Maharashtra

Sangli

CC/11/18

SUBHASH GANAPATI JADHAV AND OTHERS - Complainant(s)

Versus

DHTINAYH NAGARI SAHAKARI PATSANSHTA MARYADIT AND OTHERS - Opp.Party(s)

16 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/18
 
1. SUBHASH GANAPATI JADHAV AND OTHERS
SHRIKRISHNA, BEHIND JANATA HIGHSCHOOL, MAHADEONAGAR, ISLAMPUR TAL WALWA. DIST SANGLI
...........Complainant(s)
Versus
1. DHTINAYH NAGARI SAHAKARI PATSANSHTA MARYADIT AND OTHERS
GARDI, TAL KHANAPUR, T DIST SANGLI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                            नि. ४४
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर                                          
                                                               मा.अध्‍यक्ष : श्री.अनिल य.गोडसे    
                                         मा.सदस्‍या :  श्रीमती सुरेखा बिचकर 
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१८/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख     :  १३/०१/२०११
तक्रार दाखल तारीख  :  २०/०१/२०११
निकाल तारीख            १/०३/२०१२
-----------------------------------------------------------
 
१. श्री सुभाष गणपती जाधव
    वय ५४ वर्षे, व्‍यवसाय रिटायर
२. सौ सुजाता सुभाष जाधव
    वय ४९ वर्षे, व्‍यवसाय घरकाम
    दोघे रा. श्रीकृष्‍ण, जनता हायस्‍कूलचे मागे
    महादेवनगर, इस्‍लामपूर-४१५ ४०९
    ता.वाळवा जि.सांगली                                      ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. गार्डी
    ता.खानापूर जि. सांगली तर्फे सेक्रेटरी
२. विकास दिनकरराव माने
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    प्रगती झेरॉक्‍सच्‍या पाठीमागे, स्‍टॅंड रोड,
    कोर्टाशेजारी, विटा, ता.खानापूर, जि. सांगली
३. श्री बाळासो दत्‍तू बाबर
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
४. प्रवीण बाबुराव बाबर
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
५. विक्रम अश्विनकुमार लकडे
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.लकडे प्‍लाझा, विटा मायणी रोड, पेट्रोल पंपासमोर,
    विटा, ता.खानापूर, जि.सांगली
६. धनपाल नारायण माने,
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.ड्रीमलॅन्‍ड हॉटेलखाली, स्‍टॅंड रोड,
    विटा ता.खानापूर, जि.सांगली
७. सुशांत कृष्‍णराव देवकर
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.सांगोले, ता.खानापूर, जि.सांगली
८. अमोल अनिलराव बाबर
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
९. जगन्‍नाथ मारुती सुर्वे,
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    महालक्ष्‍मी ज्‍वेलर्स, पावर हाऊस रोड,
    विटा, ता.खानापूर, जि.सांगली
१०. जयंत मारुती कदम
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.घातवड, ता.खानापूर, जि.सांगली
११. धोंडीराम तुकाराम जाधव
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.यशोधन गारमेंट, गार्डी घातवड,
    ता.खानापूर, जि.सांगली
१२. सुमन पांडुरंग पाटील
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
१३. संभाजी जगन्‍नाथ मोहीते
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
१४. सलीम मुकबुल मुलाणी
    वय सज्ञान, व्‍यवसाय शेती
    रा.मु.पो.गार्डी, ता.खानापूर, जि.सांगली
१५. श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. गार्डी
    ता.खानापूर जि. सांगली शाखा विटा                       ..... जाबदार  
 
 
                            तक्रारदार तर्फेः अॅड श्री एच.एन.नानवाणी
                            जाबदार क्र.२ ते १० व १२ ते १५ एकतर्फा
                      जाबदार क्र.१ व ११ तर्फे अॅड श्री आर.पी.बाबर
 
नि का ल प त्र
 
द्वारा- मा.सदस्‍या - श्रीमती सुरेखा बिचकर 
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. गार्डी     ता.खानापूर जि. सांगली(ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रक्‍कम गुंतविलेली होती. ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.४ अन्‍वये एकूण १३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.     जाबदार क्र.१ व ११ यांनी याकामी हजर होवून नि.२८ ला आपले म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जामध्‍ये नमूद केलेले संचालक मंडळ सध्‍या अस्तित्‍वात नाही तसेच सदरचे जाबदार क्र. १ हे संस्‍थेच्‍या दैनंदिन कामकाज व व्‍यवहारास वैयक्तिक व सामुदायिकरित्‍या जबाबदार नाहीत. ठेवपावत्‍या कोणत्‍या शाखेत ठेवल्‍या याचा उल्‍लेख तक्रारअर्जात नाही. रक्‍कम वसुल होईल त्‍याप्रमाणात अर्जदार यांना रक्‍कम देण्‍यास जाबदार तयार आहेत. जाबदार अर्जदार यांना ५० टक्‍के रक्‍कम देण्‍यास तयार होते परंतु अर्जदार यांनी सर्व रकमेची एकाच वेळी मागणी करुन रक्‍कम स्‍वीकारण्‍यास नकार दिला. तक्रारदारांची नोटीस जाबदार यांना मिळालेली नाही. तक्रारदार यांना देय असलेली रक्‍कम दरमहा रु.१०,०००/- प्रमाणे परत देणेस जाबदार तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ जाबदार यांनी नि.२९ ला शपथपत्र दाखल केले आहे.
 
३.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. २ ते १० व १२ ते १५ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
 
 
४.     तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते १४ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
 
५.     प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी नि.४२ सोबत दाखल केलेल्‍या ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दामदुप्‍पट ठेव योजनेअंतर्गत रकमा गुंतविलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेव पावत्‍यांची मुदतही पूर्ण झाली आहे. त्‍यामुळे या ठेवींमधील मुदतीनंतर मिळणारी ठेवीची मुदत संपल्‍याचे दुसरे दिवशीपासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे. 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था क्र.१ व १५ व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.०९९०, ०९९१, १०७०, १०७१ मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्‍येकी रक्‍कम रु.४५,०००/- (रुपये पंचेचाळीस हजार फक्‍त) व या रकमेवर दि. २८/९/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था क्र.१ व १५ व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.१०५० व १०५१ मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्‍येकी रक्‍कम रु. ९०,०००/- (रुपये नव्‍वद हजार फक्‍त) व या रकमेवर दि.२६/७/२००७ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
३. यातील जाबदार पतसंस्‍था क्र.१ व १५ व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.११०९ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रु.३०,०००/- (रुपये तीस हजार फक्‍त) व या रकमेवर दि.१२/१/२००८ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था क्र.१ व १५ व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२७/४/२०१२ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांक:/०३/२०१२
 
 
                (सुरेखा बिचकर)                              (अनिल य.गोडसे÷)
                     सदस्‍या                               अध्‍यक्ष           
                  जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.