२ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
६. तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्कम मिळण्यासाठी या न्यायमंचात धाव घ्यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्यामुळे सदरची मागणी अंशत: मान्य करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.८४५९ मधील मुदती नंतर मिळणारी रक्कम रु.७,०००/- (रुपये सात हजार फक्त) दि.३/१/२०११ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
२. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना ठेव पावती क्र.७५६० मधील रक्कम रु.३,०००/- (रुपये तीन हजार फक्त) दि.१०/११/२००३ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.४९३/३ मधील रक्कम रु.७२,८८८/- (रुपये बहात्तर हजार आठशे अठ्ठयाऐंशी फक्त) दि.३/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.४६८/३ मधील रक्कम रु.२०,९९२/- (रुपये वीस हजार नऊशे ब्यान्नव फक्त) दि.३/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
५. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.५५८/३ मधील रक्कम रु.४०,४०८/- (रुपये चाळीस हजार चारशे आठ फक्त) दि.३/६/२००८ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्याजासह अदा करावी असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
६. यातील जाबदार क्र.१ पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- अदा करावेत.
७. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.१४/१/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २९/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११