नि. २२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१०८/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २९/०४/२०११
तक्रार दाखल तारीख : ०३/०५/२०११
निकाल तारीख : १६/०२/२०१२
-------------------------------------------
१. श्री चंद्रकांत सहदेव बन्ने, मयत
(मंचाच्या दि.१६/२/२०१२ रोजीच्या आदेशान्वये वगळले)
२. सौ जयश्री चंद्रकांत बन्ने
वय वर्ष – सज्ञान, धंदा – घरकाम
कु.कोमल चंद्रकांत बन्ने
वय वर्ष – सज्ञान, धंदा – शिक्षण
सर्व रा.हनुमान नगर, कुपवाड,
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्द
१. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था, सांगली
(मुख्य शाखा) हरीपूर रोड, सांगली
२. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था सांगली
(शाखा विश्रामबाग), विश्रामबाग, सांगली
३. श्री नामदेवराव गणपती मोहिते,
मु.पो. हरीपूर, हरीपूर रोड, ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.८/२/२०१२ रोजीच्या आदेशान्वये वगळले)
४. श्री अशोक दशरथ मोहिते,
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
५. श्री गणपतराव शामराव पाचुंदे,
साईनाथ आटोमोबाईल्स, कोल्हापूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
६. श्री सुखदेव सिताराम मोहिते
मु.पो.सांगलीवाडी, समडोळी रस्ता,
मोहिते गल्ली, सांगलीवाडी
(मंचाच्या दि.८/२/२०१२ रोजीच्या आदेशान्वये वगळले)
७. श्री सलीम आब्बास पन्हाळकर,
पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड,
सांगली, ता.मिरज जि. सांगली
८. श्री गजानन हरी फाकडे,
मु.पो. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
९. श्री शंकर रघुनाथ जगदाळे
मु.पो. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
१०. श्री फत्तेसिंगराव शंकरराव राजेमाने
गोल्डन केमिकल्स, कोल्हापूर रोड,
सांगली ता.मिरज जि. सांगली
११. श्री आण्णासो दुडाप्पा कोरे,
गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडमागे, सांगली
ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या दि.८/२/२०१२ रोजीच्या आदेशान्वये वगळले)
१२. श्री संजय गणपती बावधनकर
२५३/३, खणभाग, सांगली ता.मिरज जि. सांगली
१३. श्री अरुण पिराजी पोळ,
प्रशिक चौक, हरीपूर रोड, सांगली
ता.मिरज जि. सांगली
(मंचाच्या आदेशान्वये वगळले) .....जाबदार
तक्रारदारú तर्फेò : +ìb÷. विद्या हिंगमीरे
जाबदार क्र.१, २, ४, ५, ७ ते १० व १२ : एकतर्फा
जाबदार क्र.३, ६, ११ व १३ : वगळले
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविलेली होती. यापैकी काही ठेवींची मुदत पूर्ण झालेली आहे तर काही ठेवींची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्वये एकूण २२ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. १, २, ४, ५, ७ ते १० व १२ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
३. जाबदार क्र.३, ६ व ११ यांना मंचाच्या दि.८/२/२०१२ रोजीच्या आदेशान्वये वगळले. जाबदार क्र.१३ यांना मंचाच्या नोटीसीची बजावणी झाली अथवा कसे याबाबतचा नोटीस अहवाल प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही. जाबदार क्र.१३ बाबत तक्रारदारांनी योग्य ती तजवीजही केलेली नाही. सबब मंचामार्फत जाबदार क्र.१३ यांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात येवून तसा नि.१ वर आदेश करण्यात आला.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुद्दा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २, ४, ५, ७ ते १० व १२ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
५. प्रस्तुत प्रकरणी दाखल दामदुप्पट ठेवपावत्यांचे प्रतींचे अवलोकन करता काही ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. सबब या ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तसेच ज्या ठेवींच्या मुदती अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत, त्या ठेवींतील गुंतविलेल्या रकमा ठेव ठेवल्याचे तारखेपासून द.सा.द.शे. १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
तक्रारदारांमार्फत नि.१८ वर तक्रारदार क्र.१ मयत झाल्याची पुरशिस दाखल करण्यात आली. त्यावर तक्रारदार क्र.१ चे नाव नि.१ मधून कमी करण्याचे मंचाचे आदेश झाले. त्यानुसार निकालपत्रातील टायटलमधून तक्रारदार क्र.१ यांना वगळणेत आले.
तक्रारअर्जातील टायटलवरुन उर्वरीत तक्रारदार हे एकाच कुटुंबातील असल्याचे दिसून येते. ही बाब ठेवींतील रकमा मंजूर करताना लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.६८२२ व ६८२३ मधील प्रत्येकी रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.२७/३/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.१०२७९ व १०२८० मधील प्रत्येकी रक्कम रु.२५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) दि.१२/१०/२०११ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.८८८९ मधील रक्कम रु.७,०००/- (अक्षरी रुपये सात हजार फक्त) दि.७/११/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.११४२२ मधील रक्कम रु.२५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) दि.३/१२/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
५. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.११४६१ मधील रक्कम रु.५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) दि.२१/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
६. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.११४६२, ११४६३, ११४६४, ११४६५, ११४६६६, ११४६७, ११४६८, ११४६९, ११४७० व ११४७१ मधील प्रत्येकी रक्कम रु.१९,५००/- (अक्षरी रुपये एकोणीस हजार पाचशे फक्त) दि.२१/४/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
७. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना रिकरिंग खाते क्र.५४९ मधील शिल्लक रक्कम रु.४,८००/- (अक्षरी रुपये चार हजार आठशे फक्त) दि.२५/७/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
८. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते पासबुक मधील शिल्लक रक्कम रु.४,८७८/- (अक्षरी रुपये चार हजार आठशे अठ्ठयाहत्तर फक्त) दि.३०/८/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
९. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
१०. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.३१/०३/२०१२ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: १६/०२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.