नि.30 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 116/2010 नोंदणी तारीख – 16/4/2010 निकाल तारीख – 1/10/2010 निकाल कालावधी – 165 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री दत्तात्रय अश्वधमर राजपुरोहित 2. सौ तारा दत्तात्रय राजपुरोहीत दोघेही रा. 43, पवार कॉलनी, शाहूपुरी सातारा हल्ली रा. फलॅट नं.208, विंग ए-2, मुक्ता रेसीडेन्सी, आझाद नगर, कोथरुड पूणे ----- अर्जदार (अभियोक्ता श्री जयप्रकाश येवले) विरुध्द धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या.शाहूपुरी सातारा करिता 1. श्री बाळासाहेब कमलगिरी गोसावी, संस्थापक रा. 25, जिल्हा परिषद कॉलनी, शाहुपूरी, सातारा 2. श्री हणमंतराव बाबासाहेब चवरे, चेअरमन रा. मु.खंडोबाची वाडी, पो.गोवे ता.जि.सातारा 3. श्री राजेश अशोक माजगावकर, व्हा.चेअरमन रा.247, सोमवार पेठ, सातारा 4. श्री प्रतापराव रावसाहेब चव्हाण, संचालक रा.मु.पो.लिंब, ता.जि.सातारा 5. श्री कलेराव यदू गोगावले, संचालक रा.मु.रामनगर, पो.वर्ये, ता.जि.सातारा 6. श्री सुभाष शिवाजी जाधव, संचालक रा.मु.पो. नेले, ता.जि. सातारा 7. श्री रमेश विठ्ठल चव्हाण, संचालक रा.मु.कामथी, पो.वेळे, ता.जि.सातारा 8. श्री विठ्ठल महादेव चव्हाण, संचालक रा.हॉटेल सृष्टी, शाहूपुरी, सातारा 9. श्री नवीनकुमार शिवाजी शिंदे, संचालक रा.लक्ष्मीनगर, अंबेदरे, शाहूपुरी, सातारा 10. श्री बब्रुवाहन पांडुरंग माळी, संचालक रा.16, जयहिंद कॉलनी, शाहूपुरी, सातारा 11. श्री मारुती भिमराव खंडागळे, संचालक रा.मु.दिव्यनगरी, पो.कोंडवे, ता.जि.सातारा 12. श्री राजेंद्र भानुदासगिरी गोसावी, संचालक रा.4, गडकर आळी, सातारा 13. सौ मंगला शामराव सोनटक्के, संचालक रा.समता पार्क, शाहूपुरी, सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 व 2, 5 ते 9 व 11 ते 13 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. जाबदार क्र.3 व 10 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे नि.21 व 20 ला दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 व 5 ते 13 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.4 यांना अर्जदार यांचे नि.25 कडील अर्जावरील आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले आहे. 4. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.28 सोबत ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व बचत खात्याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. तसेच बचत खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्या खात्यामध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि.5 सोबत दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 28 सोबतच्या ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात तसेच बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 ते 3 व जाबदार क्र.5 ते 13 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.0000848, 0000012, 0000027 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. बचत खाते क्र.362/1/176 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 1/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |