जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २२६/२०११ तक्रार दाखल दिनांक – ०२/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २२/०५/२०१४
श्री. किशोर हिरामण मुजगे
उ.व.-५१ वर्षे, धंदा - शेती
रा.-ग.नं.६ नवभारत चौक ता.जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
१) धुळे जिल्हा कृषी पदविधर शेती उद्योग विकास
सहकारी संस्था मर्या. धुळे, मॅनेजर सो.
- , काका साहेब बर्वे स्मृती, जिल्हाधिकारी
कार्यालय जवळ, जिजामाता हायस्कुल समोर
२) महाबिज, म.व्यवस्थापक सो.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादीत
महाबिज भवन कृषी नगर अकोला ४४४१०४ - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(सामनेवाले नं.१ तर्फे – एकतर्फा)
(सामनेवाले नं.२ तर्फे – अॅड.एस.एम.शिंपी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
- तक्रारदार यांचे थोडक्यात असे म्हणने आहे की, तक्रारदार यांची मौजे धुळे ता.जि. धुळे येथे शेतजमिन आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला नं.२ यांनी निर्माण केलेले बियाणे सामनेवाला नं.१ यांच्याकडून विकत घेतले. सदर बियाणाची तक्रारदार यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरणी केली व सामनेवाले यांच्या सर्व सूचनेप्रमाणे सर्व काळजी घेतली, परंतु बियाणे उगवले नाही. त्यामुळे जिल्हा व्यवस्थापक महा.राज्य बियाणे तथा कृषी विकास अधिकारी, कृती समिती यांच्याकडे शेतीची पाहणी करण्याकरता अर्ज केला. त्यांनी केलेल्या पंचनाम्याप्रमाणे ९०% पर्यंत उगवन झालेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचे अपरिमीत असे नुकसान झोलेले आहे. तक्रारदार यांनी सदर पिक घेणे कामी एकूण खर्च रक्कम रूपये १५,४९५/- केलेला आहे व सोयाबिनचे उत्पन्न सदर शेतजमीनीत रक्कम रूपये १,१४,४००/- चे मिळाले असते. परंतु सदरचे नुकसान झालेले आहे. सामनेवाले यांनी सदोष बियाणे दिले असल्याने सदरचे नुकसान झालेले असल्याने त्यास सामनेवाले जाबाबदार आहे. त्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस पाठविली आहे. परंतु सामनेवाले यांनी नोटीसी प्रमाणे पुर्तता केलेली नाही. म्हणून तक्रारदार यांना सदरचा अर्ज मंचात दाखल करावा लागलेला आहे.
तक्रारदार यांची अशी विनंती आहे की, तक्रारदार यांना उत्पन्न घेण्याकामी आलेला खर्च रूपये १५,४९५/- व उत्पन्नाचे नुकसानीपोटी १,१४,४००/- सामनेवाले यांनी दयावे. तसेच मानसिक त्रासापोटी ४०,०००/- व अर्जाचा खर्च रूपये ५०००/- द्यावा.
- , नि.५ लगद दस्तऐवजांच्या यादीत १ ते १४ कागदपत्र यामध्ये तक्रार अर्ज, पिक पंचनामा, पावती, नोटीस, सातबारा उतारा इत्यादी कागदात्र दाखल केलेले आहे.
- ‘एकतर्फा’ आदेश पारित केलेला आहे.
- , सदर बियाणे हे राज्यस्तरीय यंत्रणेद्वारे प्रमाणीत केलेले असल्याने बियाणात दोष नाही. तक्रारदारच्या तक्रारीनुसार दोन बॅगची उगवण झालेली नाही. यावरून तक्रारादार यांनी बियाणे घेतल्यानंतर ते पेरण्यापूर्वी ज्याठिकाणी ठेवले होते त्याबाबत योग्य दक्षता घेतलेली नाही. सदर बियाणांचे वाण हे पेरणीच्या वेळी आवश्यक ती काळजी घेतलेली नव्हती व नाही. बियाणांची उगवण कमी झालेली असल्यास त्यासाठी उत्पादन कंपनी संपुर्णतः जबाबदार नसते. सदर बियाणे पेरणीच्या वेळी पाउस अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे उगवण शक्तीवर परिणाम झालेला दिसतो. तसेच तक्रारदाराने आवश्यक असलेली रासायनीय प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारच्या चुकीसाठी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब सदर तक्रार अर्ज खर्चासह रदद करण्याची मागणी केलेली आहे.
-
६. तक्रारदार व सामनेवाले यांचे शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाला नं.१ यांच्याकडून सामनेवाला नं.२ यांनी उत्पादीत केलेले सोयाबीण वाणाचे बियाणे खरेदी केले केले, त्याची पावती नि.६ व ७ सोबत दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता तक्रारदार किशोर हिरामण मुजगे यांनी सोयाबीन जेएस ३३५ याचे लॉट क्र.३१८१ चे तीन नग बियाणे रक्कम रूपये २६५५/- या किंमतीस दि.०७/०७/२०११ रोजी खरेदी केले आहे. सदर पावतीचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
- ‘ब’- तक्रारदार यांनी सदर बियाणांचे त्यांच्या शेतामध्ये पेरणी केली परंतु बियाणांची उगवण झालेली नाही त्यामुळे तक्रारदार यांनी जिल्हा व्यवस्थापक महा.राज्य बियाणे यांच्याकडे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदर अर्ज नि.६/१ लगत दाखल केला आहे. सदर अर्ज पाहता, तक्रादार यांनी धुळे जिल्हा कृषी पदविधर शेती उद्योग विकास सहकारी संस्थेकडून खरेदी केलेले सोयाबिन जेएस ३३५ चे ३ बॅग बियाणे विकत घेतले होते. त्यापैकी २ बॅगची उगवण झालेले नाही. त्याबाबत शेताची पाहणी करण्याकरिता अर्ज दिलेला आहे.
सदर अर्जाप्रमाणे त्यावर कार्यवाही होणेकामी धुळे जिल्हा कृषी पदविधर शेती उद्योग विकास सहकारी संस्था यांनीपुढील कार्यवाही करण्याकरतीदि.२०/०७/२०११ रोजी जिल्हा व्यवस्थापक महाबिज, धुळे यांना पत्र दिले आहे. सदर पत्र नि.६/२ लगत दाखल केले आहे. सदर पत्र पाहता या पत्राप्रमाणे तक्रादार शेतक-यांच्या शेतात खरेदी केलेल्या एकूण बॅगपैकी एक बॅग बियाणांची उगवण झालेले आहे व दोन बॅगची उगवण झोलेली नाही अशी शेतक-याच्या तक्रारीनुसार कार्यवाही करण्यात यावी याकामी पत्रव्यवहार करण्यात आलेला दिसत आहे.
सदर अर्जाप्रमाणे जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समीतीने दि.२९/०७/२०११ पिक पंचनामा केलेला आहे. सदर पंचनामा नि.६/३ लगत दाखल आहे. या पंचनाम्याचे अवलोकन केले असता यामध्ये असू नमूद केले आहे की “पिकाचे १x१ मिटर अंतरावर रॅंण्डम पध्दतीने मोजनी केली असता एकूण १०% उगवण झोलेली आढळली त्यामुळे शेतक-यास अपेक्षीत उत्पन्न मिळणार नाही. तसेच उगवण झोलेले १०% सुध्दा वखरावे लागणार असल्याने तक्रारदार शेतक-याचे आर्थिक नुकसान झालेले आहे” असे नमूद केले आहे. या पंचनाम्याप्रमाणे असे दिसते की तक्रारदाराच्या शेतामध्ये सदर बियाणे ६० किलो म्हणजेच २ बॅग पेरणी केलेली असून त्याची केवळ १०% उगवण झोलेली आहे. त्यामुळे शेतक-याचे नुकसान झालेले आहे. एवढे सदर पंचनाम्यात नमूद केलेले आहे. सदर पंचनाम्यामध्ये बियाणांची उगवण का झालेलेी नाही त्याची कारणे, खुलासा नमूद केलेला नाही. तसेच सदर बियाणांमध्ये दोष आहे त्यामुळे बियाणांची उगवण शक्ती कमी असून तक्रादारचे नुकसान झाले असे कोठेही नमूद केलेले नाही. तसेच तक्रारदार यांच्या शेतामध्ये उर्वरीत एक बॅगेतील बियांणांचे उगवण, उत्पादन आले आहे याबाबत कोणताही खुलासा नमूद केलेला नाही. या पंचनाम्याचा विचार करता केवळ तक्रारदार शेतक-याचे नुकसान झाले आहे एवढेच नमूद करण्यात आले असल्याने, त्यामुळे सदर खरेदी केलेल्या बियाणात दोष आहे हे सिध्द होत नाही.
९. सामनेवाले यांनी सदर पंचनामा नाकारला असून त्यांनी बचावात असे नमूद केले आहे की तक्रारदार यांनी बियाणांची पेरणीपूर्वी व पेरणीनंतर काळजी घेतलेली नाही
तक्रादार यांनी सदर खरेदी पावतीप्रमाणे ३ बॅग बियाणांची खरेदी केलेली आहे. त्यापैकी दोन बॅग बियाणांची तक्रारदार यांनी अर्जानुसार तक्रार केलेली आहे. यावरून असे लक्षात येते की तक्रारदार यांना एक बॅग बियांणांचे उत्पन्न मिळालेले आहे. परंतु त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांच्या प्रस्तुत तक्रार अर्जात काहीही उल्लेख केलेला नाही. यावरूर तक्रादार हे स्वच्छ हाताने मंचात आलेले नाही असे दिसते.
तक्रादार यांना एक बॅगचे उत्पन मिळालेले आहे याचा विचार होता तक्रारदार यांनी एकाच वेळी एकाच लॉट नंबरचे ३ बॅग बियाणे खरेदी केलेले असतांना केवळ दोन बॅग बियांनाचे उगवण शक्ती कमी आहे व एक बॅग बियाणांचे उत्पन्न मिळालेले आहे. याचा विचार होता सदर बियाणांचे उगवण शक्ती योग्य आहे असे दिसते. एक बॅग बियाणांची उगवण होवून तक्रारदार यांना उत्पन्न मिळले. यावरून सदर लॉटमधील बियाणामध्ये दोष नाही असे दिसते. तसेच सदर पंचनाम्याप्रमाणे बियाणात दोष आहे हे सिध्द होत नाही सावरून सदर बियाणात दोष नाही असे आमचे मत आहे. यावरून सामनेवाले यांनी सदोष बियाणे देऊन सेवा देण्यात कमतरता केली नाही असे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
- ‘क’ - तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे बियाणे न उगवूण नुकसानभरपाई मिळण्याकामी माहीतीच्या अधिकारात मिळवलेले काही कागदपत्र दाखल केले आहे. या कागदपत्रांमध्ये सामनेवाला यांनी साक्री तालुक्यातील काही शेतक-यांना नुकसान भरपाई दिलेली दिसत आहे. सदर कागदपत्राचा तक्रारदार हे आधार घेवू पाहत आहे. परंतू सदर कागदपत्रांचा विचार करता सामनेवाले यांनी लॉट नं. केएच-२०११ या बियाणांकरता नुकसानभरपाई दिलेली दिसत आहे. यामध्ये तक्रारदार यांनी खेरदी केलेल्या बियाणांचा लॉट नंबर नमूद नाही. त्यामुळे तक्रारदार यांना त्याचा आधार घेता येणार नाही असे आमचे मत आहे. याचा विचार करता सामनेवाले हे तक्रारादार यांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. तक्रारदार यंनी सदर बियाणे दोषपूर्ण आहे हे सिध्द करणे कामी कोणताही इतर पुरावा दाखल केलेला नाही. याचा विचार होता तक्रारदाराची मागणी योग्य व रास्त नाही असे स्पष्ट होते. वरील सर्व कारणांचा विचार करता खालील आदेश पारित केला आहे.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.