Maharashtra

Kolhapur

CC/10/13

Dhanaji Parshuram Sarwalkar - Complainant(s)

Versus

Dhanlaxmi Gramin Bigar Shethi Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)

B.D.Shelke/S.G.Nathbua

06 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/13
1. Dhanaji Parshuram SarwalkarR/o.Kaneriwadi, (Yashoda Nagar), Tal-Karvir, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Dhanlaxmi Gramin Bigar Shethi Pat Sanstha MaryaditMouje Sangaon, Tal.Kagal, Dist.Kolhapur.2. Shri Raghunath Mhasu Jadhav, Chairman3. Shri Gajanan Dattatray SolaseVice Chairman4. Shri Dilip Pandurang Shinde, Director(Deleted as per order of this Forum dtd.17.06.2010)5. Shri Anil Shankar EkandeDirector6. Shri Pandurang Dnyanu Patil,Director7. Shri Mahadeo Ganu PatilDirector8. Shri Balaso Raghunath Patil,Director9. Shri Vasant Ganu HegadeDirector10. Sunita Sanjay PatilDirector11. Sushil Pravin Nimbalkar, DirectorAll R/o.Mouje Sangaon, Tal.Kagal, Dist.Kolhapur12. Shri Sanjay Hari Patil, ClerkAs above ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :B.D.Shelke for the complainant

Dated : 06 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 5 ते 7, 10 ते 12 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत ठेव स्‍वरुपात रुपये 8,700/- पावती क्र.298 ने दि10.07.2000 रोजी ठेवले होत. सदर ठेवीची मुदत दि.10.01.2007 रोजी संपली.  सदर ठेवींची तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे वारंवार मागणी केली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांची सदर ठेव रक्‍कम अदा केले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावती, जमा पावतीची सत्‍यप्रत व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.2, 5 ते 7 व 10 ते 12 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.3, गजानन दत्‍तात्र सोळसे यांचा सामनेवाला संस्‍थेशी काहीही संबंध नाही. तसेच, सामनेवला क्र.4, दिलीप पांडुरंग शिंदे हे दि.01.11.2009 रोजी मयत झाले असलेने सामनेवाला संस्‍थेशी त्‍यांचा सध्‍या काहीही संबंध नाही. 
 
(6)        सामनेवाला त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये दि.10.07.2002 रोजी पावती नं.298 ने रुपये 8,700/- ठेवले. त्‍याची मुदत दि.10.01.2007 रोजी संपली. सदर रक्‍कम घेणेस तक्रारदार आलेले नाहीत. तक्रारदार हे दि.05.07.2007 रोजी ठेव पावतीची रक्‍कम मागणेकरिता आले असता रक्कम रुपये 2,500/- रोख दिलेली आहे. बाकी राहिलेली रक्‍कम कर्ज वसुली जमा झाल्‍यावर लवकरच देवू असे सांगितले होते. दि.01.09.2007 रोजी त्‍या दरम्‍यानचे व्‍हा.चेअरमन, मयत दिलीप शिंदे यांचेकडे रक्‍कम मागणीचा तगादा लावल्‍यानंतर सामनेवाला क्र.2, चेअरमन, गजानन पाटील यांचेसमोर मयत दिलीप शिंदे यांनी स्‍वत: जवळील रोख रक्‍कम रुपये 5,000/- तक्रारदारांना दिले व राहिलेली रक्‍कम रुपये 9900/- कर्ज वसुली झाल्‍यावर देवू असे सांगितले. परंतु, तक्रारदार हे गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीचे असलेने त्‍यांनी चेअरमन, गजानन पाटील यांचेकडे वेळोवेळी धमकी देवून रुपये 9,900/- ची मागणी केली. परंतु, कर्ज वसुली झाली नाही असे सांगितले असतानाही तक्रारदार हे दि.10.09.2007 रोजी चेअरमन, गजानन पाटील यांचे घरी जावून रोख रक्‍कम रुपये 2,500/- घेवून गेले आहेत. तक्रारदार यांनी त्‍यावेळी रुपये 7,400/- येणे आहे असे सांगून गेले ते आजतागायत सामनेवाला संस्‍थेशी संपर्क साधलेला नाही. सदरची वस्‍तुस्थिती लपवून तक्रारदारांनी संचालकाच्‍या गरीब स्‍वभावाचा फायदा घेवून सदरची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना त्रास झालेबद्दल कॉम्‍पनेसेटरी कॉस्‍ट देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(7)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ रोजकिर्दीचा उतारा, दि.05.07.07 रोजी‍‍ दिलेल्‍या रक्‍कमेचे व्‍हौचर, सामनेवाला क्र.4 यांचा मृत्‍यूचा दाखला इत्‍यादी च्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.  
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमेची मुदत संपून गेलेली आहे व सदर रक्‍कमेची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ रोजकिर्दीचा उतारा, दि.05.07.07 रोजी‍‍ दिलेल्‍या रक्‍कमेचे व्‍हौचर इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.  सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याचे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवीपोटी दि.05.07.2007 रोजी रुपये 2,500/- अदा केलेचे निदर्शनास येते. परंतु, सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात दि.01.09.2007 रोजी त्‍या दरम्‍यानचे व्‍हा.चेअरमन, मयत दिलीप शिंदे यांनी रुपये 5,000/- दिलेबाबत व  दि.10.09.2007 रोजी चेअरमन, गजानन पाटील यांचे घरी जावून रोख रक्‍कम रुपये 2,500/- तक्रारदारांनी घेतलेबाबत कथन केले आहे. तथापि, सदर कथनांबाबत कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही.  त्‍यामुळे सामनेवाला यांची सदरची कथने हे मंच विचारात घेत नाही. इत्‍यादी विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या दामदुप्‍पट ठेव पावती क्र.298 ची देय होणारी रक्‍कम रुपये 17,400/- पैकी केवळ रुपये 2,500/- अदा केलेचे दिसून येते. त्‍यामुळे अद्याप सामनेवाला हे तक्रारदारांना रक्‍कम रुपये 14,900/- देणे लागतात. सामनेवाला यांनी सदरची रक्‍कम व्‍याजासह न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
(9)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत सामनेवाला क्र.4, दिलीप पांडुरंग शिंदे हे दि.01.11.2009 रोजी मयत झालेबाबतचा मृत्‍यूचा दाखला सादर केलेला आहे. तसेच, तक्रारदारांनी दि.17.06.2010 रोजी सदर सामनेवाला क्र.4 यांचे नांव प्रस्‍तुत प्रकरणातून कमी करणेबाबत विनंती अर्ज दिला. सदरचा अर्ज मंजूर करणेत आला.  सबब, तक्रारदारांची उर्वरित ठेव रक्‍कम रुपये 14,900/- देण्‍याची सामनेवाला क्र. 1, ते 3, 5 ते 11 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.12 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र. 1 ते 3, 5 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.298 वरील उर्वरित देय रक्‍कम रुपये 14,900/- (रुपये चौदा हजार नऊशे फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.11.01.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला क्र. 1 ते 3, 5 ते 11 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.12 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT