Maharashtra

DCF, South Mumbai

CC/22/146

THERMOPAC PROCESS ENGINEERING LLP - Complainant(s)

Versus

DEUTSCHE BANK - Opp.Party(s)

JAYANT BALWANT RANADE

28 Jul 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/22/146
( Date of Filing : 29 Jun 2022 )
 
1. THERMOPAC PROCESS ENGINEERING LLP
404 L4 THE SUMMIT BUSINESS BAY W E HIGHWAY VILE PARLE EAST MUMBAI 400 057
...........Complainant(s)
Versus
1. DEUTSCHE BANK
GLOBAL TRANSACTION BANKING TRADE DB HOUSE FIRST FLOOR FORT MUMBAI 400 0019
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Jul 2022
Final Order / Judgement

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

      तक्रारदार व त्‍यांचे वकील पुकारले असता गैरहजर. सदर प्रकरणामध्ये तक्रार दाखल करणेकामी तक्रारदाराच्‍या वकीलांचा  दि.26.07.2022 रोजी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला असून, तक्रारीमधील आशय तसेच त्‍यासह जोडलेली कागदपत्रे विचारात घेता प्रस्‍तूत तक्रार ही एका भागीदारी संस्‍थेने सामनेवाले बॅके विरुध्‍द, सामनेवाले बॅकेने त्‍यांना लेटर ऑफ क्रेडिट बाबतची सेवा उशीरा दिल्‍याने, तक्रारदारांना आर्थिक नुकसान झाल्‍याचे नमूद करुन सदर नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या प्रार्थना कलमात नमूद केल्‍या प्रमाणे इतर खर्च सामनेवाले यांचे कडून मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

(2)   त्‍यामध्‍ये तक्रारदार Thermopac Process Engineering LLP Complainant (Seller) तसेच सामनेवाला Deutsche Bank ही Negotiating/Confirming Bank असून बँक ऑफ बरोडा ही Advisory Bank तसेच First Bank Of Nigeria ही Issuing Bank असल्‍याचे नमूद केले आहे व M/s Bunorr Integrated Energy Limited – Buyer असे नमूद आहे.  तसेच तक्रारदार हे engaged interalia in the business of manufacturing supply and erection and commissioning of USED ENGINE OIL Recycling plants असे नमूद आहे.  दि. 12/03/2020 रोजीच्‍या करारनाम्‍यानुसार वर नमूद M/s Bunorr Integrated Energy Limited – Buyer यांनी तक्रारदारांना नायजेरिया येथे supply of goods and for erection and commissioning of Recycling Plant बाबत Order दिली व त्‍याबाबत First Bank Of Nigeria यांनी तक्रारदाराच्‍या लाभात दि. 09/12/2020 Letter Of Credit No. 1 for amount of USD 750492.05 व दि. 09/12/2020 रोजीचे  Letter Of Credit No. 2 for amount of USD  263175.00  दिले त्‍यामध्‍ये बँक ऑफ बरोडा ही Advisory Bank असल्‍याने त्‍यांनी सदर दोन्‍ही Letter Of Credits, सामनेवाला Deutsche Bank (Confirming Bank)  यांना दिले.  सदर Letter Of Credit No. 1  तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दि. 24/02/2021 रोजी त्‍याबाबतची रक्‍कम तक्रारदारांना मिळण्‍याकरिता आवश्‍यक कागदपत्रांसह सादर केले. परंतु सामनेवाला यांनी दि.25/02/2021 रोजी तक्रारदारांना कोणतेही कारण न देता, सदर Letter Of Credit बाबतची रक्‍कम  देण्‍यास नकार दिला.  दि. 26/02/2021 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांना LC No. 1 बाबतची आवश्‍यक कागदपत्रे पुन्‍हा सादर केली. तसेच सदर प्रकरणात नमूद Advisory Bank – Bank Of Baroda यांनी Issuing Bank कडून सदर LC बाबत आवश्‍यक मान्‍यता घेण्‍याचा संदेश दिला व LC1 बाबतची रक्‍कम अंतिमत: दि. 06/04/2021 रोजी तक्रारदाराच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आली, त्‍याचप्रकारे सामनेवाला यांनी LC No. 2 बाबत तक्रारदारांनी त्‍यांच्‍याकडे त्‍यामध्‍ये नमूद रकमेची आवश्‍यक कागदपत्रांसह मागणी केली असता, त्‍याबाबतची रक्‍कम देण्‍यास विलंब केला व अंतिमत: सदर रक्‍कम तक्रारदारांना दि. 07/05/2021 रोजी मिळाल्‍याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे व अशाप्रकारे सामनेवाला यांनी सदर दोन्‍ही Letter of Credit  बाबतची रक्‍कम तक्रारदारांना देण्‍यास विलंब केल्‍याने तक्रारदारांना आर्थिक नुकसान सोसावे लागले,  सदर बाब ही सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिलेली त्रुटीपूर्ण सेवा असल्‍याचे तक्रारदारांनी नमूद करुन सामनेवाला विरुध्‍द प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. परंतु  ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या 2019 च्‍या कलम 2 (7) मध्‍ये दिलेल्‍या ग्राहक या संज्ञेमध्‍ये खालीलप्रमाणे नमूद असून त्‍यामध्‍ये व्‍यापारी हेतू असल्‍यास संबंधित व्‍यक्ति/पक्षकार हे ग्राहक संरक्षण कायदयानुसार, ग्राहक होत नाहीत असे नमूद आहे. त्‍यामुळे प्रस्‍तूत प्रकरणात व्‍यापारी हेतू दिसून येत असल्‍याने तसेच प्रस्‍तूत तक्रारीत तक्रारदारांनी सदर व्‍यवसाय ते त्‍यांच्‍या चरितार्थासाठी करत असल्‍याबाबत तक्रारीत कुठेही उल्‍लेख केलेला नसल्‍याने प्रस्‍तूत तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र ग्राहक संरक्षण आयोगास नाही. परंतु प्रस्‍तूत तक्रारीमध्‍ये तक्रारदाराचा सदर सेवा घेण्‍यात व्‍यापारी हेतू दिसून येतो. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या ग्राहक या व्‍याखेत येत नसल्‍याने प्रस्‍तूत तक्रार तक्रारदारांना योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाखल करण्‍याची मुभा देऊन कार्यक्षेत्रा अभावी तक्रार दाखल टप्‍प्‍यावर असताना ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 36 (2) नुसार निकाली काढण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाही. प्रकरण निकाली. 

Consumer Protection Act, 2019 Definition ‘consumer U/Sec. 2 (7)   

(7) "consumer" means any person who— (i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or (ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose. Explanation.—For the purposes of this clause,— (a) the expression "commercial purpose" does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;

       सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.

// आदेश //

प्रस्‍तूत तक्रारीत व्‍यापारी हेतू दिसून येत असल्‍याने व  तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या ग्राहक या व्‍याखेत येत नसल्‍याने प्रस्‍तूत तक्रार तक्रारदारांना योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाखल करण्‍याची मुभा देऊन कार्यक्षेत्रा अभावी तक्रार दाखल टप्‍प्‍यावर असताना ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या कलम 36 (2) नुसार निकाली काढण्‍यात येते. खर्चाबाबत आदेश नाही. प्रकरण निकाली. 

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.