नि.32 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 73/2011 नोंदणी तारीख – 18/05/2011 निकाल तारीख – 16/09/2011 निकाल कालावधी –120 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ----------------------------------------------------------------------- 1. श्री. अनिल दिनकर बोपर्डीकर, 2. सौ. अंजली अनिल बोपर्डीकर, दोघे रा. एफ-4ए अमृता हौसिंग सोसायटी, शुक्रवार पेठ, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.कदम) विरुध्द 1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या.,शाहूपूरी, सातारा (सदरचे समन्स संस्थापक बाळासाहेब कमलगिरी गोसावी यांचेवर बजावण्यात यावी) 2. संस्थापक श्री. बाळासाहेब कमलगिरी गोसावी, रा. 25, कर्मयोग, झेड.पी. कॉलनी, शाहूपूरी, सातारा, ता.जि.सातारा, 3. चेअरमन, श्री. हणमंतराव बाबासाहेब चावरे रा.मु. खंडोबाची वाडी, पो. गोवे, ता.जि.सातारा 4. व्हाईस चेअरमन, श्री. राजेश अशोक माजगांवकर रा.247,सोमवार पेठ, सातारा
5. संचालक, विठ्ठल महादेव चव्हाण, रा. हॉटेल सृष्टी,शाहूपूरी, सातारा (नि.नं. 27 अन्वये वगळले.) 6. संचालक, नवीनकुमार शिवाजी शिंदे, रा.लक्ष्मीनगर, अंबेदरे, शाहूपूरी, सातारा
7. संचालक, बब्रू वाहन पांडूरंग माळी रा. जयहिंद कॉलनी, शाहूपूरी, सातारा
8. संचालक मारुती भिमराव खंडागळे, रा.मु.दिव्यनगरी,पो.कोंडवे, ता.जि.सातारा 9. राजेंद्र भानुदासगिरी गोसावी, 4, गडकर अळी, सातारा
10. संचालिका सौ. मंगला शामराव सोनटक्के, रा. समता पार्क, शाहूपूरी, सातारा ----- जाबदार (जाबदार क्र. 4 तर्फे अभियोक्ता श्री.जगदाळे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहे. तसेच आवर्त (रिकरिंग) ठेव व बचत खात्यांमध्ये रक्कम ठेवलेली आहे. अर्जदार यांचे मुदत ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतींची तसेच रिकरिंग व बचत खात्यावरील एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.85,796/- व्याजासहीत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम व तक्रार अर्जाचा खर्च मागणी केली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसीची बजावणी जाबदार क्र. 3,4,8,10 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती प्रस्तुतकामात दाखल आहे. जाबदार क्र.1,2,5,6,7,9 यांनी प्रस्तुत तक्रार अर्जाची नोटीस स्विकारली नाही. नोटीस न स्विकारलेबाबतचे पोष्टाचे शेर असलेले लखोटे नि. 12 व 16 ते 20 ला दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 3, 6 ते 10 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबत नि. 30 कडील अर्जदार यांचे अफीडेव्हीट पाहीले असता जाबदार क्र. 1 ते 3, 6 ते 10 विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. जाबदार क्र. 5 यांना नि. 27 कडील आदेशानुसार वगळणेत आले आहे. 3. अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहीली तसेच अर्जदार यांनी नि. 31 ला दाखल केलेली पुरशिस पाहीली. 4. जाबदार क्र. 4 यांनी नि.23 कडे कैफियत व नि.24 कडे शपथपत्र देवून अर्जदार यांची तक्रार नाकारली आहे. या जाबदारांचे कथनानुसार जाबदार संस्थेकडे दि.26/11/10 रोजी संचालक पदाचा व व्हा. चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. व उपनिबंधक यांचा आदेश सोबत जोडला आहे. सबब जाबदार क्र. 4 यांची रक्कम परत देणेची जबाबदारी नाही. संस्थेचा कारभार जाबदार क्र.2 हाच पहात असल्याने जाबदार क्र. 4 यांचेविरुध्द तक्रार अर्ज फेटाळावा असे कथन केले आहे. निर्वादितपणे जाबदार क्र. 4 यांनी उपनिबंधक, सहकारी संस्था यांचा जाबदार क्र.4 चा राजिनामा मंजूर केला असलेबाबतचा कोणताही आदेश दाखल केला नाही. तसेच जाबदार क्र. 4 यांचे नाव संचालक मंडळातून कमी केलेबाबतचा कोणताही पुरावा या जाबदारांनी दाखल केलेला नाही. सबब त्यांच्या ठेवीच्या रकमा परत देणेची जबाबदारी नाही यासाठी कोणताही ठोस पुरावा दाखल नसल्याने प्रस्तुत जाबदारांचे कथन मान्य करणे न्याय होणार नाही. 5. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था या संस्थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी याकामी गैरहजर राहीलेले आहेत. जाबदार क्र. 1 ते 3, 6 ते 10 यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे न्याय होणार आहे. 6. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.6 सोबत नि.6/1 ते 6/2, कडे ठेव पावत्यांच्या मुळ प्रति दाखल केलेल्या आहेत. तसेच नि.6/3 कडे मुळे सेव्हींग पासबुक व रिकरिंग पासबुक दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठंवेलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब निशानी 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहता अर्जदार यांनी वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदाराने अर्जदारांच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरीस्त नि. 6/1 ते 6/2 कडील ठेव पावत्यांच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व मुदत संपल्यानंतर द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्यावी. तसेच नि. 6/3 कडील सेव्हींग व रिकरिंग खात्यातील शिल्लक रक्कमा नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 1 ते 4 व 6 ते 10 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 ते 4 व 6 ते 10 यांनी वैचक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 828,2407,001032 वरील रक्कमा ठेव ठेवलेल्या तारखेपासून पावतीत नमूद व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के देय होणा-या व्याजासह द्याव्यात. ब. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 ते 4 व 6 ते 10 यांनी वैचक्तिक व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची रिकरिंग ठेव पासबुक क्र. 967/5/85 कडील शिल्लक तसेच बचत खाते क्र. 491/2/17 कडील शिल्लक रक्कम नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्याव्यात. क. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. ड. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. जाबदार यांनी आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसांत करावे. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.16/09/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |