नि.नं. ४५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१७२/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – ०९/१०/२००९
तक्रार दाखल तारीखः – २४/१०/२००९
निकाल तारीखः - ३०/०७/२०११
----------------------------------------------
सौ कलावती बबन पवार
उ.व.४५, धंदा – घरकाम
रा.वृंदावन कॉलनी, एस्टीडेपो समोर,
तासगाव, ता.तासगाव जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सांगली
शाखा लोणीबाजार, मिरज
ता.मिरज जि. सांगली
२. चेअरमन, श्री नामदेवराव गणपती मोहिते
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.गणेशकृपा बंगला, हरिपूर रोड,
सांगली
३. व्हा.चेअरमन, श्री भूपाल किसन आढवेकर
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.हरिपूर, वॉर्ड न.१, ता.मिरज जि. सांगली
(मे.मंचाचे नि.१ वरील दि.१४/२/११ चे आदेशानुसार वगळण्यात आले)
४. संचालक, श्री गणपतराव शामराव पाचुंदे
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.पत्रकार नगर, कोल्हापूर रोड, सांगली
५. संचालक, अशोकराव दशरथ मोहिते
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.हरिपूर, वॉर्ड नं.४, ता.मिरज जि. सांगली
६. संचालक, श्री राजाराम मारुती सुर्यवंशी
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि.सांगली
७. संचालक, श्री सलिम आब्बास पन्हाळकर
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
८. संचालक, श्री राजकुमार सदोरामल चुहा
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिशजवळ,
ता.मिरज जि. सांगली
९. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.गणेश कॉलनी, एस्टीस्टॅंडजवळ, सांगली
१०. संचालिका, श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील
उ.व.सज्ञान, धंदा – शेती
रा.एस्टी कामगार भवनजवळ, भोसले प्लॉट, सांगली
११. संचालिका, श्रीमती वंदना कांबळे बावधनकर,
उ.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि.सांगली
१२. संचालिका, सौ सुवर्णा गजानन काकडे
उ.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.हरिपूर, वॉर्ड नं.२, ता.मिरज जि.सांगली
१३. संचालिका सौ शशिकला अरुण पोल
उ.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.प्रशिक चौक, गांवभाग सांगली जि.सांगली
१४. संचालिका सौ आक्काताई विजय पाटील
उ.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.मुजावर प्लॉट, एस.टी.स्टॅंडजवळ,
सांगली जि.सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. सौ श्रुती खरे
जाबदार क्र.१, ४ ते ७ व ९ ते १४ – एकतर्फा
जाबदार क्र.२ व ८ – नो से
जाबदार क्र.३ – वगळले.
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेल्या रकमा परत दिल्या नाहीत म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार दिनानाथ भोसले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सांगली, शाखा लोणीबाजार, मिरज (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्या होत्या. यातील सर्व ठेवींच्या मुदती पूर्ण झालेल्या आहेत. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमांची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रकमा देवविण्यात याव्यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ५ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. १, ४ ते ७ व ९ ते १४ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. जाबदार क्र.८ हे मंचाच्या नोटीशीची बजावणी झाल्यावर ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्यांनी नि.३५ अन्वये प्रस्तुत प्रकरणी त्यांना जबाबदार धरण्यात येवू नये अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. या अर्जावर जाबदारांनी प्रतिज्ञापत्रासह म्हणणे दाखल करावे अन्यथा पुढील आदेश करण्यात येतील असा आदेश करण्यात आला. सदरहू आदेश जाबदार क्र.८ चे वतीने अधिकारपत्र धारक यांनी वाचला व तशी सही केली. परंतु त्यानंतर त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नि.१ वर नो से आदेश करण्यात आला. तसेच जाबदार क्र.२ हे मंचाच्या नोटीशीची बजावणी झाल्यावर ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द नि.१ वर नो से आदेश करण्यात आला. जाबदार क्र.३ हे मयत झालेने प्रस्तुत प्रकरणातून त्यांचे नाव नि.१ वरील आदेशानुसार वगळण्यात आले.
४. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ व ४ ते १४ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थाने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थामध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
५. प्रस्तुत प्रकरणी दाखल ठेवपावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन करता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्या रकमांवर कोणतेही व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. सर्व ठेवींच्या मुदतीही पूर्ण झालेल्या आहेत, सबब ठेवीतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत संपल्याच्या दुस-या दिवशीपासून १० टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहेत. हे व्याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.८६४२ मधील रक्कम रु.२४,०००/- (चोवीस हजार फक्त) दि.२२/७/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.६७७४(ए) मधील रक्कम रु.३०,०००/- (तीस हजार फक्त) दि.१२/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
३. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.६७९८ मधील रक्कम रु.२५,०००/- (पंचवीस हजार फक्त) दि.२७/१२/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के व्याजदराने अदा करावी.
४. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.१५/९/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: ३०/०७/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११