निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 06.12.2008 तक्रार नोदणी दिनांकः- 07.06.2010 तक्रार निकाल दिनांकः- 12.10.2010 कालावधी 4 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. संतोष पिता वसंतअप्पा मिटकरी अर्जदार वय 30 वर्षे धंदा स्वयंरोजगार रा.अक्षदा मंगल कार्यालय , ( अड डि.यू.दराडे ) विद्यापीठ रोड परभणी ता..जि.परभणी विरुध्द जे.जि.प्रिंटर्स गैरअर्जदार मार्फत प्रो.धिरज महरोत्रा वय सज्ञान धंदा व्यापार, रा.43/104 गुरुव्दारा चौक, कानपूर. कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेल्या त्रूटीच्या सेवेबददल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचा मिठाई बॉक्सेस तयार करावयाचा व्यवसाय आहे. जो स्वयंरोजगारासाठी आहे. बॉक्सेस बनवण्यासाठी अर्जदार वेगवेगळया गावांतून कच्चा माल खरेदी करतो. गेरअर्जदार हे मिठाईची खोकी बनवण्यासाठी कच्चा माल पुरवतात. अर्जदाराने दिनांक 06.12.2008 रोजी कानपूर येथे जाऊन गैरअर्जदाराची भेट घेतली व खोकी बनवण्यासाठी कच्चा मालाची ऑर्डर दिली व रुपये 10000/- अडव्हान्स म्हणून दिले व रुपये 25000/- अडव्हान्स परभणीच्या बॅकेतून गैरअर्जदाराच्या खात्यात भरण्याचे मान्य केले. अर्जदाराने दिनांक 13.12.2008 रोजी गैरअर्जदाराच्या युनियन बॅक आफ इंडियाच्या कानपूर शाखेसाठी परभणी शाखेत पैसे भरले. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराला बॉक्सेसची सहा डिझाइनस पाठवली. त्यापैकी 3 डिझाइनस निवडून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पाठवली. अर्जदाराची ऑर्डर काही दिवसात पूर्ण केल्याजाइल असे गैरअर्जदाराने अर्जदारास सांगितले परंतू गैरअर्जदाराने एक महिना झाल्यानंतरही ऑर्डर पाठवली नाही म्हणून अर्जदार स्वतः कानपूर येथे गेला तेंव्हा अर्जदाराला असे समजले कि, गैरअर्जदाराने 250 ग्रॅमची 1,70,000 खोकी बनवली आहेत जेंव्हा की, अर्जदाराने 1,10,000 खोकीच बनवायला सांगितली होती व 500 ग्रॉम आणि 1000 ग्रामची खोकीच बनवली नव्हती तेंव्हा गैरअर्जदाराने अर्जदाराला असे सांगितले कि त्याला 500 ग्रॅम व 1000 ग्रॉम ची खोकी हवी असतील तर त्याने 250 ग्रॉम च्या 60000 जादा खोक्याचे पैसे दयावेत. अर्जदाराचा व्यवसाय छोटा असल्यामुळे त्याला 250 ग्रॉमच्या जास्तीच्या खोक्याची जरुरत नव्हती म्हणून त्याने जास्तीची खोकी घेण्यास नकार दिला व अर्जदाराने दिनांक 15.02.2009 रोजी आर.पी.ए.डि. ने गैरअर्जदाराला नोटीस दिली तरीसुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराला ऑर्डरप्रमाणे माल दिला नाही व त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली व गैरअर्जदाराकडे जमा केलेले रुपये 35000/- द.सा.द.शे. 9 % व्याजाने दिनांक 13.12.2008 पासून मिळावेत व मानसिक त्रास व शारीरीक त्रासापोटी रुपये 5000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 2000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, बॅक, रिसीट, गैरअर्जदाराला पाठवलेली नोटीस, बॉकसेसच्या डिझाइन्सची छायाप्रती इत्यादी कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराला न्यायमंचातर्फे पाठवण्यात आलेली नोटीस त्याने घेण्यास नकार दिला म्हणून परत आली म्हणून गैरअर्जदाराविरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला.. तक्रारीत दाखल केलेल्या कागदपत्रे व अर्जदाराच्या युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराची तक्रार या न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात येते का ? नाही 2 आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने त्याच्या उपजिवीकेच्या व्यवसायासाठी लागणा-या कच्चा मालाची ऑर्डर कानपूर येथे जावून गैरअर्जदाराला दिलेले आहे. तीथेच त्याने गेरअर्जदाराला रुपये 10,000/- चा अउव्हान्स दिला हे नि. 4/1 वरील पावतीवरुन सिध्द होते. गैरअर्जदाराला न्यायमचाची नोटीस पाठविली असता त्याने ती घेण्यास नकार दिला म्हण्ंून गैरअर्जदाराविरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सदरील तक्रार परभणी न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात येते का हा पहिला मुद्या आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 11 नुसार 2) तक्रार अर्ज स्थानिक अधिकार क्षेत्रातील संबधित जिल्हा मंचाकडे दाखल करता येतील ते असे ए) विरुध्द पक्षकारांची संख्या एकापेक्षा जास्त असल्यास सर्व विरुध्द पक्षकार तक्रार अर्ज दाखल करतेवेळी प्रत्यक्षात व स्वच्छेने सदर मंचाच्या कार्यक्षेत्रात रहात असतील किंवा धंदा अगर व्यापार करीत असतील किंवा तेथे त्यांचे शाखा कार्यालय असल्यास अथवा उपजिवीकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसाय करीत असतील तर. ब) जर एकापेक्षा जास्त विरुध्द पक्षकार असतील व तक्रार अर्ज दाखल करतेवेळी त्या भागात कोणीही विरुध्द पक्षकार प्रत्यक्ष व स्वच्छेने त्या कार्यक्षेत्रात रहात असेल किंवा उपजिवीकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसायक करीत असेल किंवा तेथे त्याचे शाखा कार्यालय असेल तर परंतू अशा प्रकरणात एक तर जिल्हा मंचाची संमती घ्यावी लागेल किंवा जो विरुध्द पक्षकार त्या जिल्हा मंचाच्या कार्यक्षेत्रात रहात नसेल व उपजिविकेसाठी धंदा अगर व्यवसाय करीत नसेल किवा त्याचे शाखा कार्यालय नाही अशा व्यक्तिची संमती असणे आवश्यक आहे. . सी) अधिकार क्षेत्रात अंशतः अगर पूर्णतः तक्रार अर्जास कारण घडले असेल तर अर्जदाराची तक्रार वरील पैकी कोणत्ज्याही अटीत बसत नाही कारण गैरअर्जदार कानपूर येथे राहतो अर्जदाराने त्याला कानपूर येथे जावून रुपये 10,000/- दिलेले आहेत ( नि.4/1) अर्जदाराने नि. 4/2 वर युनियन बॅक आफ इंडिया शाखा परभणी मध्ये गैरअर्जदाराच्या खात्यावर रुपये 25000/- भरलेले आहेत त्याची काऊंटर फाइल दाखल केलेली आहेत परंतू त्या काऊंटर फाइल वर ‘’ युनियन बॅक आफ इंडिया परभणीचा कॅश रिसीव्हड ‘’ चा शिक्का नाही व कॅशियर ची सहीही नाही त्यामुळे अर्जदाराने युनियन बॅक आफ इंडियाच्या परभणी शाखेत गैरअर्जदाराच्या कानपूर शाखेत असलेल्या खात्यात पैसे भरले हे सिध्द होत नाही म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करण्यासाठी परत करण्यात येत आहे. . 2 तक्रारीत दाखल कागदपत्र अर्जदाराने निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत परत घ्यावेत. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |