जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/127 प्रकरण दाखल दिनांक – 05/06/2009. प्रकरण निकाल दिनांक –04/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. सुभाष पि. नरसप्पा बिरादार वय, 60 वर्षे, धंदा नौकरी रा. साधना नगर, देगलूर जि. नांदेड. अर्जदार विरुध्द 1. धनश्री सेल्स कॉर्पोरेशन, प्रोप्रा. शिंदे साहेब, कोकाटे कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर,नांदेड. गैरअर्जदार 2. सिंटेक्स इंडस्टि्रज लि. कलोल (उत्तर गुजरात) अर्जदारा तर्फे. - अड.शिवराज पाटील. गैरअर्जदार क्र.1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदारांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी दि.09.11.2008 रोजी एक सिंटेक्स सोलर वॉटर हिटर पाण्याची क्षमता 250 लिटर हा रु.20,610/- ला गैरअर्जदार यांचेकडून खरेदी केला होता. त्यावेळी त्यांनी चार वर्षाची गॅरंटी/वॉरंटी दिली होती. त्यानंतर दिड वर्षाचे आंत गरम पाणी साठवीणा-या टाकीच्या जोडलेलया ठिकाणी भंग होत असल्याचे आढळले म्हणजे टाकी निकामी झाली होती. वॉरंटीत असतानाही गैरअर्जदार यांचेकडे अनेक वेळ तक्रार करुन देखील त्यांनी गरम पाण्याची टाकी बदलून दिली नाही. म्हणून झालेल्या सेवेतील ञूटी बददल रु.50,000/-, मानसिक ञासाबददल रु.2,000/- व सोलार वॉटर हिटर बदलून मिळावा म्हणून मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस तामील होऊनही व त्यांना म्हणणे देण्याची संधी दिली असतानाही गैरहजर राहीले म्हणून एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 कंपनी यांना नोटीस तामील होऊनही व त्यांना म्हणणे देण्याची संधी दिली असतानाही गैरहजर राहीले म्हणून एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच अर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना दि.09.11.2008 रोजीचे दिलेले बिल दाखल केलेले आहे. यात सिंटेक्स सोलर वॉटर हिटर 125 एलपीडी असा उल्लेख केला असून एकूण रु.10,630/- चे बिल आहे, असे असताना अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात गैरअर्जदारांना रु.20,610/- चा वॉटर हिटर विकत घेतल्याचे सांगितले आहे. ज्यात फार मोठी तफावत आहे. बिलात चार वर्षाची गॅरंटी असा डिलरने उल्लेख केलेला आहे. सोबत वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही. म्हणजे सिंटेक्स गरम पाण्याची टँक जाईट मधून लिक झालेले आहे म्हणून ती बदलून मिळावी यासाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दि.07.02.2009, 20.12.2008, 22,08.2008, 02.09,2008, व दि.07.01.2009 रोजी पञव्यवहार करुन तक्रार दिलेली होती परंतु यासाठी नांदेड येथील लोकल डिलर यांनी तक्रार दूर करण्यावीषयी काही स्टेप घेतल्या काय यावीषयी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी असतानाही ते समोर आलेले नाहीत. प्रकरण यूक्तीवादास लागल्याचे नतंर गैरअर्जदार क्र.2 यांनी पोस्टाने आपले म्हणणे पाठविले होते. परंतु प्रकरण एकतर्फा झाले असल्यामूळे व तो आदेश रदद करण्याचा अर्ज नसल्यामूळे त्यांचे म्हणणे वाचता येणार नाही परंतु कंपनीने पाठविलेले कागदपञ पाहता येतील. यात दि.16.07.2009 रोजीच्या इन्हाईस प्रमाणे सोलार वॉटर हिटर 250 लिटर इन्सूलेटेड टँक हे गैरअर्जदार क्र.1 च्या नांवे बिल करुन पाठविण्यात आलेले आहे व कंपनीने पाठविल्या बददलचा पूरावा म्हणून ASSOCIATED ROAD CARRIERS LIMITED या ट्रान्सपोर्टचे एलआर सोबत जोडलेले आहेत म्हणजे कंपनीने अर्जदाराची तक्रार दूर करण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 त्यांचे लोकल डिलर यांचेकडे पाठविले व त्यांनी तो अर्जदारास बदलून दिला का नाही याबददल गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कोणताही पूरावा आलेला नाही किंवा अर्जदार यांनी देखील तसे कबूल केलेले नाही. त्यामूळे प्रत्यक्ष अर्जदाराची तक्रार दूर झाली का नाही हे समोर येत नाही. नादूरुस्त टँक बदलून न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकञित व संयूक्तरित्या सोलार वॉटर हिटर 250 लिटरचा वॉटर स्टोरेज टँक विनाविलंब वॉरंटीत बदलूर दयावा. 3. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |