जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –171/2010 तक्रार दाखल तारीख –08/12/2010
दत्तात्रय उर्फ दत्ता पि.मधुकर सोळंके
वय 29 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.निप्पा टाकळी ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
1. प्रो.प्रा.लक्ष्मीनारायण मल्टी सर्व्हीसेस,
जुन्या बस स्टँण्ड जवळ, माजलगांव
ता.माजलगांव जि.बीड .सामनेवाला
2. चिव्हा कस्टर्मर मॅनेजर,
ओनिडा हॉऊस नं.2, महाल इड्रस्टि्रयल इस्टेट,
ऑफ महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पुर्व)
मुंबई 220 093
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.बी.धांडे
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे :-कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांनी सदरची तक्रार सामनेवाला विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
सदर प्रकरणात सामनेवाला क्र.1 यांची नोटीस दि.30.12.2010 रोजीच्या शे-यानुसार सदरील व्यक्ती परदेशात गेलेले आहेत. पाठविणा-यास परत या शे-याने परत आलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नोटीस स्विकारली आहे परंतु ते तक्रारीत हजर झाले नाहीत. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार खुलासा हा दाखल केलेला नाही.
सामनेवाला क्र.1 चे नांवात दिग्विजय डक प्रो.प्रा. लक्ष्मीनारायण मल्टी सर्व्हीसेस यातील दिग्विजय डक कमी करण्या संदर्भात अर्ज दिला त्याप्रमाणे सदरचे नांव कमी करण्यात आले व प्रो.प्रा. लक्ष्मीनारायण मल्टी सर्व्हीसेस जूना बस स्टँण्ड जवळ याप्रमाणे नोटीस पाठविण्यात आली. सदरची नोटीस दूकान बंद झाले आहे. अशी दि.29.04.2011 रोजीच्या शे-याने परत आले. त्यानंतर तक्रारदारांनी गेल्या आठ महिन्यात कोणतीही तजविज केलेली नाही. तक्रारदारांना सदरची तक्रार चालविण्यात स्वारस्य नाही.त्यामुळे सदरची तक्रार काढून टाकणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार काढून टाकण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.