Maharashtra

Satara

CC/14/29

SUMATI BALWANT DATE - Complainant(s)

Versus

DHARMVEER SAMBHAJI PAT SANSTHA - Opp.Party(s)

A R KADAM

10 Aug 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                              तक्रार क्र. 29/2014.

                             तक्रार दाखल दि.3-3-2014.

                                    तक्रार निकाली दि. 10-8-2015. 

 

कै.बळवंत गणेश दाते (मयत)तर्फे वारस-

1. श्रीमती सुमती बळवंत दाते.

2. श्री.श्रीधर बळवंत दाते.

   दोघे रा. 27, आदर्श कॉलनी, शाहुपुरी,

   सातारा.                                  ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या.

   शाहुपुरी, सातारा.

2. बाळासाहेब कमलगिरी गोसावी, संचालक.

   रा.25, कर्मयोग, जिल्‍हापरिषद कॉलनी,

   शाहुपुरी, सातारा.

3. हणमंतराव बाबासाहेब चवरे, चेअरमन.

   रा.मु.खंडोबाचीवाडी, पो.गोवे, ता.जि.सातारा.

4. राजेश अशोक माजगांवकर, व्‍हा.चेअरमन.

   रा.247 सोमवार पेठ, सातारा.             (वगळणेत आले)

5. कलेराव यदू गोगावले, संचालक.

  रा.रामनगर, पो.वर्ये, ता.जि.सातारा.

6. नवीनकुमार शिवाजी शिंदे, संचालक.

   रा.लक्ष्‍मीनगर, अंबेदरे, शाहुपुरी, सातारा.

7. बब्रुवाहन पांडुरंग माळी, संचालक,

   रा.16, जयहिंद कॉलनी, शाहुपुरी, सातारा.

8. मारुती भिमराव खंडागळे, संचालक.

   रा.मु.दिव्‍यनगरी, पो.कोंडवे, ता.जि.सातारा.  (वगळणेत आले)

9. राजेंद्र भानुदासगिरी गोसावी, संचालक.

   रा.4 गडकर आळी, सातारा.                 ....  जाबदार

 

                 तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम. 

                 जाबदार क्र.5,6,7,9 एकतर्फा आदेश.

                 जाबदार क्र.4 व 8- वगळणेत आलेले.

                 जाबदार क्र.1 ते 3- नो से आदेश.  

 

                        न्‍यायनिर्णय

 

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला)

                       

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

 

        कै.बळवंत गणेश दाते यांचे दि.4-6-11 रोजी निधन झालेले आहे. त्‍याना तक्रारदार क्र.1 व 2 हे वारस असून तक्रारदार क्र.2 हे तक्रारदार क्र.1 यांचा मुलगा आहे.  तक्रारदार वर नमूद पत्‍त्‍यावर पूर्वीपासून एकत्र रहातात.    जाबदार पतसंस्‍था ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था असून ग्राहकाकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकानी रक्‍कम मागितल्‍यास सदरची रक्‍कम त्‍याना परत देणे अशा हेतूने सदर पतसंस्‍था स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत खालील तपशीलाप्रमाणे मुदतठेव स्‍वरुपात रकमा गुंतविलेल्‍या आहेत. 

अ.क्र.

पावती क्र.

ठेवीची तारीख

मुदत संपणेची तारीख

ठेव रक्‍कम रु.

1

001809

29-4-2003

29-05-2011

15,000/-

2

3428

29-11-2005

29-01-2011

16,500/-

3

2937

29-01-2005

28-02-2011

16,500/-

4

0001002

09-12-2007

09-12-2010

17,000/-

5

0001003

09-12-2007

09-12-2010

15,000/-

                                                एकूण रु. 79,000/-

 

        वर नमूद केलेल्‍या तपशीलाप्रमाणे तक्रारदारानी रक्‍कम रु.79,000/- जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेव स्‍वरुपात ठेवलेले होते व आहेत.  तक्रारदारांचे बचत खाते क्र.584/2/93 मध्‍ये दि.9-7-2009 अखेर रक्‍कम रु.18,422/- एवढी रक्‍कम शिल्‍लक आहे.  त्‍यानुसार तक्रारदारांचे मुदतठेवपावतीवरील शिल्‍लक रक्‍कम रु.79,000/- व बचत खात्‍यावरील शिल्‍लक रक्‍कम रु.18,422/- अशी एकूण रक्‍कम रु.97,422/- इतकी रक्‍कम आजअखेर होणा-या व्‍याजासह जाबदार हे तक्रारदाराना देणे लागत आहेत.    तक्रारदारानी जाबदार संस्‍थेत ठेवलेल्‍या ठेवपावतीची मुदत दि.9-12-2010 रोजी संपलेनंतर तक्रारदाराना सदरची रक्‍कम आजपर्यंत होणा-या व्‍याजासह देणे जाबदारांवर बंधनकारक होते व आहे.  तक्रारदाराना आर्थिक अडचण आल्‍याने व त्‍याना पैशाची अत्‍यंत गरज असलेने तक्रारदारानी सदर रक्‍कम जाबदारांकडे वेळोवेळी मागितली असता जाबदारानी प्रत्‍येकवेळी रक्‍कम देणेस टाळाटाळ करुन आजअखेर वेळ मारुन नेली.   तक्रारदारानी दि.16-8-2013 रोजी वकीलांतर्फे रजि.नोटीस पाठवून ठेवपावती व बचत खात्‍यावरील रकमेची मागणी केली.  जाबदार क्र.3,4,6 यानी सदर नोटीस न स्विकारल्‍याने अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आल्‍या आहेत व जाबदार क्र.2,3,5,7 व 8 यांनी नोटीसा स्विकारुनही उत्‍तर दिले नाही.  तक्रारीस कारण दि.16-8-2013 रोजी तक्रारदारानी वकीलांतर्फे नोटीस पाठवूनही जाबदारानी तक्रारदाराना कोणतीही रक्‍कम अदा केली नाही, त्‍यावेळी व त्‍यासुमारास मे.मंचाचे अधिकार स्‍थळसीमेत घडलेले आहे.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारानी सेवेत त्रुटी व कमतरता केली असलेनेच सदर तक्रारीची दखल घेणेचा मे.मंचास अधिकार आहे.  तरी तक्रारदारानी मे.मंचास खालीलप्रमाणे विनंती केली आहे-

     जाबदारानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना मुदतठेवपावतीवरील रक्‍कम रु.97,422/- एक महिन्‍याचे आत पावतीवरील नमूद व्‍याजासह अदा करणेचे आदेश करणेत यावेत.  अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम रु.97,422/- वर रक्‍कम प्रत्‍यक्ष पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.18% व्‍याजाने जाबदारानी तक्रारदाराना रक्‍कम देणेचे आदेश व्‍हावेत. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- तक्रारदाराना जाबदारांकडून देणेत यावा.

 

2.      नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे तक्रारदाराचा अँड.कदम याना तक्रारअर्ज चालवणेस परवानगीबाबतचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.4 कडे अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादीने कागद दाखल, नि.5/1 कडे बळवंत गणेश दाते यांचा मृत्‍यूनोंद दाखला, नि.5/2, 5/3 व 5/4 कडे बळवंत गणेश दाते किंवा तक्रारदार क्र.1 यांचे नावे असलेल्‍या व्‍हेरिफाईड मुदतठेवपावत्‍या, नि.5/7 कडे बळवंत गणेश दाते किंवा तक्रारदार क्र.1 यांचे नावे असलेले सेव्‍हींग पासबुकाची व्‍हेरिफाईड झेरॉक्‍स, नि.5/8 कडे अँड.कदम यानी जाबदाराना पाठविलेली रजि.नोटीस, नि.5/9 कडे जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसच्‍या पोस्‍टाच्‍या पावत्‍या, नि.5/10 कडे जाबदार क्र.2, 3 व 6 यांच्‍या नोटीसच्‍या पोहोचपावत्‍या, नि.5/11 कडे जाबदार क्र.5 च्‍या नोटीसचा लखोटा परत, नि.5/12 कडे जाबदार क्र.7 चे अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेला लखोटा व जाबदार क्र.9 ची पोहोचपावती, नि.6 कडे तक्रारदार क्र.1 व 2 यांचा पत्‍तामेमो, नि.7 कडे मंचाने जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि.8 कडे तक्रारदारांचा अर्ज की सर्व जाबदाराना फेरनोटीसा काढाव्‍यात, अर्ज मंजूर.  नि.9 कडे मे.मंचाच्‍या जाबदाराना फेरनोटीसा, नि.10 कडे जाबदार क्र.1 ची पोहोचपावती, नि.10/1 कडे जाबदार 3 ची पोहोचपावती, नि.10/2 कडे जाबदार 6 ची पोहोचपावती, नि.10/3, 10/4, 10/5 कडे जाबदार क्र.5,7 व 9 चा रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला लखोटा, नि.11 कडे पुढील तारखेस वकीलपत्र दाखल करणेसाठी मुदतीचा अर्ज, नि.12 कडे तक्रारदारांचा अर्ज की, जाबदार क्र. 4 याना दोनदा नोटीसा पाठवूनही त्‍याचा रिपोर्ट नाही व तक्रारदाराकडे याशिवाय दुसरा पत्‍ता नाही, त्‍यामुळे जाबदार क्र.4 याना वगळणेचा आदेश व्‍हावा.  अर्ज मंजूर. नि.13 कडे जाबदाराचा म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.14 कडे अँड.पवार यांचे जाबदार क्र.1 व 2 चे वकीलपत्र, नि.15 कडे जाबदार क्र.1 चा पत्‍तामेमो, नि.16 कडे तक्रारदाराचा फेरनोटीसीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.17 कडे तक्रारदारांचा जाबदार क्र.8 याना वगळणेबाबतचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.18 कडे तक्रारदारातर्फे जादा पुरावा देणेचा नाही अशी पुरसीस इ.कागदपत्रे दाखल आहेत. 

 

3.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, तसेच लेखी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                        होय.

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर. 

 

 

 

 

विवेचन-  मुद्दा क्र.1 ते 3-

 

4.        मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  प्रस्‍तुत कामी तक्रारदार क्र.1 व  तक्रारदार क्र.2 बळवंत गणेश दाते (मयत) यांचे वारस आहेत. तक्रारदार क्र.2 यांचे ते वडिल व तक्रारदार क्र.1 यांचे ते पती होते.   जाबदार पतसंस्‍था ही लोकांचे पैसे विविध खात्‍यांवर ठेवून घेते व त्‍यावर वेगवेगळया पध्‍दतीने ठेवीदारास व्‍याज देते.  तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्‍यावर व्‍याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्‍यवहार-व्‍यापार चालतो.  तक्रारदार क्र.1 व 2 हे त्‍यांचे कायदेशीर वारस असलेने मुदतठेवपावत्‍यांचेही ते वारस ठरतात.  ते जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहकही ठरतात.   त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक झाले आहेत हे सिध्‍द होते. तसेच जाबदार पतसंस्‍थेने रकमा ठेवून घेतल्‍या आहेत व त्‍यावर ती व्‍याज देणार असलेने जाबदार पतसंस्‍था ही त्‍यांना-ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा मुदती संपून गेल्‍या तरी परत केल्‍या नसल्‍यामुळेच त्‍यांचेकडून त्‍यांच्‍या-(जाबदारांच्‍या) कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे.  आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही, ती त्‍यांनी त्‍यांना सव्‍याज परत केली पाहिजे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

 

5.       सदर कामी जाबदार क्र.1 ते 4, 6,8 व 9 यांना नोटीसा मिळालेल्‍या असून जाबदार क्र.5 यांची नोटीस रिफ्यूज्‍ड शे-याने परत आली आहे.  नि.12 व नि.18 कडे तक्रारदारानी जाबदार क्र.4 व 8 याना वगळणेचा अर्ज दिला आहे.  त्‍यामुळे जाबदार 4 व 8 याना वगळणेत आलेले आहे.  सदर कामी जाबदार क्र.5,6,7 व 9 तर्फे मे.मंचाचा एकतर्फा आदेश झालेला आहे व जाबदार क्र.1 ते 3 यांचेविरुध्‍द नो से आदेश झाला आहे.

 

म्‍हणून सदर कामी जाबदारातर्फे म्‍हणणे दाखल नाही.   तक्रारदाराचे पैसे वेळेत परत न देऊन जाबदारानी तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे व त्‍यामुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रासही झाला आहे.  तसेच त्‍याचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे.  नि.12 व नि.17 क‍डे तक्रारदारांच्‍या अर्जाप्रमाणे जाबदार क्र.4 व जाबदार क्र.8 याना वगळणेत येत आहे.  येथे आम्‍ही Co-operate corporate veil चा आधार घेऊन या सर्व गोष्‍टींना जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2,3 व 5 ते 7 व 9  यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहोत.  येथे आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

6.          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                           आदेश

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

 

2.  परिशिष्‍ट क्र.1 मध्‍ये दर्शविलेल्‍या अ.क्र.1 ते 5 मध्‍ये नमूद केलेल्‍या तक्रारदारांच्‍या  मुदतठेवपावत्‍यांवरील रकमा ठेव ठेवलेल्‍या तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत ठेवपावत्‍यांवर नमूद केलेल्‍या व्‍याजदराने होणारी एकूण व्‍याजासह रक्‍कम तक्रारदार  क्र.1 व 2 यांना जाबदार क्र.1 ते 3, 5 ते 7 व 9 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

3.   तक्रारदारास जाबदार क्र. 1 ते 3, 5 ते 7 व 9 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.4,000/- अदा करावेत.

 

4.      वरील आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 ते 3, 5 ते 7 व 9 यांनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावयाचे आहे तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून जाबदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत झालेल्‍या एकूण रकमेवर द.सा.द.शे.6% ने व्‍याज अदा करावे लागेल.

 

5.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

 

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 10 –8-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.