Maharashtra

Kolhapur

CC/10/632

Tanaji Dhondiba Parit, R/o. Vandur, Tal- Kagal, Kolhapur. - Complainant(s)

Versus

Dhondiba Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Maryadit, - Opp.Party(s)

Kiran A.Mahajan

20 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/632
1. Tanaji Dhondiba Parit, R/o. Vandur, Tal- Kagal, Kolhapur.(Complainant in Complaint No.632/10)2. A) Kum.Rahul Tanaji Parit, B) Kum.Rakesh Tanaji Paril, C) Kum.Yogesh Babaso Parit, D) Kum.Priyanka Babaso Parit, E) Sou.Sunita Tanaji Parit, All r/o.Vandur, Tal.Kagal, Dist.Kolhapur.(Complainants in Complaint No.633/10) ...........Appellant(s)

Versus.
1. Dhondiba Gramin Bigar Sheti Sah Pat Sanstha Maryadit, R/o.Vandur, Tal-Kagal, Kolhapur.2. Liquidator, Dhondiba Gramin Bigar Sheti Sahakari Pat Sanstha Maryadit, Vandur, Tal.Kagal.At Post Vandur, Tal.Kagal, Dist.Kolhapur.3. Shri Dilipkumar Ganpati RandiveR/o. As above4. Sou.Kranti Dilipkumar RandiveR/o. As above5. Shri Annaso Hari BhosaleR/o.As above6. Shri Namdeo Dadu ChouguleR/o. As above7. Shri Shashikant Baburao PatilR/o. As above8. Shri Gajanan Tukaram NikamR/o. As above9. Shri Amar Yuvraj Kambale, SecretaryR/o. As above ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Adv.Kiran A. Mahajan/J.M.Phulwale for the complainants

Dated : 20 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.20.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत तक्रार क्र.632/10 व 633/10 या दोन्‍ही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू झालेली आहे. तथापि, सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सामनेवाला क्र.4 यांनी दि.04.12.2010 रोजी म्‍हणणे दाखल न करता त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार रद्द करणेत यावी याबाबत दिलेला विनंती अर्ज या मंचाने आदेश पारीत करुन नामंजूर केलेला आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
632/10
खाते पा.210/03 खाते नं.301
75000/-
08.02.2006
07.08.2006
2.
633/10
72
20000/-
09.01.2006
10.05.2006
3.
--”--
73
20000/-
09.01.2006
10.05.2006
4.
--”--
74
20000/-
09.01.2006
10.05.2006
5.
--”--
75
20000/-
09.01.2006
10.05.2006
6.
--”--
76
25000/-
20.01.2006
21.03.2006

 
(4)        सदर ठेवींची मुदत उलटून गेल्‍यानंतरही तक्रारदारांनी वेळोवेळी मागणी करुनसुध्‍दा सामनेवाला संस्‍थेकडून ठेव रक्‍कम परत देण्‍यात आलेली नाही.  तक्रारदारांना त्‍यांचे कुटुंबातील मुलींची लग्‍ने, मुलांचे शिक्षण इतर घरगुती अडीअडचणीकरिता तसेच, औषधोपचाराकरिता सदर रक्‍कमांची आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.07.10.2000 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.1 ते 9 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. 
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, सामनेवाला क्र.1, 3 ते 8 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.2 व 9 हे सामनेवाला संस्‍थेचे अनुक्रमे अवसायक व कर्मचारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(8)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व ग्राहक तक्रार क्रमांकनिहाय आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
ग्राहक तक्रार केस नं.632/10 :-
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला सामनेवाला क्र.1, 3 ते 8 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.2 व 9 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना लक्ष्‍मी ठेव पावती खाते पान नं.210/3, खाते नं.301 वरील रक्‍कम रुपये 75,000/- (रुपये पंच्‍याहत्‍तर हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर सहा महिन्‍यांकरिता द.सा.द.शे.12 टक्‍के दराने व्‍याज द्यावे व तदनंतर दि.08.08.2006 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला सामनेवाला क्र.1, 3 ते 8 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.2 व 9 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
 
ग्राहक तक्रार केस नं.633/10 :-
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला सामनेवाला क्र.1, 3 ते 8 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.2 व 9 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकात नमूद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
633/10
72
20000/-
2.
--”--
73
20000/-
3.
--”--
74
20000/-
4.
--”--
75
20000/-
5.
--”--
76
25000/-

 
(3)   सामनेवाला सामनेवाला क्र.1, 3 ते 8 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.2 व 9 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT