निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 25/05/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 25/05/2011 तक्रार निकाल दिनांकः- 23/08/2011 कालावधी 02 महिने 29 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सय्यद मोइन पि.सय्यद हसन अर्जदार वय 36 वर्ष.धंदा.खाजगी नोकरी. अड.डी.यु.दराडे. रा.गंगाखेड रोड.परभणी. विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी. गैरअर्जदार. तर्फे उप कार्यकारी अभियंता. अड.एस.एस.देशपांडे. रा.जिंतूर रोड.परभणी ता.व जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराला अवाजवी बील देवुन दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रमांक 530010409003 असून त्याची विद्युत जोडणी ही घरगुती वापरासाठी आहे.दिनांक 25/04/2011 रोजी गैरअर्जदार हे अर्जदाराच्या घरी आले व पूर्वीचे मीटर काढून नेले व सदर मीटरची तपासणी न करता वीज चोरीचे असेसमेंट देयक दिले दिनांक 27/04/2011 रोजी रु.39,368/- चे विद्युत देयक दिले व हे देयक दिनांक 28/04/2011 रोजी भरले नाही तर कलम 135 प्रमाणे फौजदारी केस करण्यात येईल असे विद्युत देयकावर नमुद करण्यात आले . अर्जदाराने कोणतीही वीज चोरी केली नसतानाही चोरीचा आरोप लावुन सदर देयक दिले व त्याचा वीज पुरवठा खंडीत केला. गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व दिनांक 27/04/2011 चे असेसमेंट देयक रद्द करावे व मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- व दाव्याचा खर्च रु.3,000/- मिळावेत व विद्युत पुरवठा पूर्ववत जोडून द्यावा अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने त्याच्या तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, विद्युत देयके, ही कागदपत्र दाखल केलेली आहेत. गैरअर्जदाराने नोटीस मिळाल्यानंतर मंचापुढे हजर होवुन त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले नसल्यामुळे गैरअर्जदारां विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकीलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराची तक्रार ग्राहक न्याय मंचाच्या अधिकारक्षेत्रात येते काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 530010409003 आहे हे नि.6/1 वरील विद्युत देयकावरुन सिध्द होते.तसेच त्या विद्युत देयकावर “ Theft assessment Bill Against Theff Case u/s 135/1 of E A 2003 असे नमुद केलेले आहे. मा राष्ट्रीय आयोगाने याबाबत 2011 CTJ 649 (CP) (NCDRC) Ishwar Singh V/s Dakshin Haryana Vidyut Prasaran Nigam Ltd. मध्ये “ The Consumer Forum have no jurisdiction to go into the issues of theft of electricity by the electricity consumers ” असे मत व्यक्त केलेले आहे.ते सदरील तक्रारीस लागु पडते म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 5 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |