जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –74/2011 तक्रार दाखल तारीख –05/05/2011
शेख हबीब शे. चॉंद
वय 40 वर्षे,धंदा लाकूड कटाई व्यापार .तक्रारदार
रा.भारत सॉ मिल,सुभाष रोड,बीड,ता.जि.बीड
विरुध्द
महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी
मार्फत उपकार्यकारी अभिंयता,
महाराष्ट्र राज्य विदयूत मंडळ,बीड
शहरी विभाग बीड. ..सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले तर्फे :- अँड.यू.डी.चपळगांवकर
निकालपत्र
( श्री.अजय भोसरेकर, सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा बीड येथील रहिवासी असून त्यांने सामनेवाला यांच्याकडे पूर्ण कागदपत्राची कायदेशीर पुर्तता करुन एक विदयूत कनेक्शन घेतलेले आहे. त्यांचा ग्राहक क्र.576010084481 असा आहे. तक्रारदाराचे एकूण सहा ते सात ब्लॉक असणारी इमारत असून त्यासर्वात किरायदार राहतात. प्रत्येक ब्लॉकसाठी स्वंतत्र विदयूत कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदाराने सदर कनेक्शन 1981 पासून वापरत आहे. हे कनेक्शन तक्रारदाराच्या मयत वडिलांचे नांवे आहे. तक्रारदाराने त्यांचे मिटर घेतल्यापासून आजपावेतो तीन वेळा बदलेले गेले आहे. ते दि.22.6.2010, दि.6.8.2010 व दि.17.12.2010 अशा प्रकारच्या आहेत.
तक्रारदाराने डिसेंबर 2010 ते मार्च 2011 या कालावधीचे बिल अवाजवी आल्याचे म्हटले आहे. त्या बाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे तशी लेखी आक्षेप दि.27.1.2011, 4.2.2011 व 1.3.2011 अशा पध्दतीने घेऊन सामनेवाला यांना सदर मिटर दोषयूक्त असल्याबददलची जाणीव त्यांना करुन दिली. त्याप्रमाणे सामनेवाला यांचे अभिंयता श्री. पळसे व त्यांचे कर्मचारी हे तक्रारदाराच्या तक्रारीनुसार दि.14.2.2011 रोजी पाहणी करुन दि.17.2.2011 रोजी सदर दोषयूक्त मिटर बदलून दिले. त्यानुसार तक्रारदारास दि.5.2.2011 ते 5.3.2011 या कालावधीचे वापर यूनिट 222 दर्शऊन तक्रारदारास बिल अदा केले.
प्रत्यक्षात दि.17.2.2011 रोजी तक्रारदाराचे मिटर बदलले आहे असे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे हे बिल अयोग्य असून दि.22.6.2010 ते 6.8.2010 या कालावधीतील खराब मिटरचे आलेले अवाजवी बिल डिसेंबर 2010 ते मार्च 2011 या कालावधीचे बिल थकबाकी रदद करुन दि.17.2.2011 रोजी बसवलेले नवीन विज मिटरच्या प्रत्यक्ष रिंडीगनुसार बिल तक्रारदारास दयावे अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने अंतरिम आदेशाची मागणी केली होती त्यानुसार दि.5.5.2011 रोजी अंतरिम आदेश हस्तगत केला होता.
तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 6 कागदपत्रे दाखल केली.
सामनेवाला यांनी आपले म्हणणे दि.29.8.2011रोजी दाखल केले असून तक्रारदार हा ग्राहक आहे हे त्यांना मान्य आहे. परंतु तक्रारदारांनी केंलेले आरोप हे सर्व सामनेवाला यांनी फेटाळले आहेत. सामनेवाला यांनी सर्व आरोप फेटाळत असताना त्यांचे म्हणण्याचे पूष्टयर्थ भारतीय पुरावा कायदयाच्या अनुसरुन कोणताही योग्य पुरावा या जिल्हा मंचा समोर सादर केला नाही.
तक्रारदारानी व सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबत दाखल केलेले पूराव्याचे कागदपत्र व शपथपत्रे आणि दोघाचा तोंडी यूक्तीवाद ऐकल्यानंतर त्यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास देऊ करावयाच्या सेवेत त्रूटी केली आहे हे तक्रारदाराच्या दि.19.3.2011 रोजीच्या दाखल विदयूत देयकावरुन, तक्रारदाराच्या एकंदरीत 12 महिन्याच्या रिंडीग व बिल यांचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास डिसेंबर 2010 ते मार्च 2011 या कालावधीत देऊ केलेले देयके ही चूक पध्दतयीने देऊन सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते.
सबब,न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास डिसेंबर 2010 ते मार्च 2011 या कालावधीतील तक्रारदाराची विदयूत देयके रदद करण्यात येत आहेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदारास दि.17.02.2011 रोजी पासून बसवलेल्या नवीन मिटर नंबर 6701153026 यांचे वापराच्या युनिट प्रमाणे तक्रारदारास योग्य देयके दयावीत व ती देयके तक्रारदारांनी मूदतीत भरणा करावीत.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) व खर्चापोटी रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड