Maharashtra

Bhandara

CC/19/29

PRAKASH HIRARAM HATTEWAR - Complainant(s)

Versus

DHARMENDRA BABULAL REDDY. SAIKRUPA ASOCIATE AND DEVELOPERS - Opp.Party(s)

MR. L.N.CHAURE

27 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/29
( Date of Filing : 25 Jan 2019 )
 
1. PRAKASH HIRARAM HATTEWAR
R/O. MAKAN NO. 147. MANERI. TAH.LANJI. BALAGHAT
BALAGHAT
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DHARMENDRA BABULAL REDDY. SAIKRUPA ASOCIATE AND DEVELOPERS
FRONT OF BHARAT GAS GODOWN. NARI ROAD. TEKANAKA. NAGPUR.
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. L.N.CHAURE , Advocate
For the Opp. Party:
Dated : 27 Jan 2020
Final Order / Judgement

                     (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                                           (पारीत दिनांक–27 जानेवारी, 2020)

1.    तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष भूखंड विक्रेता याचे कडून  विरुध्‍दपक्षाचे योजने मध्‍ये गुंतवणूक केलेली परिपक्‍वता रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो व्‍याजासह मिळण्‍यासाठी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यासाठी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहतो. विरुध्‍दपक्ष हा साईकृपा असोसिएट अॅन्‍ड लॅन्‍ड डेव्‍हलपर्स या फर्मचे नावाने भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करतो. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे दामदुप्‍पट योजने मध्‍ये एकमुस्‍त रक्‍कम रुपये-54,500/- दिनांक-28.04.2015 रोजी नगदी गुंतविली होती आणि त्‍या मोबदल्‍यात दामदुप्‍पट योजने प्रमाणे विरुध्‍दपक्षाने सदर फर्मचे वतीने तक्रारकर्त्‍याचे नावाने बॅंक ऑफ बडोदा, जरीपटका, नागपूर-440014  येथील शाखेचा पोस्‍ट डेटेड धनादेश क्रं-000259, दिनांक-28.04.2018 रोजीचा रक्‍कम रुपये-1,09,000/- दिला होता तसेच विरुध्‍दपक्ष हा भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करीत असल्‍याने त्‍याने जास्‍तीची सोय म्‍हणून मौजा मेहगाव, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील खसरा क्रं 27/51 मधील भूखंड क्रं-30, क्षेत्रफळ-821 चौरसफूटचे आममुखत्‍यारपत्र सन-2015 मध्‍ये स्‍टॅम्‍प पेपरवर नोटरी समोर तक्रारकर्त्‍याचे नावे लिहून दिले होते. सदर आममुखत्‍यारपत्राव्‍दारे विरुध्‍दपक्षाने असेही लिहून दिले होते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याचे नावे देऊ केलेल्‍या पोस्‍ट डेटेड धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मिळाल्‍या नंतर सदर आममुखत्‍यारपत्र रद्द होईल. सदर आममुखत्‍यारपत्रावर तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष यांचे फोटो आणि सहया असून दोन साक्षीदार यांच्‍या देखील सहया आहेत. थोडक्‍यात विरुध्‍दपक्षाने गुंतवणूक केलेली रक्‍कम तीन वर्षाचे कालावधीमध्‍ये दुप्‍पट देण्‍याची  तसेच गुंतवणूक केलेली  दुप्‍पट रक्‍कम परत न मिळाल्‍यास जास्‍तीची काळजी म्‍हणून भूखंडाचे आममुखत्‍यारपत्र  तक्रारकर्त्‍याचे नावे करुन देऊन आश्‍वस्‍त केले होते. तक्रारकर्त्‍याने पुढे असेही नमुद केले की, तक्रार करण्‍याचे कारण प्रस्‍तुत ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात घडलेले असून तो विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होतो.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने दिलेला पोस्‍ट डेटेड धनादेश हा परिपक्‍वता दिनांक-28.04.2018 रोजी उलटल्‍या नंतर तो वटविण्‍यासाठी बॅंकेत जमा केला असता सदरचा धनादेश पुरेसा निधी नसल्‍याचे कारणावरुन बॅंकेत वटविल्‍या गेला नाही आणि सदरचा धनादेश दिनांक-03.07.2018 रोजी बॅंकेने तक्रारकर्त्‍याला परत केला. विरुध्‍दपक्षाने देऊ केलेला पोस्‍ट डेटेड धनादेश वटविल्‍या न गेल्‍यामुळे  त्‍याने विरुध्‍दपक्षाचे योजने मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम न मिळाल्‍यामुळे फसवणूक झाली. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली. गुंतवणूक केलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथी उलटूनही न मिळाल्‍यामुळे त्‍याचे व्‍याजाचे सुध्‍दा नुकसान होत आहे आणि त्‍यामुळे त्‍याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, म्‍हणून शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

     विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला परिपक्‍वता तिथीस देय असलेली रक्‍कम रुपये-1,09,000/- परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे आणि सदर परिपक्‍व रकमेवर विरुध्‍दपक्षाकडे दावा दाखल केल्‍या पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

03.   विरुध्‍दपक्षाला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविली असता सदर नोटीस त्‍याला प्राप्‍त झाल्‍याची रजि.पोच अभिलेखावरील पान क्रं 37 वर उपलब्‍ध आहे परंतु विरुध्‍दपक्ष हा ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाला नाही वा त्‍याने लेखी निवेदन दाखल केलेले नाही म्‍हणून त्‍याचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ग्राहक मंचाने दिनांक-30/09/2019 रोजी प्रकरणात पारीत केला.

04.   तक्रारकर्त्‍याने पान क्रं 12 वरील दस्‍तऐवज यादी नुसार एकूण-06 दस्‍तऐवजाच्‍या प्रती  दाखल केल्‍यात ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे भूखंडा संबधी करुन दिलेल्‍या मुखत्‍यारपत्राची प्रत, विरुध्‍दपक्षाचे ले आऊटचा नकाशा प्रत, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे देऊ केलेल्‍या पोस्‍ट डेटेड धनादेशाची प्रत, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेला धनादेश न वटल्‍या बाबत बॅंकेच्‍या रिर्टन मेमोची प्रत, तक्रारकर्त्‍याने विरध्‍दपक्षाला रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस प्रत आणि रजिस्‍टर पोस्‍टाच्‍या पावत्‍या अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच तक्रारकर्त्‍याने पान क्रं 28 ते 30 वर शपथपत्र तसेच पान क्रं-40 व 41 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

05.    तक्रारकर्त्‍याची तक्रार,शपथपत्र तसेच त्‍याने प्रकरणात दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले तसेच तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री लांडगे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक न्‍यायमंचा समोर निर्णयार्थ खालील मुद्दे उपस्थित होत असून त्‍यांचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक होतो काय?

-होय-

02

विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

03

काय आदेश?

अंति‍म आदेशा नुसार

 

 

 

                                                                                        ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं 1 ते 3-

06.     सदर प्रकरणातील दस्‍तऐवजांचे ग्राहक मंचा तर्फे अवलोकन केले असता त्‍यावरुन असे दिसून येते की, विरुध्‍दपक्ष हा श्री साईकृपा असोसिएट अॅन्‍ड डेव्‍हलपर्स, नागपूर या नोंदणीकृत फर्मचे नावे भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करतो तसेच त्‍याने सदर फर्मचे वतीने तीन वर्षामध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम दुप्‍पट देण्‍याची योजना सुध्‍दा आखली होती. संबधित ग्राहकास म्‍हणजे तक्रारकर्त्‍यास दामदुप्‍पट रक्‍कम परत करण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले होते आणि त्‍याचे आश्‍वस्‍ततेपोटी तक्रारकर्त्‍यास त्‍याने गुंतवणूक केलेल्‍या रकमेपोटी तीन वर्षा नंतर दुप्‍पट एवढया रकमेचा पोस्‍टडेटेड धनादेश सुध्‍दा दिला होता तसेच जास्‍तीची काळजी म्‍हणून विरुध्‍दपक्षाने पाडलेल्‍या मौजा मेहगाव, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील खसरा क्रं 27/51 मधील भूखंड क्रं-30, क्षेत्रफळ-821 चौरसफूटचे आममुखत्‍यारपत्र सन-2015 मध्‍ये स्‍टॅम्‍पपेपरवर नोटरी समोर तसेच दोन साक्षीदारांसमोर तक्रारकर्त्‍याचे नावे लिहून दिले होते आणि सदर मुखतयारपत्रावर तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष यांची छायाचित्रे व सहया असून दोन साक्षीदारांनी सुध्‍दा सहया केलेल्‍या आहेत. यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, विरुध्‍दपक्ष हा नोंदणीकृत फर्मचे नावे भूखंड विक्रीचा व्‍यवसाय करीत असून तो फर्मचे वतीने गुंतवणूक केलेली रक्‍कम तीन वर्षात दुप्‍पट देण्‍याची योजना सुध्‍दा राबवितो. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाचे दामदुप्‍पट योजने मध्‍ये रक्‍कम गुंतवणूक केलेली असल्‍याने तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक ठरतो आणि म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

07.   अभिलेखावरील पान क्रं 13 ते 17 वर आममुखत्‍यारपत्राची प्रत जी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे नोटरी व साक्षीदार समोर लिहून दिलेली आहे ती दाखल असून त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्षाने त्‍याचे मौजा मेहगाव, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील  खसरा क्रं 27/51, पटवारी हलका क्रं-22 मध्‍ये पाडलेल्‍या ले आऊट मधील भूखंड क्रं-30, क्षेत्रफळ 821 चौरसफूटाचे मुखत्‍यारपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे करुन दिलेले आहे. सदर आममुखत्‍यारपत्रात विरुध्‍दपक्षाने असेही लिहून दिलेले आहे की, तक्रारकर्त्‍याने दामदुप्‍पट योजने प्रमाणे एकमुस्‍त रक्‍कम रुपये-54,500/- दिनांक-28.04.2015 रोजी नगदी गुंतविली असून दामदुप्‍पट योजने प्रमाणे विरुध्‍दपक्षाने सदर फर्मचे वतीने तक्रारकर्त्‍याचे नाव बॅंक ऑफ बडोदा, जरीपटका, नागपूर-440014  येथील शाखेचा पोस्‍ट डेटेड धनादेश क्रं-000259, दिनांक-28.04.2018 रोजीचा रक्‍कम रुपये-1,09,000/- रकमेचा दिलेला आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 19 वर सदर पोस्‍ट डेटेड धनादेशाची प्रत सुध्‍दा दाखल केलेली आहे. यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, विरुध्‍दपक्षाने फर्मचे वतीने तक्रारकर्त्‍यास तीन वर्षात गुंतवणूक केलेली रक्‍कम दुप्‍पट देण्‍याचे आश्‍वस्‍त केले होते. सदर आममुखत्‍यारपत्राव्‍दारे विरुध्‍दपक्षाने असेही लिहून दिले होते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याचे  नावे देऊ केलेल्‍या पोस्‍ट डेटेड धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मिळाल्‍या नंतर सदर भूखंडाचे मुखत्‍यारपत्र रद्द होईल.

08. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे, विरुध्‍दपक्षाने दिलेला पोस्‍ट डेटेड धनादेश हा परिपक्‍वता दिनांक-28.04.2018 रोजी उलटल्‍या नंतर तो वटविण्‍यासाठी बॅंकेत जमा केला असता सदरचा धनादेश पुरेसा निधी नसल्‍याचे कारणावरुन दिनांक-03.07.2018 रोजी बॅंकेने त्‍याला परत केला. आपले या कथनाचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने पान क्रं 21 वर बॅंक ऑफ महाराष्‍ट्र दिनांक-03 जुलै, 2018 रोजीचे चेक रिर्टन मेमोची प्रत अभिलेखावर दाखल केली, त्‍यामध्‍ये अपर्याप्‍त निधीमुळे धनादेश वटविल्‍या गेला नाही असा बॅंकेचा शेरा नमुद आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने देऊ केलेला पोस्‍ट डेटेड धनादेश परिपक्‍वता तिथी नंतर वटविल्‍या न गेल्‍यामुळे त्‍याची फसवणूक झाल्‍याचे दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द होत असल्‍याने तक्रारकर्त्‍याचे कथनाला बळकटी प्राप्‍त होते. त्‍याने  विरुध्‍दपक्षाचे दामदुप्‍पट योजने मध्‍ये रक्‍कम गुंतवणूक केल्‍या नंतरही परिपक्‍वता तिथी उलटून आज पर्यंत  रक्‍कम मिळाली नसल्‍याने विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.  गुंतवणूक केलेली रक्‍कम आज पर्यंत न मिळाल्‍यामुळे साहजिकच तक्रारकर्त्‍याचे व्‍याजाचे सुध्‍दा नुकसान होत आहे आणि त्‍यामुळे त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब स्‍वंयस्‍पष्‍ट आहे आणि त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

09.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती आणि पुरावे पाहता तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षा कडून परिपक्‍वता तिथी-28/04/2018 रोजी देय असलेली रक्‍कम रुपये-1,09,000/- परत करण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल तसेच सदर परिपक्‍व रक्‍कम रुपये-1,09,000/- वर दिनांक-01.05.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दयावे असे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्‍दपक्षा कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्त्‍याला ग्राहक मंचाचे आदेशा प्रमाणे परिपक्‍व रक्‍कम देय व्‍याजासह आणि नुकसान भरपाईची रक्‍कम तसेच तक्रारीचा खर्च मिळाल्‍या नंतर सदर भूखंडाचे आममुखत्‍यारपत्र रद्द समजण्‍यात येईल.

10.     उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार आणि दाखल पुरावे पाहता  ग्राहक मंच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.

                                                                           :: अंतिम आदेश ::

01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष साईकृपा असोसिएट अॅन्‍ड लॅन्‍ड डेव्‍हलपर्स नागपूर नोंदणी क्रं-(11/72-416)09 आणि सदर  फर्मचा श्री धमेंद्र बाबुलाल रेड्डी यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02)   विरुध्‍दपक्ष फर्म आणि श्री धमेंद्र बाबुलाल रेड्डी याला असे आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने तक्रारकर्त्‍याला परिपक्‍वता तिथी-28/04/2018 रोजी देय असलेली रक्‍कम रुपये-1,09,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष नऊ हजार फक्‍त परत करावी आणि सदर परिपक्‍वता रक्‍कम रुपये-1,09,000/- वर दिनांक-01.05.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला दयावे.

03)   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये- 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास दयावेत.

04)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष साईकृपा असोसिएट अॅन्‍ड लॅन्‍ड डेव्‍हलपर्स नागपूर नोंदणी क्रं-(11/72-416)09 आणि सदर  फर्मचा श्री धमेंद्र बाबुलाल रेड्डी याने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्‍दपक्ष फर्म आणि सदर  फर्मचा श्री धमेंद्र बाबुलाल रेड्डी यांनी विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-02 प्रमाणे विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला परत करावयाची परिपक्‍व रक्‍कम रुपये-1,09,000/- दिनांक-01.05.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15% दराने दंडनीय व्‍याजासह परत करण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्षाची राहिल.

05) तक्रारकर्त्‍याला ग्राहक मंचाचे आदेशा प्रमाणे परिपक्‍व रक्‍कम देय व्‍याजासह आणि नुकसान भरपाईची रक्‍कम तसेच तक्रारीचा खर्च मिळाल्‍या नंतर सदर भूखंडाचे आममुखत्‍यारपत्र रद्द होईल या दृष्‍टीने मुखत्‍यारपत्र रद्द लेख तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षास लिहून दयावा व विरुध्‍दपक्षाने सुध्‍दा त्‍याला योग्‍य ते सहकार्य करावे.

           06)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

           07)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.