Maharashtra

Dhule

CC/12/3

Kishor uttamrav patil At Post Dagri Ta Amelner distik dhule - Complainant(s)

Versus

dillip Hari Amrut Lokmagal Nagri Shakari Nagri Patshvstaha Dhule - Opp.Party(s)

S y Shimpi

26 Jun 2012

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/3
 
1. Kishor uttamrav patil At Post Dagri Ta Amelner distik dhule
...........Complainant(s)
Versus
1. dillip Hari Amrut Lokmagal Nagri Shakari Nagri Patshvstaha Dhule
2. sudakar Vithal Bokare Carman
Akvira Nagar Nakane road Dhule
3. laxman Zagdu vadile
Lane 6jayjavan Cuk Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. D. D. Madake PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:S y Shimpi, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे



 

तक्रार क्र.०३/१२                                       रजि.तारीखः-२३/०१/१२


 

                                                    निकाल तारीखः-२६/०६/२०१२


 

 


 

१.    किशोर उत्‍तमराव पाटील.


 

२.    सौ.रेखा किशोर पाटील,


 

रा.मु.पो.प्र.डांगरी ता.अमळनेर, जि.जळगांव तर्फे


 

जनरल मुख्‍त्‍यार पत्र धारण करणार


 

श्री.मुरलीधर भाऊराव पाटील,


 

रा.मु.पो.सायने ता.जि.धुळे.                                     .......तक्रारदार


 

      विरुध्‍द


 

कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था, मर्या., धुळे


 

(नोटीसची बजावणी चेअरमन यांचेवर व्‍हावी.)


 

१.    श्री.सुधाकर विठ्ठल भोकरे, चेअरमन,


 

रा.१४, एकविरा नगर, नकाणे रोड, धुळे.


 

२.    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे


 

रा.ग.नं.६, जयजवान चौक, सोनगिरे बिल्‍डींग शेजारी, धुळे.         .......विरुध्‍द पक्ष


 

 


 

 


 

कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्‍यक्ष


 

      सौ.सुधा जैन, सदस्‍या



 

       तक्रारदार तर्फेः-अॅड.एस.वाय.शिंपी


 

             विरुध्‍द पक्ष – एकतर्फा


 

                                         


 

नि का ल प त्र


 

 


 

श्री.डी.डी.मडके, अध्‍यक्षः तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

२.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खात्‍यात रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 

 


 

तक्रार क्र.०३/१२


 

 


 



















































मुदत ठेव पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

ठेव दिनांक

देय रक्‍कम

देय दिनांक

४६१

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६२

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६३

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६४

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६५

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६६

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

२०९९

५०००/-

०५/०२/२००३

१०,०००/-

०५/०८/२००८


 

 


 

 


 















बचत खाते क्रमांक

जमा रक्‍कम

जमा दिनांक

देय रक्‍कम

देय दिनांक

१५१३

६५००/-

२०/०९/२००८

६५००/-

--


 

 


 

३.    तक्रारदार यांनी गुंतवलेल्‍या रकमेची मागणी विरुध्‍द पक्ष पतसंस्‍थेत केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्‍यातील व्‍याजासह होणारी संपुर्ण रक्‍कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्‍या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

४.    विरुध्‍द पक्ष यांना नोटीसीची बजावणी होऊनही ते हजर झाले नाहीत व खुलासाही दाखल केला नाही त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आले आहेत.


 

       


 

५.    तक्रारदार यांची तक्रार यांचा विचार होता तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.



 

मुद्दे                                                                    उत्‍तर


 

 


 

१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय?                                           होय.


 

२. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी


 

   केली आहे काय?                                                       होय.


 

३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?                अंतिम आदेशा प्रमाणे.


 

४. आदेश काय?                                                  खालील प्रमाणे.



 

 


 

तक्रार क्र.०३/१२


 

 


 

विवेचन



 

६.    मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.४/१ ते नि.४/५ वर मुदत ठेव पावती व नि.४/६ वर बचत खात्‍याची झेरॉक्‍स प्रत सादर केलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या मुदत ठेव पावती व बचत खातेची रक्‍कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती व बचत खाते तसेच त्‍यातील रक्‍कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

७.    मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती व बचत खात्‍यात रकमा गुंतवल्‍या होत्‍या ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्‍यात गुंतवलेली रक्‍कम परत करणे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही विरुध्‍द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

८.    मुद्दा क्र.३ - तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खात्‍यातील व्‍याजासह होणारी कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे व विरुध्‍द पक्ष क्र.१ व २ यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

 


 

      As has beenrecorded above, I am of the view that asociety registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision ofConsumer Protection Act is entertain able against the society, the Directors ormembers of the managing committee cannot be held responsible in view of thescheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members ofthe managing committee of the societies responsible, without observing theprocedure prescribed under the Act, would also be against the principles ofco-operation,which is the very foundation of establishment of the co-operativesocieties.


 

 


 

 


 

९.    वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे त्‍यांना वैयक्‍तीकरित्‍या रक्‍कम देण्‍यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष कै.दिलीप हरी


 

तक्रार क्र.०३/१२


 

 


 

अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्‍यामधील व्‍याजासह होणारी रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच रक्‍कम परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या कडून अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.१०००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते.


 

 


 

१०.   मुद्दा क्र.४ - सबब आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.


 

 


 

आ दे श


 

 


 

१.    तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.


 

२.    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्‍या मुदत ठेव पावतीमधील मुदतअंती देय रक्‍कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज तसेच बचत खात्‍यामधील देय रक्‍कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावती  व बचत खात्‍याचा तपशील खालील प्रमाणे.


 



















































मुदत ठेव पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

ठेव दिनांक

देय रक्‍कम

देय दिनांक

४६१

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६२

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६३

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६४

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६५

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

४६६

२०००/-

०५/०२/२००३

४०००/-

०५/०८/२००८

२०९९

५०००/-

०५/०२/२००३

१०,०००/-

०५/०८/२००८


 

 


 

 


 















बचत खाते क्रमांक

जमा रक्‍कम

जमा दिनांक

देय रक्‍कम

देय दिनांक

१५१३

६५००/-

२०/०९/२००८

६५००/-

--


 

 


 

 


 

 


 

 


 

तक्रार क्र.०३/१२


 

 


 

३.    कै.दिलीप हरी अमृते लोकमंगल नागरी सह.पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.


 

४.    वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.


 

 


 

 


 

    


 

 


 

           (सौ.सुधा जैन)                                        (डी.डी.मडके)


 

                 सदस्‍या                                              अध्‍यक्ष


 

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, धुळे



 

 
 
 
[HON'ABLE MR. D. D. Madake]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.