जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 106/2011 तक्रार दाखल तारीख- 14/07/2011
महमंद मुनीरोद्दीन, पि. महमंद शरफोद्यीन
वय – 48 वर्ष, धंदा – व्यापार
रा.बलभिम चौक, बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
उप कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
माळीवेस, बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – सययद इस्माईल,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.बी.तिडके,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा बीड येथील रहिवाशी असुन सामनेवाले यांचे नियमानुसार सर्व कागदपत्राची पूर्तता करुन घरगुती वापरासाठी एक विद्युत कनेक्शन घेतले आहे. त्याचा ग्राहक क्रं.576010013592 असा आहे.
तक्रारदाराचे जुने मिटर काढुन नविन मिटर बसविण्याचे धोरणांतर्गत दि.7.7.2009 रोजी नविनी मिटर बसविले. तक्रारदाराचा विज वापर हा सरासरी 50 ते 60 युनिट दरमहा इतका असे. सामनेवाले यांनी तक्रारदारास वेळोवेळी दिलेले विज बील तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे मुदतीत भरणा केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.7.7.2011 रोजी अचानकपणे रक्कम रु.57,712/- चे असेसेमेंट बील दिले. याबदल तक्रारदाराने दि.12.7.2011 रोजी सामनेवाले यांचेकडे सदर बील रद्द करुन मिळण्याची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी सदर बील रद्द करुन न दिल्यामुळे सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने दि.7.7.2011 रोजी दिलेले विज बील रक्कम रु.57,712/- रद्द करुन मिळावे व खर्चापोटी मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 22 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटी प्राप्त झाली. त्यानुसार सामनेवाले हे दि.15.9.2011 रोजी वकिलामार्फत न्यायमंचात हजर झाले. परंतु सामनेवाले यांना त्यांचे लेखी म्हणणे सादर करण्यासाठी संधी देवूनही त्यांनी आपले लेखी म्हणणे दि.30.11.2011 रोजी पर्यन्त दाखल केले नाही म्हणून सामनेवाले विरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आला. त्यांनतरही दि.2.5.2012 पर्यन्त सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, तक्रारदाराने 31.10.2009 ते 29.12.2011 पर्यन्ती एकुण 20 विजबीले याचे बारकाईने आवलोकन केले असता,
तक्रारदाराचा सरासरी विज वापर हा 50 ते 60 युनिट प्रतिमहा असल्याचे दिसुन येते. त्यामुळे सामनेवाले यांनी दि.7.7.2011 दिलेले विज बील रक्कम रु.57,712/- चे असेसेमेंट बील व महाराष्ट्र विज नियामक आयोग यांच्या विज पुरवठा नियम 14 नुसार मिटर कॉस्ट बील रक्कम रु.1,000/- चे रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास दि.7.7.2011 रोजी दिलेले विज बील रक्कम रु.57,712/- व मिटर कॉस्ट बील रक्कम रु.1,000/- हे रद्द करण्यात येत आहे.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी व तक्रारीचे खर्चापोटी रु.2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावीत..
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड