नि.18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 61/2010 नोंदणी तारीख – 18/2/2010 निकाल तारीख – 5/7/2010 निकाल कालावधी – 137 दिवस श्रीमती सुचेता मलवाडे, प्रभारी अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, प्रभारी अध्यक्ष न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री आनंदा गोविंदा डोंगरे रा. 6, आदर्श कॉलनी, माळवाडी रोड, शाहुपूरी, सातारा ----- तक्रारदार (वकील श्री नितीन निकम) विरुध्द 1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या.तर्फे श्री गणराया हौसिंग सोसायटी, शाहुपूरी रोड, सातारा तर्फे व्यवस्थापक दिलीप रामचंद्र ताटे 2. चेअरमन, श्री हणमंतराव बाबासाहेब चौरे मु. खंडोबाची वाडी, पो.गोवे, ता.जि.सातारा 3. व्यवस्थापक श्री दिलीप रामचंद्र ताटे, मु.पो.लिंब ता.जि.सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहेत. अर्जदार यांनी सदर रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि. 10 ला दाखल आहे. जाबदार क्र.1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि. 6 कडे बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्तुत बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता सदरचे खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5 सोबतची रक्कम मागणीबाबतचे अर्ज पाहिले असता अर्जदार यांनी बचत खात्यातील रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी बचत खात्यातील रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि.5 सोबतच्या नि.6 कडील बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 4. जाबदार क्र.3 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 3 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 व 2 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र.3 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 व 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 3 यांनी अर्जदार यांना बचत खाते क्र.739 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.5/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) सदस्य प्रभारी अध्यक्ष
| , | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | , | |