Maharashtra

Satara

CC/10/145

shri vidhadar rajaram dange - Complainant(s)

Versus

dhrmvir snbhaji sah patsnstha shri hanmntarao balasaheb chavare - Opp.Party(s)

kadam

29 Jul 2010

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 145
1. shri vidhadar rajaram dange khavakar kolani shahipuri satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. dhrmvir snbhaji sah patsnstha shri hanmntarao balasaheb chavaregendamal shahipuri satarasatara ...........Respondent(s)


For the Appellant :kadam, Advocate for
For the Respondent :

Dated : 29 Jul 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.20
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 145/2010
                                          नोंदणी तारीख – 28/5/2010
                                          निकाल तारीख – 29/7/2010
                                          निकाल कालावधी – 61 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. श्री विद्याधर राजाराम डांगे
2. सौ शारदा विद्याधर डांगे
दोघे रा.6, खटावकर कॉलनी, शाहुपूरी
सातारा                                           ----- अर्जदार
                                             (अभियोक्‍ता श्री आनंद कदम)
      विरुध्‍द
1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या. गेंडामाळ
    शाहुपूरी, सातारा तर्फे
    चेअरमन श्री हणमंतराव बाळासाहेब चवरे
2. चेअरमन, श्री हणमंतराव बाळासाहेब चवरे
    धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या. गेंडामाळ
    शाहुपूरी, सातारा
3. संस्‍थापक/अध्‍यक्ष, श्री बाळासाहेब कमलगिरी गोसावी
    धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या. गेंडामाळ
    शाहुपूरी, सातारा
4. व्‍यवस्‍थापक, श्री दिलीप रामचंद्र ताटे,
    धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या. गेंडामाळ
    शाहुपूरी, सातारा                               ----- जाबदार
                                                   (एकतर्फा)
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्‍थेतील बचत खात्‍यामध्‍ये काही रक्‍कम शिल्‍लक आहेत. सदर ठेवींपैकी काही ठेवींची मुदत संपल्‍यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम परत दिली नाही. सबब ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी, बचत खात्‍यातील रक्‍कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र.1 ते 4 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही. नोटीस न स्‍वीकारलेबाबतचे पोस्‍टाचे शेरे असलेले लखोटे नि.13 ते 16 ला दाखल आहेत. जाबदार यांना समन्‍स बजावणेबाबत अर्जदारचे नि.18 कडील शपथपत्र पाहिले. जाबदार क्र.1 ते 4 हे नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. जाबदार सबब, जाबदार क्र.1 ते 4 यांचेविरुध्‍द दि. 15/7/2010 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
3.    अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 व 3 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 6   सोबत ठेव पावत्‍यांच्‍या मूळ प्रती व बचत खात्‍याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्‍तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच प्रस्‍तुत ठेवींपैकी काही ठेवींची मुदत संपलेचेही स्‍पष्‍ट दिसत आहे. तसेच बचत खात्‍याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्‍या खात्‍यामध्‍येही रक्‍कम शिल्‍लक असल्‍याचे दिसत आहे. सबब, नि. 2 व 3 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. अर्जदार यांना ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्‍कम परत मिळण्‍याचा कायद्यानेच अधिकार आहे. अर्जदारचे इच्‍छेविरुध्‍द जाबदार यांना त्‍यांची ठेव रक्‍कम अडवून ठेवता येणार नाही. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत‍ आहे. सबब जाबदारने अर्जदारच्‍या प्रस्‍तुत तक्रारीतील फेरिस्‍त नि. 6 सोबतच्‍या ठेवींच्‍या रकमा पावत्‍यांवरील नमूद व्‍याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने होणा-या व्‍याजासह द्यावी तसेच ज्‍या ठेवींची मुदत अद्याप संपलेली नाही, अशा ठेवपावत्‍यांवरील रक्‍कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी व बचत खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कम व्‍याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
4.    जाबदार क्र.4 हे व्‍यवस्‍थापक असून संस्‍थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 4 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्‍थेसाठी त्‍यांना रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 2 व 3 यांना स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार क्र.1 संस्‍थेतर्फे जाबदार क्र. 4 यांना अर्जदारच्‍या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
5.    सबब आदेश.
                        आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र.2 व 3 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार क्र.1 संस्‍थेतर्फे
    जाबदार क्र. 4 यांनी अर्जदार यांना त्‍यांची ठेव पावती क्र. 0000316, 0000309,
    0000321 कडील रक्‍कम ठेव ठेवलेल्‍या तारखेपासून ठेवीची मुदत
    संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्‍याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे
    तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह द्यावी.
3. जाबदार क्र.2 व 3 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार क्र.1 संस्‍थेतर्फे
    जाबदार क्र. 4 यांनी अर्जदार यांना त्‍यांची ठेव पावती क्र. 0000759, 3881,
    3879, 3880 कडील रक्‍कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या
    व्‍याजासह द्यावी.
4. जाबदार क्र.2 व 3 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार क्र.1 संस्‍थेतर्फे
    जाबदार क्र. 4 यांनी बचत खाते क्र. 284 कडील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे
    नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी.        
5. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्‍कम
    रु. 5,000/- द्यावी.
6. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
7. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 29/7/2010
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER