नि. 22
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.333/2011
-------------------------------------------
तक्रार दाखल तारीख : 03/01/2012
निकाल तारीख : 30/03/2012
-------------------------------------------
1. श्री युनुस हुसेनसाब खलिफा
वय- 43, व्यवसाय- व्यापार,
2. सौ रेहाना युनुस खलिफा
वय 35 वर्ष, धंदा – घरकाम
सर्व रा.मंगलमूर्ती चौक, सांगलीवाडी,
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादत,
प्रधान कार्यालय, कोल्हापूर रोड, सांगली
2. श्री नामदेवराव गणपती मोहिते, चेअरमन
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
गणेश कृपा, हरीपूर रोड, जि. सांगली
3. श्री अरुण पिराजी पोळ, व्हाईस चेअरमन,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
मु.पो.प्रशिक चौक, हरीपूर रोड, सांगली
4. श्री अशोक दशरथ मोहिते, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
मु.पो. हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
5. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
मु.पो.पत्रकारनगर, सांगली.
6. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – पत्रकार,
गणेश कॉलनी, एस.टी.स्टॅंडमागे, कोल्हापूर रोड, सांगली
7. श्री सलीम आब्बास पन्हाळकर, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार,
पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली.
8. श्री शंकर रघुनाथ जगदाळे
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार,
मु.पो. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
9. श्री गजानन हरी फाकडे, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
मु.पो. हरीपूर, ता.मिरज जि. सांगली
10. श्री फत्तेसिंगराव शंकरराव राजेमाने
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – घरकाम,
गोल्डन केमिकल्स, मार्केट यार्ड, सांगली.
11. श्री सुखदेव सिताराम मोहिते,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
मु.पो.सांगलीवाडी, ता.मिरज, जि.सांगली.
12. श्री संजय गणपती बावधनकर, संचालक,
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – शेती,
रा.खणभाग, सांगली. .....जाबदार
तक्रारदारतर्फे अॅड -. श्री.एन.बी.कोळेकर
जाबदार क्र.1 ते 12 : एकतर्फा
नि का ल प त्र
व्दारा- मा. सदस्या- गीता घाटगे
1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी, मुदत ठेवी व बचत खात्याअन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार दिनानाथ नागरी सहकारी पतसंस्था सांगली (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविलेल्या होत्या. यापैकी काही ठेवींची मुदत पूर्ण झालेली आहे तर काही ठेवींची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.4 अन्वये संचालकांची यादी व विषयाधीन ठेवपावत्यांच्या व बचत खात्याच्या पुस्तकाच्या प्रती मंचापुढे दाखल केल्या आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र. 1 ते 12 यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर करण्यात आला.
3. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. 5223/09 सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक 22 डिसेंबर 2010 रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करुन जाबदार क्र.4 ते 12 यांना त्यांचेविरुध्द या न्यायनिवाडयाच्या आधारे कोणतीही कारवाई करता येणार नसल्याने त्यांना प्रस्तुत प्रकरणी फॉर्मल पार्टी केल्याचे नमूद केले आहे व त्यांचेविरुध्द कोणतीही दाद मागावयाची नाही असे कथन केले आहे. या बाबीची दखल घेता रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
4. प्रस्तुत प्रकरणी दाखल दामदुप्पट व मुदत ठेवपावत्यांच्या प्रतींचे अवलोकन करता काही दामदुप्पट ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत असे दिसून येते. सबब ज्या दामदुप्पट ठेवींच्या मुदती पूर्ण झाल्या आहेत त्यातील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तर ज्या दामदुप्पट ठेवींच्या मुदती अपूर्ण आहेत त्यातील गुंतविण्यात आलेल्या रकमा ठेव ठेवल्या तारखेपासून 10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. प्रस्तुत प्रकरणी दाखल मुदत ठेव पावत्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन करता दिसून येते तसेच या ठेवींवर तक्रारदारांना व्याजही प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही सबब मुदत ठेवींतील रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. तक्रारदारांनी मागणी केलेल्या बचत खात्यातील शेवटच्या तारखेस शिल्लक असलेली रक्कम त्या शेवटच्या तारखेपासून 10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
5. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांनी दामदुप्पट ठेवपावती क्र.11145 अन्वये गुंतविलेल्या रकमेची मागणी केली आहे परंतु या ठेवपावतीच्या सत्यप्रतीचे अवलोकन करता सदरहू रक्कम यासीन युनुस खलिफा या नावे गुंतवणेत आलेली आहे. या ठेवपावतीवरती सदरहू नावाव्यतिरिक्त तक्रारदारांपैकी अन्य कोणाचेही नाव नमूद नाही. सदरहू व्यक्तिस तक्रारदार म्हणून तक्रार अर्जात सामिल करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये यासिन युनुस खलिफा यांचे नावे गुंतविण्यात आलेली रक्कम तक्रारदारांना मंजूर करणे अत्यंत चुकीचे ठरेल असे मंचाचे स्पष्ट मत पडते. सबब या ठेवतील रक्कम प्रस्तुत प्रकरणी मंजूर करण्यात येत नाही. मात्र योग्य त्या तक्रारदारास सामिल करुन या ठेवीतील रकमेबाबत दाद मागणेची मुभा तक्रारदारांना देण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
1. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.9104 मधील रक्कम रु.27,000/- (अक्षरी रुपये सत्तावीस हजार फक्त) दि.07/09/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
2. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.9302 मधील रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) दि.14/11/2009 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
3. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.10078 व क्र.10079 मधील प्रत्येकी रक्कम रु.45,000/- (अक्षरी रुपये पंचेचाळीस हजार फक्त) दि.04/03/2011 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
4. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.10060 मधील रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.25/07/2011 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
5. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्या क्र.50283 व क्र.50282 मधील प्रत्येकी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) दि.16/10/2007 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.7 टक्के व्याजदराने अदा करावी.
6. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना बचत खाते क्र.2759 मधील रक्कम रु.2,550/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे पन्नास फक्त) दि.08/12/2011 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने अदा करावी.
7. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
8. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.14/05/2012 पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक– 30/03/2012.
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.