द्वारा- श्री. एस.के. कापसे, मा. सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 21 जानेवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे त्यांच्या स्वत:च्या व मुलामुलींच्या नावावर खालीलप्रमाणे ठेव पावत्या ठेवल्या होत्या.
ठेवीदाराचे नाव | पावती क्र. | पावती दिनांक | मॅच्युरिटी दिनांक | ठेवीची रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम |
श्री.कमलेश साखरिया | 01273 | 10/11/2003 | 9/7/2008 | 30,000/- | 60,000/- |
श्री.कमलेश साखरिया | 01404 | 30/6/2004 | 30/7/2007 | 40,000/- | 54,891/- |
श्री.कमलेश साखरिया | 01420 | 24/7/2004 | 29/7/2010 | 10,000/- | 20,000/- |
कु.दिव्या कमलेश साखरिया | 01360 | 26/3/2004 | 26/3/2010 | 30,000/- | 60,000/- |
कु. दिव्या कमलेश साखरिया | 01389 | 24/5/2004 | 24/5/2010 | 5,000/- | 10,000/- |
कु. दिव्या कमलेश साखरिया | 01433 | 16/9/2004 | 16/9/2010 | 12,500/- | 25,000/- |
कु. दिव्या कमलेश साखरिया | 01641 | 02/1/2007 | 02/2/2010 | 25,000/- | 32,708/- |
कु. ऋषभ कमलेश साखरिया | 01402 | 21/6/2004 | 21/6/2010 | 15,000/- | 30,000/- |
कु. ऋषभ कमलेश साखरिया | 01429 | 02/9/2004 | 02/9/2010 | 10,000/- | 20,000/- |
कु. दक्षा कमलेश साखरिया | 01642 | 2/1/2007 | 02/2/2010 | 25,000/- | 32,708/- |
कु. दक्षा कमलेश साखरिया | 01427 | 30/8/2004 | 30/8/2010 | 10,000/- | 20,000/- |
तक्रारदारांची मुले कु.दिव्या, कु. ऋषभ व कु. दक्षा अज्ञान असल्यामुळे प्रत्येकाच्या ठेव पावतीवर अज्ञान पालन करीता म्हणून तक्रारदारांच्या नावाची नोंद करण्यात आलेली आहे. मुदतीनंतर देखील जाबदेणार यांनी प्रत्येक अर्जदाराच्या नावे असलेली रक्कम वारंवार मागणी करुनही परत केली नाही. जाबदेणार यांनी दिनांक 25/8/2009 रोजी वरील सर्व रकमेपैकी रुपये 10,000/- चा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेक पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. पुष्पा भोसले यांच्या सहीचा दिला परंतू चेकवर नियमाप्रमाणे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांच्या सहया नव्हत्या. तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही जाबदेणार यांनी त्यावर सहया देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळी तक्रारदारांना रुपये 10,000/- देखील मिळालेले नाहीत. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 30/4/2011 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली असता जाबदेणार यांनी ती स्विकारली नाही व रक्कमही परत केली नाही, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार क्र.1 जाबदेणार यांच्याकडून स्वत:च्या, अ.पा.क तक्रारदार क्र.2,3 व 4 यांच्या नावे एकुण 11 मुदत ठेवीच्या पावत्या रुपये 2,12,500/- ची मुदतीनंतरची एकत्रित रक्कम रुपये 3,65,307/- 14 टक्के व्याजासह मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द दिनांक 15/11/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. तक्रारदार क्र.1 यांनी त्यांच्या स्वत:च्या व त्यांच्या कु. दिव्या, कु. ऋषभ व कु. दक्षा यांच्या नावे जाबदेणार पतसंस्थेत मुदत/दामदुप्पट ठेव पावत्यांमध्ये एकूण रुपये 2,12,500/- गुंतविले होते व मुदतीअंती सर्व पावत्यांची मिळून रक्कम रुपये 3,65,307/- मिळणार होते हे दाखल मुदत/दामदुप्पट ठेव पावत्यांवरुन दिसून येते. जाबदेणार यांनी मुदतीअंती देय रक्कम तक्रारदारांना मागणी करुनही, नोटीस पाठवूनही दिली नाही ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. मुदतीअंती सर्व मिळून होणारी रक्कम रुपये 3,65,307/- या रकमेवर तक्रारदारांनी तक्रार दाखल दिनांकापासून 14 टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे. परंतू तक्रारदारांची 14 टक्के व्याजाची मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या मुदत ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता त्यातील फक्त दोनच मुदत ठेव पावत्या – कु. दक्षा कमलेश साखरिया यांच्या नावे असलेली मुदत ठेव पावती क्र.01642 व कु. दिव्या कमलेश साखरिया यांच्या नावे असलेली मुदत ठेव पावती क्र. 01641 वर व्याजदर 10 टक्के नमूद करण्यात आलेला आहे. उर्वरित मुदत ठेव पावत्यांवर व्याजदर नमूद करण्यात आलेला नाही. म्हणून तक्रारदार व त्यांच्या अज्ञान मुलांच्या नावे असलेली ठेव पावत्यांची मुदतीअंती सर्व मिळून होणारी रक्कम रुपये 3,65,307/- तक्रार दाखल दिनांक 1/7/2011 पासून 10 टक्के व्याजासह जाबदेणार यांनी परत करावी असे आदेश जाबदेणार यांना देण्यात येत आहेत. तक्रारदारांना व्याज देण्यात येत आल्यामुळे नुकसान भरपाई पोटीची मागणी अमान्य करण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार क्र.1 यांना त्यांच्या स्वत:च्या व तक्रारदार क्र.2, 3 व 4 यांच्या नावे असलेल्या मुदत ठेव पावत्यांच्या मुदतीनंतर सर्व मिळून होणारी रक्कम रुपये 3,65,307/- दिनांक 1/7/2011 पासून 10 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार क्र.1 यांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- अदा करावी.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.