Maharashtra

Satara

CC/11/59

Damyanti Ravindr Kurle - Complainant(s)

Versus

Dharmaveer Sambhaji Sahakari Pathsanstha Shawhupuri SataraSansthapak, Balashaib K.Gosavi - Opp.Party(s)

Kadam

29 Jun 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 59
1. Damyanti Ravindr Kurle331 Shivajinagar Sahupuri SataraSataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Dharmaveer Sambhaji Sahakari Pathsanstha Shawhupuri SataraSansthapak, Balashaib K.GosaviSahupuri SataraSataraMaharashtra2. Balashaib K.Gosavi, SansathapakSahupuri, SataraSataraMaharashtra3. Chairman, Hunmantrao Babasahib ChavreKhandobachiwadi Post Gove Tal Dist SataraSataraMaharashtra4. W.Chairman, Rajesh A.Majgawkar247 Somwarpeth SataraSataraMah5. Sanchalak ,P.R.ChawanSataraSataraMaha6. K.Y.GongawaleSatara7. S.S.JadhavSatara8. R.B.ChawanSatara9. B.M.ChawanSatara10. N.S.ShindeSatara11. M.B.KhandagaleSatara12. R.B.GosawiSatara13. Sanchalika, Sou.M.S.SontakkyeSatara ...........Respondent(s)


For the Appellant :Kadam, Advocate for
For the Respondent :

Dated : 29 Jun 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

                                                            नि.24

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर

 

                                          तक्रार क्र.59/2011

 

                                    नोंदणी तारीख 30/03/2011

                                    निकाल तारीख 29/06/2011

                                    निकाल कालावधी 78 दिवस

 

श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष

श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या

श्री सुनिल कापसे, सदस्‍य

 

(श्री सुचेता मलवाडे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)

------------------------------------------------------------------------------------

 

1.  दमयंती रविंद्र कुर्ले

    रा.331, शिवाजीनगर,शाहूपूरी,

    सातारा                                       ---- अर्जदार

                                            (अभियोक्‍ता श्री.कदम)

      विरुध्‍द

 

1.  धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था

    मर्या. शाहुपूरी, सातारा

   ( सदरचे समन्‍स संस्‍थापक बाळासाहेब कमलगिरी

     गोसावी यांचेवर बजावणेत यावे) तर्फे

2.  संस्‍थापक अध्‍यक्ष,

    श्री बाळासाहेब कमलगिरी गोसावी

    रा. 25, कर्मयोग, झेड.पी.कॉलनी,

    शाहुपूरी, सातारा ता.जि.सातारा 

 

3.  चेअरमन, श्री हणमंतराव बाबासाहेब चवरे

    रा. मु.खंडोबाची वाडी, पो.गोवे, ता.जि.सातारा

4.  व्‍हाईस चेअरमन,श्री राजेश अशोक माजगांवकर

    रा. 247, सोमवार पेठ, सातारा  

5.  संचालक, प्रतापराव रावसाहेब चव्‍हाण

    रा. मु.पो. लिंब, ता.जि.सातारा

   (नि.नं.20 अन्‍वये वगळले)

6.  संचालक, कलेराव यदू गोगावले,

   रा. रामनगर, पो. वर्ये, ता.जि.सातारा

7.  संचालक, सुभाष शिवाजी जाधव,

   रा. मु.पो. नेले, ता.जि.सातारा

8.  संचालक, रमेश विठ्ठल चव्‍हाण,

   रा. मु. कामाथी, पो. वेळे, ता.जि.सातारा

9. संचालक, विठ्ठल महादेव चव्‍हाण

   रा. हॉटेल सृष्‍टी, शाहूपूरी, सातारा

10. संचालक, नवीनकुमार शिवाजी शिंदे

   रा. लक्ष्‍मीनगर, अंबेदरे, शाहूपूरी, सातारा

11. संचालक, बब्रू वाहन पांडूरंग माळी

   रा. 16, जयहिंद कॉलनी, शाहूपूरी, सातारा

12. संचालक, मारुती भिमराव खंडागळे

   रा. मु. दिव्‍यनगरी, पो. कोंडवे, ता.जि.सातारा

13. संचालक, राजेंद्र भानुदासगिरी गोसावी

   रा. 4, गडकर अळी, सातारा

14. संचालिका, सौ. मंगला शामराव सोनटक्‍के

   रा  समता पार्क, शाहूपूरी, सातारा                      ----- जाबदार

                                                      

 

न्‍यायनिर्णय

 

    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे.  अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -

 

1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. तसेच आवर्त (रिकरिंग) ठेव व बचत ठेव खात्‍यांमधे रक्‍कम ठेवलेली आहे. अर्जदार यांची मुदत ठेवींची मुदत संपलेली आहे.  मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली.  तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजसहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली.  अर्जदार यांनी जाबदार यांना दि.23/1/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्‍टर्ड पोस्‍टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली.  सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्‍तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्‍कमही परत दिलेली नाही.  थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे.  अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत.  त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतींची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे.  सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी एकूण रक्‍कम रु. 5,28,254/- मागणी केलेली आहे.

 

2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.3, 7, 8, 9  व 12  यांना झालेली आहे.  नोटीस मिळालेची पोचपावती प्रस्‍तुतकामात दाखल आहे.  जाबदार क्र.1, 2, 10, 11, 13 व 14 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही.  नोटीस न स्‍वीकारलेबाबतचे पोस्‍टाचे शेरे असलेले लखोटे नि.  ते   ला दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 3, 6 ते 9 व 10 ते 14 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबत नि.19 कडील अर्जदार यांचे अॅफीडेव्‍हीट नुसार जाबदार क्र. 1 ते 3, 6 ते 9 व 10 ते 14  विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.  जाबदार क्र. 5  यांना नि.20 कडील आदेशानुसार वगळणेत आले.

3.    अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली.  तसेच अर्जदार यांनी नि.21 ला दाखल केलेली पुरशिस पाहिली.

 

4.    जाबदार क्र. 4 यांनी निशानी 15 कडे कैफीयत देवून अर्जदारांची तक्रार नाकारली आहे.  या जाबदारांचे कथनानुसार जाबदार संस्‍थेकडे दि.26/11/10 रोजी संचालक पदाचा व व्‍हा. चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे.  निर्विवादपणे राजीनामा पञाची झेरॉक्‍स प्रत जाबदाराने दाखल केली आहे त्‍यावरती पोहोच दिसून येत नाही.  तसेच राजीनामा मा. सहायक निबंधक यांनी मंजूर केलेचा कोणता पुरावा नाही अथवा संचालक पदावरुन जाबदार नं. 4 यांचे नांव कमी झालेबाबतचा कोणता पुरावा नाही.  सबब प्रस्‍तुत जाबदाराचे कथन मान्‍य करता येणार नाही. 

 

5.    एक गोष्‍ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्‍था या संस्‍थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्‍या पदावर काम करणा-या व्‍यक्‍तीने प्रस्‍तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्‍वीकारणे व नेमलेल्‍या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते.  तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत.  जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही.  सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्‍ये केलेली विनंती अंशतः मान्‍य करणे जरुरीचे आहे.

 

6.  अर्जदार यांनी नि. 1 सोबत नि. 2 कडे शपथपत्र दाखल केले असून ‍नि.5 सोबत नि. 5/1, नि. 5/2, नि. 5/3, कडे ठेव पावत्‍यांच्‍या मुळ प्रति, नि.5/4 कडे सेव्‍हींगचे व नि. 5/5  कडे रिकरिंगचे मुळ पासबुके दाखल केलेली आहेत.  प्रस्‍तुत ठेव पावत्‍यांचे व सेव्‍हींग व रिकरिंग पासबुकांचे अवलोकन केले असता अर्जदार यानी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते.  तसेच प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेचेही  स्‍पष्‍ट दिसत आहे,  सबब निशानी 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि. 5 /6 कडील ठेव रक्‍कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेले पत्र पाहता अर्जदार यांनी वेळोवेळी ठेव रकमेची  मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे.  सब जाबदाराने अर्जदाराच्‍या  प्रस्‍तुत तक्रारीतील फेरीस्‍त नि. 5 /1 ते 5 /3 कडील ठेव पावत्‍यांच्‍या रकमा पावत्‍यांवरील नमूद व्‍याजासह द्यावी व मुदत संपल्यानंतर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने होणा-या व्‍याजासह द्यावी तसेच नि. 5 /4 कडील सेव्‍हींग  व नि. 5 /5 कडील रिकरिंग खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कमा नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्याव्‍यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.      

 

7. या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.

 

आदेश

1.  अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.

2.  आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 4, व 6 ते 14 यांनी         वैयक्तिकरित्‍या व  संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना त्‍यांची दामदुप्‍पट ठेव पावती

 

 

क्र. 3955, 000760, 000959, 000954, 0001090, 3964  कडील  रकमा  ठेव ठेवलेल्‍या  तारखेपासून  पावतीत नमूद व्‍याजासह रक्‍कम दयावी  तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के देय होणा-या  व्‍याजासह  द्याव्‍यात.

3.   आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 4, व 6 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व  संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना त्‍यांची रिकरिंग ठेव पासबुक क्र.742/4/106 कडील शिल्‍लक रक्‍कम तसेच बचत खाते क्र. 1034/3/192 कडील शिल्‍लक रक्‍कम नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्याव्‍यात.

 

4.  जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना एकूण रक्‍कम  रु. 5,000/- द्यावी.

5.  जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत

    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.

6.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.

 

सातारा

दि. 29/06/2011

 

 

 

      सही                     सही                     सही

(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)

   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष

 

 

 

 

 

 


Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER