Maharashtra

Nagpur

CC/12/161

Sau. Parvatibai Tryambakrao Tale - Complainant(s)

Versus

Diamond Co-operative Society Ltd., Nagpur Through President Shri Krushnarao Rajaramji Karne - Opp.Party(s)

Adv. J.C.Shukla

24 May 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/161
 
1. Sau. Parvatibai Tryambakrao Tale
Plot No. 9, Telephone Nagar, Dighori,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Diamond Co-operative Society Ltd., Nagpur Through President Shri Krushnarao Rajaramji Karne
440, Om Nagar, Tiranga Chowk,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. J.C.Shukla, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 24/05/2012)
1.           तक्रारकर्तीने सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्तीच्‍या कथनानुसार, तिने गैरअजदाराचे मौजा-दिघोरी, ख.क्र.75/3, भुखंड क्र. 1 व 2, एकूण क्षेत्रफळ 3404 चौ.फु. हा दि.09.12.1982 मध्‍ये खरेदी केला व तेथे गेल्‍या 30 वर्षापासून राहत आहे. सदर अभिन्‍यासातील दक्षिणेस असलेला 15 फुट रुंदीचा रस्‍ता बनविण्‍याची योजना, ना.सु.प्र.ने नाकारल्‍याने वरील भुखंडांना संलग्‍न असलेला 15 फु.रुंद व 80 फु. लांबीचा अतिरिक्‍त भुखंड गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस रु.48,000/- मध्‍ये विकण्‍याचा करार दि.15.02.1999 च्‍या बयानापत्राप्रमाणे केला. त्‍याबाबतची संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्तीने गैरअर्जदारास दिली व त्‍यांनी तशी पावतीही दिली. परंतू विक्रीपत्र करण्‍याबाबत ते टाळाटाळ करु लागले. याबाबत तक्रारकर्तीने कायदेशीर नोटीस गैरअर्जदारास दिला असता त्‍यांनी तो स्विकारण्‍यास नकार दिला, म्‍हणून तक्रारकर्तीने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, 15X20 फु. क्षेत्रफळाचे विक्रीपत्र गैरअर्जदाराने करुन द्यावे, मानसिक त्रासाबद्दल क्षतीपूर्ती व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केल्‍या.
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता, गैरअर्जदारांना ती प्राप्‍त झाली. परंतू नोटीस प्राप्‍त होऊनही, तक्रारकर्ते यांनी हजर होऊन तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केली नाही, म्‍हणून मंचाने दि.27.04.2012 रोजी गैरअर्जदाराविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला. सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्‍याने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच तक्रारीत दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
-निष्‍कर्ष-
 
3.          प्रकरणातील एकंदर वस्‍तूस्थिती, दस्‍तऐवज पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने गैरअजदार यांचे मौजा-दिघोरी, ख.क्र.75/3, भुखंड क्र. 1 व 2, एकूण क्षेत्रफळ 3404 चौ.फु. हा दि.09.12.1982 मध्‍ये खरेदी केला व तेथे गेल्‍या 30 वर्षापासून घर बांधून राहत आहे. भुखंडाजवळची जमिन गैरअर्जदाराने रस्‍त्‍याकरीता राखून ठेवली होती. तक्रारकर्त्‍याच्‍या शपथपत्रावरुन ना.सु.प्र.ने ती योजना नाकारल्‍याने, गैरअर्जदाराने रु.48,000/- ला ती जमिन तक्रारकर्तीला विकण्‍याचा करार केला होता. उभय पक्षात ठरलेल्‍या कराराप्रमाणे तक्रारकर्त्‍याने संपूर्ण रक्‍कम गैरअर्जदारास अदा केलेली दिसून येते. दस्‍तऐवज क्र. 3 वरुन हेही दिसून येते की, गैरअर्जदाराने सदर भुखंडापोटीची संपूर्ण किंमत मिळाल्‍याचे मान्‍य करुन सदर तक्रारकर्तीस इलेक्‍ट्रीक कनेक्‍शन घेण्‍याविषयी कुठलाही आक्षेप नसल्‍याचे प्रमाणपत्र दिलेले दिसून येते. पर्यायाने गैरअर्जदारास सदर भुखंडापोटीची संपूर्ण रक्‍कम मिळाल्‍याचे सिध्‍द होते. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचे म्‍हणणे नाकारण्‍याकरीता मंचासमोर उपस्थित झाले नाही किंवा कुठलाही पूरावा सादर केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍यात तथ्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत मंच येते. एकूण वस्‍तूस्थिती पाहता, गैरअर्जदाराने भुखंडापोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुन तक्रारकर्त्‍याला भुखंडाचे कबजापत्र दिलेले आहे. परंतू भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिलेले नाही ही गैरअर्जदाराचे सेवेतील कमतरता आहे व त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याचे नुकसानीस ते जबाबदार आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारकर्त्‍याला तक्रारीत नमूद 15X20 चौ.       फु. क्षेत्रफळाचे विक्रीपत्र गैरअर्जदाराने करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्तीने  सोसावा.
3)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रासाबद्दल क्षतीपूर्ती म्‍हणून रु.10,000/- व      तक्रारीचा खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.   
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30      दिवसाचे आत करावी.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.