Maharashtra

Kolhapur

CC/09/579

Anil Baburao Patil. - Complainant(s)

Versus

Dhondiram Ganpati Chavan. - Opp.Party(s)

Adv.M.P.Nagaonkar.

02 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/579
1. Anil Baburao Patil.Ingali.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Dhondiram Ganpati Chavan.Uchagaon,Kolhapur2. Dnyaneshwar Ganpati Chavanr/o As above3. Bayabai Ganpati Chavanr/o as above4. Sambhaji Bapu Malir/o Sarnobatwadi, Tal Karveer, Dist Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :
Adv P V Kulkarni., Advocate for Opp.Party Adv P V Kulkarni, Advocate for Opp.Party Adv P V Kulkarni, Advocate for Opp.Party

Dated : 02 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.02/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 ते 4 त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 

 

           सदरची तक्रार तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या प्‍लॉटचे सामनेवाला यांनी खरेदीपत्र करुन दिले नाही म्‍हणून  दाखल करणेत आली आहे.

          

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-अ)  तक्रारदार यांचा व्‍यवसाय शेती असून ते नोकरीसाठी कोल्‍हापूरयेथे येत असतात. सामनेवाला हे जमीन विकसीत करुन प्‍लॉट पाडून विकणेचा व्‍यवसाय करतात.

 

           ब) सामनेवाला क्र.4 यांनी सामनेवाला क्र.1 ते 3 यांची सरनोबतवाडी ता;करवीर जि.कोल्‍हापूर येथे रि.स.नं.33ब क्षेत्र 68 आर ही जमीन विकसनासाठी घेतलेली होती. तक्रारदार यांना प्‍लॉटची गरज असलेने सामनेवाला क्र.4 डेव्‍हलपर यांचेकडे जाऊन प्‍लॉट पहाणी करुन त्‍यांनी सामनेवाला क्र.4 याचेकडील सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेबरोबर केलेले करारपत्र व वटमुखत्‍यार यावर विश्‍वास ठेवून दि.16/06/2006 रोजी प्‍लॉट नं.3 1200 चौ.फु.प्‍लॉट नं.8 1140 चौ.फु., प्‍लॉट नं.19, 1900 चौ.फु. प्‍लॉट नं.12, 2200 चौ.फु. असे एकूण 6440 चौ.फु. इतके क्षेत्र रु.40/- चौ.फु. याप्रमाणे एकूण रक्‍कम रु.2,57,600/- इतक्‍या किंमतीस घेणेचे ठरले. व त्‍याप्रमाणे करारपत्र केले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 यांना रु.2,00,000/- अडव्‍हान्‍स दिले व खरेदीपत्र बिगरशेती झालेनंतर करणेचे ठरवले.

 

           क) तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 कडे वारंवार मागणी करुनही खरेदीपत्र करुन दिले नाही. त्‍यावेळी सामनेवाला क्र.4 यांनी जागा मालकांना कराराप्रमाणे पूर्ण रक्‍कम अदा करुनही खरेदीपत्र करुन देणेस टाळाटाळ करीत असलेचे प्रतिपादन केले. सबब दि.25/08/2009 रोजी तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 ते 4 यांना वकीलांमार्फत रजि. पोष्‍टाने नोटीस पाठवली. तरीही खरेदीपत्र करुन दिले नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन नमुद प्‍लॉटचे खरेदीपत्र तक्रारदाराचे नांवे करुन देणेचा आदेश व्‍हावा. अर्जाचा खर्च व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,500/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावे अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.

