नि. 27
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 262/2011
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 14/09/2011
तक्रार दाखल तारीख : 15/10/2011
निकाल तारीख : 16/03/2013
-----------------------------------------------------------------
1. श्री चिंतामणी शिवराम पटवर्धन
वय वर्षे – 67, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा.राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, शिवनेरी चौक, ब्राम्हणपुरी,
मिरज 416 410 जि.सांगली
2. श्री श्रीरंग चिंतामणी पटवर्धन
वय वर्षे – 29, व्यवसाय – शिक्षण
रा.राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, शिवनेरी चौक, ब्राम्हणपुरी,
मिरज 416 410 जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित,
कोल्हापूर रोड, सांगली 416 416
तत्कालीन संचालक मंडळ
2. श्री सुरेश दिनानाथ भोसले, व्हा.चेअरमन
रा.शिवशक्ती भोसले प्लॉट, कोल्हापूर रोड, सांगली
3. श्री भूपाल किसन आळवेकर, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
4. श्री संभाजी तुकाराम पाटील, संचालक
रा.किसान चौक, सांगलवाडी, सांगली
5. श्री राजाराम मारुती सुर्यवंशी, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
6. श्री तुकाराम जोती बोंद्रे, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
9. श्री सुहास राजाराम भोसले, संचालक
रा.शंभुप्रसाद, कोल्हापूर रोड, सांगली
10. श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील, संचालिका
रा.वसंतदादा क्रिडांगण मंडळाजवळ, कोल्हापूर रोड,
सांगली
11. सौ यशोदा मुकुंद बावधनकर, संचालिका
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
विद्यमान संचालक मंडळ
12. श्री नामदेवराव गणपती मोहिते, संचालक
रा.गणेश कृपा, मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
13. श्री अशोकराव दशरथ मोहिते, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
14. श्री गणपतराव शामराव पाचुंदे, संचालक
रा.साईनाथ ऑटोमोबाईल्स, कोल्हापूर रोड, सांगली
15. श्री सुखदेव सिताराम मोहिते, संचालक
रा. मोहिते गल्ली, समडोळी रस्ता, सांगलवाडी, सांगली
16. श्री सलीम अब्बास पन्हाळकर, संचालक
रा.पन्हाळकर बिल्डींग, कोल्हापूर रोड, सांगली
17. श्री गजानन हरी फाकडे, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
18. श्री शंकर रघुनाथ जगदाळे, संचालक
मु.पो.हरिपूर, ता.मिरज जि. सांगली
19. श्री फत्तेसिंगराव शंकरराव राजेमाने, संचालक
रा.गोल्डन केमिकल्स, कोल्हापूर रोड, सांगली
20. श्री आण्णासो दुंडाप्पा कोरे, संचालक
रा.गणेश कॉलनी, एस.टी.स्टँडचे मागे, सांगली
21. श्री संजय गणपती बावधनकर, संचालक
रा.253/3, खणभाग, सांगली
22. श्री अरुण पिराजी पोळ, संचालक
रा.प्रशिक चौक, हरीपूर रोड, सांगली ..... जाबदार
तक्रारदार : स्वतः
जाबदार : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात जाबदार यांचेविरुध्द अशी तक्रार आहे की, जाबदार यांनी गुंतवणूकदारांना जाहीर केलेल्या गुंतवणूकीसंदर्भातील माहितीच्या आधारे तक्रारदाराने सदर पतसंस्थेमध्ये लखपती योजनेमध्ये गुंतवणूक केलेली होती. सदर मुदत ठेव विहीत मुदतीत न मिळाल्याने या मंचासमोर तक्रारअर्ज दाखल केला आहे.
मुदत ठेवींचा तपशील खालीलप्रमाणे -
अ.क्र. | ठेवीदाराचे नाव | ठेवपावती क्र. | रक्कम रु. | मुदत ठेवीची तारीख | कालावधी | व्याजदर % | मॅच्युरिटी तारीख | मॅच्युरिटी रक्कम | व्याजदर |
1 | चिंतामणी शि.पटवर्धन | 3519 | 9000 | 26/10/01 | 15 वर्षे | 17.4 | 26/10/16 | 100000 | |
2 | श्रीरंग चि.पटवर्धन | 3540 | 24000 | 10/11/01 | 106 महिने | 17.6 | 10/9/10 | 100000 | |
3 | श्रीरंग चि.पटवर्धन व चिं.शि.पटवर्धन | 4374 | 12000 | 27/4/02 | 153 महिने | 18.1 | 27/1/15 | 100000 | |
4 | चिं.शि.पटवर्धन व श्रीरंग चि. पटवर्धन | 4375 | 12000 | 27/4/02 | 153 महिने | 18.1 | 27/1/15 | 100000 | |
| | एकूण | 57000 | | | | | | |
वरीलप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे रु.57,000/- (रुपये सत्तावण्ण हजार फक्त) लखपती मुदत ठेवीमध्ये जमा असून सदर रक्कम व्याजासह देण्याची जाबदार यांची जबाबदारी आहे असे त्यांचे म्हणणे आहे. शेवटी त्यांनी रक्कम रु.57,000/- मुदत बंद ठेवीच्या पावतीवर त्या त्या वेळच्या परतफेडीच्या रकमेनुसार व्याजदराची आकारणी अनुक्रमे 17.4 टक्के, 17.6 टक्के, 18.1 टक्के, 18 टक्के प्रमाणे त्यांना रक्कम मिळावी व इतर त्रासापोटी व नुकसानीपोटी रु.20,000/- ची मागणी केली आहे.
2. आपल्या तक्रारीसोबत स्वतःचे शपथपत्र, मुदतबंद ठेवीच्या पावत्या, तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळ यादी, संस्थेला दिलेला मागणी अर्ज, चक्रवाढ व्याजदराचे गणित इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. जाबदार क्र. 1 ते 22 यांनी तक्रार नोटीस मिळून तसेच वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस (नि.16) देवूनही सदर मंचासमोर उपस्थिती दर्शविलेली नाही अथवा तक्रारीसंदर्भात कोणतेही कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाहीत तसेच लेखी म्हणणे मांडलेले नाही. त्यामुळे नि.1 वरील आदेशानुसार त्यांचेविरुध्द एकतर्फा प्रकरण चालविणेत आले.
4. तक्रारदारांची तक्रार व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता व तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमंचापुढे खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत का ? | होय |
2 | जाबदार पतसंस्थेने तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
5. तक्रारदार यांनी स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नांवे जाबदार यांच्या पतसंस्थेमध्ये तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे लखपती मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतविलेले आहेत ही वस्तुस्थिती दाखल ठेवपावत्यांवरुन (नि.4/1) सिध्द होते. या संदर्भात तक्रारदाराने मंचासमोर दाखल केलेल्या तक्रारीबाबत जाबदार संस्थेने अथवा संबंधीत संचालक मंडळाने आपले कोणतेही लेखी म्हणणे न्यायमंचासमोर सादर केलेले नाही. किंबहुना वृत्तपत्रातील जाहीर नोटीसीलासुध्दा त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्यांनी तक्रारदाराची तक्रार आणि वस्तुस्थिती मान्य केल्यासारखे आहे असे मंचाचे ठाम मत झालेले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेली रक्कम जाबदार पतसंस्थेकडून त्यांना देय आहे व जाबदार पतसंस्था ही तक्रारदाराची रक्कम देण्यास बांधील आहे तसेच तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे रक्कम गुंतवणूक करुन पतसंस्थेकडून आर्थिक सेवा घेतलेली असल्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक ठरतात ही बाब निश्चित आहे. मात्र जाबदार यांनी तक्रारदार यांची गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीअंती देणे क्रमप्राप्त असतानाही दिलेली नाही. त्यामुळे जाबदार संस्थेने (जाबदार क्र. 1 ते 22) यांनी सेवेत निश्चितच त्रुटी केल्याचे दिसून येते. जाबदार क्र.1 ते 22 यांना लेखी नोटीस पाठवूनही ते मंचासमोर आले नाहीत. म्हणून तक्रारदाराने वृत्तपत्रामधून नोटीस (नि.16) दिल्यानंतरसुध्दा त्यांनी दखल घेतलेली नाही म्हणून त्यांचे विरोधात नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे.
6. पावती क्र.3519, 4374, 4375 यांची मुदत अद्याप संपलेली नाही. तक्रारदार यांनी जाबदार संस्थेकडे दि.15/4/2011 रोजी पत्र दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र तशी मुदतपूर्व मागणी केल्याचे संस्थेला दिलेले पत्र मंचासमोर त्यांनी सादर केलेले नाही. त्यामुळे सदर पावत्यांच्या रकमेबाबत मंच निर्णय घेऊ शकणार नाही.
7. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सांगली यांनी जाबदार दिनानाथ भोसले सहकारी नागरी पतसंस्था सांगली या पतसंस्थेची सहकार कायदा कलम 88 नुसार चौकशी केलेली आहे व त्याप्रमाणे तक्रारअर्जातील खालील संचालकांवर दोषारोपन करण्यात आले आहे तथा त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
जाबदार क्र.12 - नामदेवराव गणपती मोहिते
जाबदार क्र.4 - संभाजी तुकाराम पाटील
जाबदार क्र.10 - श्रीमती शकुंतला आप्पासो पाटील
जाबदार क्र.13 - अशोकराव दशरथ मोहिते
जाबदार क्र.14 - गणपतराव शामराव पाचुंदे
जाबदार क्र.16 - सलीम अब्बास पन्हाळकर
जाबदार क्र.20 - आण्णासो दुंडाप्पा कोरे
उपरोक्त संचालकांवर प्रत्येकी रु.42,500/- इतक्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन क्र.5223/09 सौ वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी याकामी दि.12 डिसेंबर 2010 प्रमाणे ज्याचेवर महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार दायीत्व निश्चित करण्यात आले आहे, सबब त्यांना तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास जबाबदार धरण्यात येत आहे. उर्वरीत जाबदारांना तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
8. जाबदार क्र. 1 ते 20 मधील उपरोक्त संचालकांवर महाराष्ट्र सहकारी कायद्यातील कलम 88 अन्वये चौकशी होवून संचालकांना जबाबदार धरुन त्यांचेवर दायित्व निश्चित केलेबाबत पुरावा तक्रारदार यांनी नि. 18 वर दाखल केलेला आहे. त्यानुसार जाबदार पतसंस्थेबरोबर दायित्व निश्चित केलेले सर्व संचालक तक्रारदाराची रक्कम देणेस जबाबदार ठरतात असे मंचास वाटते.
9. जाबदार संस्था व जाबदार क्र. 1 ते 20 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत निश्चितच त्रुटी केल्याचे दिसून येते. या प्रकरणात आम्ही श्रीमती कलावती व इतर विरुध्द मे. युनायटेड वैश्य को-ऑप. थ्रीफट अॅण्ड क्रेडीट सोसायटी लि. या प्रकरणात मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या 2001 (3) सी.पी.आर. 194 राष्ट्रीय आयोग या निवाडयाचा आधार घेत असून तो निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होतो असे आम्हांस वाटते. सदर निवाडयास मा. राष्ट्रीय आयोगाने असे मत मांडले आहे की,
Para 9 – Society provides facilities in connection with financing and is certainly rendering services to its members and here is a member who avails of such services. When there is a fault on the part of society and itself is not paying the amount of fixed deposit receipts on maturity there is certainly deficiency in service by the society and a complaint lies against society by the member as a complainant.
मा. राष्ट्रीय आयोगानेही ठेवीधारकांना सोसायटीने ठेवीची रक्कम परत न केल्यास ते कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते हे स्पष्ट निर्देशित केले आहे. अशा परिस्थितीत जाबदार संस्था ही तक्रारदार यांच्या ठेवीची रक्कम व्याजासह देण्यास बांधील आहे असे आम्हांस वाटते.
वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1, जाबदार क्र.4, जाबदार क्र.10, जाबदार क्र.12, जाबदार क्र.13, जाबदार क्र.14, जाबदार क्र.16, जाबदार क्र.20 यांनी संयुक्तपणे अथवा वैयक्तिकरित्या पावती क्र.3540 वर तक्रारदाराने लखपती मुदत ठेव योजनेत गुंतवलेल्या रकमेची मॅच्युअर्ड रक्कम रु.1,00,000/- ठेवीची मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे. 8.5 टक्के व्याजदराने तक्रारदारांना परत करण्याचे आदेश देण्यात येत आहे.
3. तक्रारदाराच्या अन्य मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली नसलेने पावती क्र.3519, 4374, 4375 बाबत कोणतेही निर्देश देणेत येत नाहीत.
4. तक्रारदार यांना वर नमूद जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
5. तक्रारदार यांना जाबदार यांनी तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) अदा करावेत.
6. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
7. जाबदार क्र.2, 3, 5, 6, 7, 8, 9, 11, 15, 17, 18, 19, 20 यांचेविरोधात कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाहीत.
सांगली
दि. 16/03/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.