Maharashtra

Satara

cc/14/218

Mrs. Padmaja Umakant Dalvi - Complainant(s)

Versus

Dharmaveer Sambhaji Sahkari Patsanstha, Shahupuri, Satara - Opp.Party(s)

Anand Kadam

08 May 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 218/2014.

                                                                                                         तक्रार दाखल दि.26-12-2014.

                                                                                                         तक्रार निकाली दि. 8-5-2015. 

 

श्रीमती पद्मजा उमाकांत दळवी.

रा.149, पारिजात, एल.आय.सी.कॉलनी,

गेंडामाळ, शाहुपुरी, सातारा.                       ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

  1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था मर्या.

  शाहुपुरी, सातारा.

  1. बाळासाहेब कम‍लगिरी गोसावी, संस्‍थापक.

   रा.25 जिल्‍हा परिषद कॉलनी, शाहुपुरी,

   सातारा.

  1. हणमंतराव बाबासाहेब चवरे, चेअरमन.

  रा.मु.खंडोबाचीवाडी, पो.गोवे, ता.जि.सातारा.

  1. दिलीप रामचंद्र ताटे, व्‍यवस्‍थापक.

  रा.मु.पो.लिंब, ता.जि.सातारा.                ....  जाबदार

 

 

                 तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम.  

                 जाबदार क्र.1 ते 4 - एकतर्फा.   

 

                                 न्‍यायनिर्णय 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला

                       

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

        तक्रारदार या वर नमूद पत्‍त्‍यावर पूर्वीपासून रहातात.  जाबदार पतसंस्‍था ही सहकार कायदयाप्रमाणे स्‍थापन झालेली पतसंस्‍था असून ग्राहकाकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकांनी रक्‍कम मागितल्‍यास ती त्‍यांना सव्‍याज परत देणे अशा स्‍वरुपाचे हेतूने ही पतसंस्‍था स्‍थापन झालेली आहे.  बाळासाहेब गोसावी जाबदार क्र.1 हे सदर पतसंस्‍थेचे संस्‍थापक आहेत.    तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत दि.12-1-2000 रोजी खाते क्र.1884 मध्‍ये 25 महिन्‍याचे मुदतीसाठी 15.5 टक्‍के व्‍याजदराने रक्‍कम रु.10,000/- मुदत ठेव स्‍वरुपात ठेवले होते.  सदर ठेवपावतीची मुदत दि.12-1-2001 रोजी संपलेली आहे.  त्‍यानुसार तक्रारदाराना मुदत संपलेनंतर सदरच्‍या ठेव पावतीवरील  रक्‍कम रु.10,000/- व त्‍यावरील पावतीवरील नमूद व्‍याजदरासह आजपर्यंत होणारे व्‍याज इतकी रक्‍कम जाबदारांकडून व्‍याजासह येणे बाकी आहे.    तक्रारदारानी ठेवपावतीची मुदत संपलेनंतर जाबदारांकडे वारंवार ठेवपावतीची व बचत खात्‍यावरील शिल्‍लक रक्‍कम सव्‍याज मागितली असता जाबदारानी प्रत्‍येकवेळी तक्रारदारांना आज देतो, उदया देतो अशी खोटी आश्‍वासने देऊन व थातुरमातूर कारणे सांगून रक्‍कम देणेस टाळाटाळ करुन आजपर्यंत वेळ मारुन नेलेली आहे.   तक्रारदार या वयोवृध्‍द महिला असल्‍याने त्‍यांचे भोळेपणाचा फायदा घेऊन जाबदारानी तक्रारदाराकडून मूळ ठेवपावती जमा करुन घेऊन चार दिवसात सव्‍याज रक्‍कम देतो असे सांगून तक्रारदाराकडून मूळ ठेवपावती जमा करुन घेतलेली आहे.  त्‍यानंतर आजपर्यंत जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांची ठेव सव्‍याज परत दिलेली नाही.  तक्रारदार या जुलै 2014 मध्‍ये जाबदार क्र.2 यांचे घरी ठेव रक्‍कम परत मागणेसाठी गेल्‍या असता जाबदार क्र.2 यानी तक्रारदाराना ठेव रक्‍कम अदा न करता तेथून हाकलून दिले व रक्‍कम देणार नसलेचे स्‍पष्‍ट बोलून दाखवले.   तक्रारदारानी जाबदाराना दि.23-7-2014 रोजी वकीलांतर्फे नोटीस पाठवून ठेव पावतीवरील रकमेची सव्‍याज मागणी केली.  सदर नोटीस जाबदार 2 व 4 यानी दि.24-7-14 रोजी स्विकारलेली असून जाबदार 3 यानी दि.26-7-14 रोजी स्विकारलेली आहे.  सदर नोटीसा स्विकारुनही जाबदारानी तक्रारदाराना अदयाप त्‍यांची ठेव रक्‍कम परत केलेली नाही.   तक्रारदार या वयोवृध्‍द महिला असून त्‍याना उत्‍पन्‍नाचे कोणतेही साधन नाही.  सध्‍या त्‍या सातारा येथे एकटयाच रहातात.  त्‍यांना सदर रकमेची औषधोपचारासाठी व घरखर्चासाठी नितांत आवश्‍यकता आहे.  त्‍यासाठी तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार हेलपाटे मारुन रकमेची मागणी केली असता प्रत्‍येक वेळी जाबदारानी तक्रारदाराना रक्‍कम देणेस स्‍पष्‍ट नकार दिला म्‍हणून तक्रारदारानी नाईलाजास्‍तव सदर तक्रारअर्ज जाबदारांकडून तक्रारदारांची ठेवपावतीवरील रक्‍कम वसूल होऊन मिळणेसाठी या मंचात दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराना ठेव रकमेची सध्‍या घरगुती कारणासाठी, वैयक्तिक कारणासाठी, औषधोपचारासाठी नितांत आवश्‍यकता होती व आहे.  तसेच जाणीवपूर्वक तक्रारदारांची मूळ ठेवपावती काढून घेऊन ठेव रक्‍कम न देऊन तक्रारदारांची फसवणूकही केलेली आहे.  तक्रारदाराना जाबदारांनीच सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल करणे भाग पाडले आहे.    तक्रारदाराना भयंकर शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सोसावा लागलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदाराना शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई मागणेचा हक्‍क प्राप्‍त झालेला आहे.  तक्रारीस कारण दि.16-12-14 रोजी तक्रारदार या जाबदारांकडे रक्‍कम मागणेस गेल्‍या असता जाबदारानी तक्रारदाराबरोबर भांडणे काढून रक्‍कम देणेस स्‍पष्‍ट नकार दिला व त्‍यासुमारास मे.मंचाचे स्‍थळसीमेत घडले आहे.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारानी सेवेत त्रुटी व कमतरता केली असल्‍यानेच सदर तक्रारीची दखल घेणेचा अधिकार मे.मंचास आहे याशिवाय अन्‍य कोणत्‍याही कोर्टात तक्रारअर्ज दाखल केलेला नाही.   जाबदारानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना ठेवपावतीवरील व बचत खात्‍यावरील एकूण रक्‍कम रु.10,000/- एक महिन्‍याचे आत सव्‍याज अदा करणेचे आदेश करणेत यावेत, ठेवपावत्‍यांची मुदत संपले तारखेपासून रक्‍कम रु.10,000/-वर प्रत्‍यक्ष रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज जाबदारानी तक्रारदारास देणेचे आदेश करणेत यावेत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- जाबदारानी तक्रारदाराना देणेचे आदेश करणेत यावेत व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5000/- तक्रारदाराना जाबदाराकडून मिळावेत अशा मागण्‍या तक्रारदारानी विनंती कलमात केलेल्‍या आहेत. 

 

2.       नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे तक्रारदाराचा अँड.कदम याना वकील म्‍हणून नियुक्‍तीचा परवानगी अर्ज, नि.4 कडे अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 कडे तक्रारदाराची जाबदार संस्‍थेत ठेवलेली मुदतठेव पावतीची झेरॉक्‍स, नि.5/2 कडे अँड.कदम यांची जाबदारांस पाठवलेली रजि.नोटीस, नि.5/3 कडे नोटीसा पाठवलेच्‍या पावत्‍या, नि.5/4 कडे जाबदारांच्‍या पोहोचपावत्‍या, नि.5/5 कडे सहा.निबंधक यानी जाबदाराना दिलेल्‍या पत्राची प्रत, नि.6 कडे पत्‍तामेमो, नि.7 कडे तक्रारदाराची पुरसीस की, तक्रारअर्जासोबत दिलेले प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्‍तीवाद समजावा तसेच कोणताही जादा पुरावा देणेचा नाही.  नि.8 कडे जाबदार क्र.4 दिलीप ताटे यांचे मालक घेत नाही म्‍हणून परत आलेला लखोटा.  सदर कामी जाबदार क्र.1 ते 4 यांना नोटीसा लागू होऊनही ते मंचात गैरहजर राहिले व त्‍यांनी म्‍हणणेही दिलेले नाही म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द दि.2-2-15 रोजी नि.1 वर एकतर्फा आदेश पारित करणेत आलेले आहेत.  त्‍यामुळे सदर कामी जाबदारांचे म्‍हणणे नाही.

 

3.       तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावा म्‍हणून दाखल केलेली मूळ ठेवपावतीची झेरॉक्‍स इ.चे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

 

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार हे जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक आहेत काय?                होय.    

 2.  जाबदार हे तक्रारदार यांचे सेवापुरवठादार

     आहेत काय?                                               होय.

 3.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 4.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 5.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर.

विवेचन-

4.         मुद्दा क्र.1 ते 4 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  जाबदार पतसंस्‍था ही लोकांचे पैसे विविध खात्‍यांवर ठेवून घेते व त्‍यावर वेगवेगळया पध्‍दतीने ठेवीदारास व्‍याज देते.  तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्‍यावर व्‍याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्‍यवहार-व्‍यापार चालतो.  तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये रक्‍कम रु.10,000/-ची मुदतठेवपावती ठेवलेली होती.  यावरुन तक्रारदार ही जाबदार क्र.1 पतसंस्‍थेची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तसेच जाबदार पतसंस्‍था रकमा ठेवून घेते व त्‍यावर व्‍याज देते त्‍यामुळे जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  जाबदारानी तक्रारदार हिची रक्‍कम आजपर्यंत परत केली नसल्‍यामुळेच त्‍यांचेकडून त्‍यांच्‍या-(जाबदारांच्‍या) कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला दयावयाच्‍या सेवेत त्रुटी झालेली आहे.  आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही, ती त्‍यांनी त्‍यांना सव्‍याज परत केली पाहिजे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 4 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.  त्‍यामुळे सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 ते 3 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबदार क्र.4 याना फक्‍त संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.  

5.        सदर कामातील तक्रारदार या महिला असून वयोवृध्‍द आहेत. जाबदारानी तक्रारदारांच्‍या एकटेपणाचा व वयोवृध्‍दपणाचा व भोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्‍यांना मूळ पावती जमा करुन घेऊन चार दिवसात सव्‍याज रक्‍कम देतो असे जाबदारांनी सांगून त्‍यांचेकडून मूळ ठेवपावती जमा करुन घेतली आहे परंतु आजपर्यंत कोणतीही रक्‍कम दिलेली नाही. त्‍यामुळे त्‍यानी जाबदार क्र.1 पतसंस्‍थेत ठेवलेल्‍या मुदतठेव पावतीची सदर कामात झेरॉक्‍स जोडलेली आहे.  त्‍याना उत्‍पन्‍नाचे कोणतेही साधन नाही.  या जाबदारांच्‍या कृत्‍यामुळे जाबदारांनी मुद्दामच तक्रारदारांचे पैसे परत न देता बुडविणेचे दुष्‍ट हेतूनेच मूळ ठेवपावती काढून घेतलेली आहे.  यावरुन जाबदारांचे वर्तन किती निर्दय, कठोर व स्‍वार्थी आहे हे सिध्‍द होते.  म्‍हणूनच तक्रारदाराची मुदतठेवपावतीची झेरॉक्‍सप्रत ही मे.मंचाने दुय्यम पुरावा (Secondary evidence) म्‍हणून ग्राहय धरलेले आहे.  त्‍यामुळे जाबदारांच्‍या या वर्तनामुळे तक्रारदारास शारिरीक, व मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे व जाबदारांच्‍या वर्तनामुळेच कोर्टखर्चालाही सामोरे जावे लागले आहे. 

 

6.         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                           आदेश

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

 

2.  तक्रारदार यांना खाते क्र.1884 ची रक्‍कम रु.10,000/- व त्‍यावर दि.12-1-2000 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्‍थेचे नियमाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1,2,व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबदार क्र.4 यानी संयुक्‍तीकरित्‍या अदा करावी. 

 

3.     वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 4 यानी 45 दिवसाचे आत करावे.  तसे न केलेस आदेश पारित तारखेपासून सव्‍याज होणा-या रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.10 टक्‍के दराने सव्‍याज रक्‍कम दयावी लागेल.

 

4.    तक्रारदारास जाबदार क्र.1,2 व 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.4 यांनी संयुक्‍तीकरित्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत.

 

5.   जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील. 

 

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि.  8-5-2015.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.