 

(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ दि.17/06/2006 रोजीचे संचकारपत्र, सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस व त्‍यांच्‍या पोच पावत्‍या इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

 

(4)        सामनेवाला क्र.4 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेप्रमाणे तक्रारदाराची तक्रार मान्‍य व कबूल असलेचे प्रतिपादन केले आहे. सामनेवाला क्र.4 हे उर्वरित रक्‍कम स्विकारुन तक्रारदारास खरेदीपत्र करुन देण्‍यास केव्‍हाही तयार आहेत. सामनेवाला क्र.1 ते 3 या जागा मालकांना तक्रारीतील नमुद मिळकतीच्‍या मोबदल्‍यापोटी रु.10,00,000/-अदा करुनही जादा रक्‍कमेच्‍या हव्‍यासापोटी सामनेवाला क्र.1 ते 3 सहकार्य करीत नाहीत व खरेदीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच नमुद मिळकतीतील 2 आर क्षेत्र महाराष्‍ट्र शासनास तळेगांव-दाभाडे अंतर्गत दिलेले होते. सबब सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना खरेदीपत्र करुन देणेबाबतचा आदेश व्‍हावा अशी विनंती सामनेवाला क्र.4 यांनी सदर मंचास केली आहे.

 

(5)        सामनेवाला क्र.4 यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचेबरोबर झालेल्‍या करारपत्राची सत्‍यप्रत, नमुद मिळकतीचे शासनास दिलेल्‍या जागेबाबत गाव नमुना 7 व 8 अ ची सत्‍यप्रत दाखल केली आहे.

 

(6)        सामनेवाला क्र. 1 ते 3 यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराचा अर्ज हा खोटा व लबाडीचा असून त्‍यातील मजकूर सामनेवाला यांना मान्‍य व कबूल नाही. तक्रारीतील नमुद मिळकत सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे नांवे 70 आर जमीन आहे. तक्रारदाराने वकील मनोज नागांवकर यांनी पाठविलेल्‍या नोटीसला दि.01/09/2009 रोजी उत्‍तर दिलेले आहे व सदर उत्‍तरामध्‍ये संभाजी बापूसो माळी यांना वटमुखत्‍यार दिलेले होते व सदर वटमुखत्‍यार हे रि.सं.नं.33ब क्षेत्र 68आर इतक्‍या जमीनीपुरते दिलेले होते. मात्र त्‍यांच्‍यावर विश्‍वास राहिला नसलेने दि.25/04/2008 रोजी सामनेवाला यांनी वकील के.वाय.मुल्‍ला यांचेतर्फे दै.पुढारीमध्‍ये सदरचे वटमुखत्‍यार रद्द केलेचे प्रसिध्‍द केले. तसेच 70 आर जमीन मोजणी करुन 2गुंठे क्षेत्र सोडून बाकीच्‍या क्षेत्राचा व्‍यवहार करावा असे सांगितले. परंतु त्‍यांनी ते ऐकले नाही. यातील तक्रारदार यांचेशी प्रस्‍तुत सामनेवाला यांनी कोणताही व्‍यवहार केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी करारपत्राप्रमाणे खरेदीपत्र करुन देणेची केलेली मागणी ही दिवाणी कोर्टातच दावा दाखल करुन मागता येईल. ग्राहक न्‍यायालयात सदर तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. तक्रारदार व प्रस्‍तुत सामनेवाला यांचेमध्‍ये उपभोक्‍ता ग्राहक अथवा विक्रेता असा संबंध येत नाही.त्‍यामुळे सदरचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.

 

(7)        सामनेवाला क्र.1 ते 3 हे आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे असे सांगतात की, सदर नमुद मिळकती संदर्भात स्‍पे.क.नंबर 323/2007 हा मे.कोल्‍हापूर येथील सिव्‍हील जज्‍ज सिनियर डिव्‍हीजन यांचे कोर्टात कै.के.डी.मोरे यांनी खरेदीपत्र करुन मिळणेसाठी व कायम मनाईसाठी सदर दावा मिळकती संदर्भात दावा दाखल केलेला असून त्‍यामुळे सदर कामी मे; कोर्टानी सदर मिळकत विक्रीस मनाई केलेने सदर कामी कायदयानेच खरेदीपत्र करुन मागता येणार नाही. त्‍यामुळे सदरचा अर्ज फेटाळणेत यावा. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 यांचेबरोबर परंतु प्रस्‍तुत सामनेवाला यांनी सामनेवाला क्र.4 बरोबरचे वटमुखत्‍यारपत्र रद्द केलेले आहे. त्‍यामुळे सदरचा तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही व तक्रारदारास अशाप्रकारे खरेदीपत्र करुन मागता येणार नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा व तक्रारदाराकडून प्रस्‍तुत सामनेवाला यांना नुकसानभरपाईची रक्‍कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च रु.5,000/- वसुल होऊन मिळावा अशी विनंती प्रस्‍तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.

 

(8)        सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत मौजे सरनोबतवाडी येथील गट नंबर33ब चा खातेउतारा, मौजे सरनोबतवाडी येथील गट नं.33ब चा 7/12 उतारा, वकील पी.व्‍ही.कुलकर्णी यांनी वकील नागांवकर यांना दिलेले उत्‍तर, वकील नागांवकर यांनी न स्विकारलेली रजि.ए.डी. त्‍याची रजिस्‍टर पावती, सामनेवाला क्र.4 यांना पाठविलेली उत्‍तराची रजिस्‍टर पोष्‍टाची पावती, वकील भूमकर यांनी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, तुकाराम मोरे यांनी दिलेला स्‍पे.क.नंबर 323/2007 चा कोल्‍हापूर कोर्टातील दिवाणी दावा इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

(9)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र. 1 ते 4 यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.

1) प्रस्‍तुतची तक्रार मे.मंचास निर्णीत करता येईल का?--- नाही.

2) काय आदेश ?                                                              --- शेवटी दिलेप्रमाणे

मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रारीत नमुद केलेली मिळकत रि.स.नं.33ब सरनोबतवाडी मिळकतीवरील प्‍लॉट नं.3 1200 चौ.फु.प्‍लॉट नं.8 1140 चौ.फु., प्‍लॉट नं.19, 1900 चौ.फु. प्‍लॉट नं.12, 2200 चौ.फु. असे एकूण 6440 चौ.फु. इतके क्षेत्र रु.40/- चौ.फु. याप्रमाणे एकूण रक्‍कम रु.2,57,600/-च्‍या मोबदल्‍यापैकी रु.2,00,000/-दिलेले आहेत व उर्वरित रक्‍कम स्विकारुन नमुद मिळकतीचे सामनेवालांनी खरेदीपत्र करुन दयावे म्‍हणून मागणी केलेली आहे.

            नमुद मिळकतीच्‍या क्षेत्राबाबत वाद उत्‍पन्‍न झालेमुळे तुकाराम दत्‍तोबा मोरे यांनी मे. सिव्‍हील जज्‍ज सिनिअर डिव्‍हीजन कोल्‍हापूर यांचे कोर्टात स्‍पे.क.नं;323/2007 स्‍पेसिफीक परर्फामन्‍स ऑफ अग्रीमेंट खरेदीपत्र पूर्ण होऊन मिळणेबाबत व कायम मनाई मिळणेबाबत दाखल केलेला प्रस्‍तुतचा दावा हा नमुद तक्रार दाखल करण्‍यापूर्वीचा आहे. प्रस्‍तुत दाव्‍यात नमुद मिळकतीचे क्षेत्राच्‍या वादाबाबत असलेने मे. सिव्‍हील जज्‍ज यांनी दि.31/12/2008 रोजी तात्‍पुरता मनाई हुकूम मिळणेबाबतचा वादीचा (तुकाराम दत्‍तात्रय मोरे यांचा) अर्ज खर्चासह मंजूर केलेला आहे व अंतिम निकाल लागेपर्यंत दावा मिळकत कुणासही विक्री करु नये त्‍यावरील कोणतेही अधिकार व हक्‍क तबदील करु नये व बोजा निर्माण करु नये असा आदेश दिलेला आहे.

 

           प्रस्‍तुत तक्रारीतील खरेदीपत्र करुन देणेबाबतची मिळकत व दिवाणी दाव्‍यातील मिळकत ही एकच आहे व वाद विषयही एकच आहे आणि सदरचा वाद दिवाणी न्‍यायालयात प्रलंबीत आहे.  सबब प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचास निर्णीत करता येणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

 

मुद्दा क्र.2 :- मुद्दा क.1 मधील विस्‍तृत विवेचनानुसार प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचास चालणेस पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

 

                          आदेश

 

(1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

 

(2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER