जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 171/2011 तक्रार दाखल तारीख –02/11/2011
सुरेश पि.लिंबाजी बनसोडे
वय 40 वर्षे धंदा नौकरी .तक्रारदार
रा.चक्रधर नगर,बीड ता. जि.बीड
विरुध्द
उपकार्यकारी अभिंयता
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि.बीड .सामनेवाला
जालना रोड, बीड.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.एम.कूलकर्णी
सामनेवाला तर्फे :- अँड.डी.बी.बागल
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारानी सामनेवाला विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे व त्यात अंतरिम आदेशाची मागणी केलेली होती. त्यावेळी तक्रारदारानी सामनेवालाकडे शपथपत्र करुन दिले की विज बिल थकल्यामुळे विज पुरवठा खंडीत केलेला आहे. रु.45,000/- भरलेले आहेत व बाकी रक्कम हप्ते करुन भरणार आहे. तसेच जिल्हा मंचात दाखल केलेली तक्रार स्वखुशीने परत घेत आहे.
सदरचे शपथपत्रासोबत सामनेवाला यांनी रक्कम रु.45,000/- भरल्याची पावती दाखल केलेली आहे. सदरची कागदपत्रे सामनेवाला यांनी दि.10.01.2012 रोजी दाखल केले. त्यावर तक्रारदाराचा खुलासा मागण्याचा आदेश झाला. तक्रारदारांनी दि.12.01.2012, 01.02.2012 व 02.02.2012 रोजी पर्यत त्यांचा खुलासा दाखल केलेला नाही. तक्रारदार जिल्हा मंचात हजर नाही. त्यामुळे सदरचे शपथपत्रानुसार तक्रारदारांना सदरची तक्रार चालविण्यात स्वारस्य दिसून येत नाही.तसेच लिहून प्रकरण मागे घेणार असल्याचे लिहून दिलेले आहे.त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1. तक्रार निकाली काढण्यात येते.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड