निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 31.03.2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05.04.2011 तक्रार निकाल दिनांकः- 03.02..2012 कालावधी 09 महिने 29 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विठ्ठलराव पि. रानोजी घुले. अर्जदार वय 56 वर्षे, धंदा शेती, ( अड.आर.बी.चव्हाण) रा.पान्हेरा, ता.जि.परभणी. विरुध्द उप-कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार म.रा.विद्युत वितरण कं. अड.एस.एस.देशपांडे. (ग्रामीण) जिंतुर रोड, परभणी, जि. परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा .श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) विज मंडळाकडुन शेती पंपाचे विज कनेक्शन मिळण्याकरिता प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराच्या मालकीची पान्हेरा, तालुका परभणी येथील गट क्रमांक 31 शेत जमीनीतील विहीरीवर थ्री फेज विद्युत पंप कनेक्शन मिळण्यासाठी त्याने तारीख 06/10/2007 रोजी कोटेशनचे रक्कम रूपये 4250/- भरून गैरअर्जदाराकडे अर्ज दिला होता. त्यानंतर गैरअर्जदाराकडे वेळोवेळी समक्ष भेट देवुन विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी विनंती केली असता सन 2010 पर्यन्त विद्युत कनेक्शन मिळाले नाही. अर्जदाराचे म्हणणे असे की कनेक्शन न मिळाल्यामुळे, शेतातील पिकांना पाणीपुरवठा न करता आल्यामुळे रूपये 1,00,000/- उत्पन्नाचे नुकसान झाले. त्याला गैरअर्जदार हा सर्वस्वी जबाबदार असल्याने गैरअर्जदास तारीख 05/02/2011 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होवुनही गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही. त्यानंतर तारीख 25/03/2011 रोजी गैरअर्जदारास समक्ष भेटुन विद्युत जोडणीची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. म्हणुन त्याची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करून गैरअर्जदारकडुन पिकाची नुकसान भरपाई रूपये 1,00,000/- मानसीक ञासापोटी रूपये 2500/- व अर्जाचा खर्च रूपये 2000/- अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्ट्यर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) दाखल केले आहे व पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत एकुण 6 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटिस पाठविल्यावर त्यानी तारीख 07/09/2011 रोजी आपला लेखी जबाब (नि. 14) सादर केला. अर्जदाराने तारीख 06/10/2007 रोजी कोटेशन रक्कम रूपये 4250/- भरलेली होती व विज कनेक्शन मागणी केलेली होती हे नाकारले नाही. परंतु कुषी पंप विद्युत जोडणीसाठी अनेक ग्राहकांनी कोटेशन भरलेले असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी जोडणी देता येणे शक्य नव्हते. म्हणुन अशा ग्राहकांची यादी करून नंबर प्रमाणे विद्युत कनेक्शन दिले जात होते. त्यामुळे गैरअर्जदाराकडुन कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा झाला नव्हता. अर्जदाराने तक्रार अर्जात विद्युत कनेक्शन न मिळाल्यामुळे पिकांना पाणी देता आले नाही वगैरे कारणासाठी जी नुकसान भरपाई मागितली आहे ती चुकीची असुन अर्जदार तशी नुकसान भरपाई मागु शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जदाराच्या नोटीसीला तारीख 18/02/2011 रोजी जा.क्र.323 प्रमाणे सविस्तर उत्तर पाठविले होते, परंतु त्या बाबतीत तक्रार अर्जात त्यांनी नोटीस उत्तर दिले नसल्याचे खोटे नमुद केले आहे. गैरअर्जदाराकडुन कोणत्याही प्रकारे सेवाञुटी झालेली नाही. सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्ट्यर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.15) दाखल केले आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदाराचा युक्तीवाद झाला. गैरअर्जदारातर्फे कोणीही हजर नसल्यामुळे मेरीटवर प्रकरणाचा निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराने ऑक्टोंबर 2007 साली मागणी केलेल्या कुषी पंपाचे विज कनेक्शन मिळण्यासाठी विलंब करून सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाञ आहे काय ? असल्यास किती ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने कुषी पंपासाठी थ्री फेज विद्युत जोडणी मिळण्यासाठी तारीख 06/10/2007 रोजी कोटेशनची रक्कम रूपये 4250/- भरून गैरअर्जदाराकडे रीतसर अर्ज केला होता ही अडमीटेड फॅक्ट आहे. पुराव्यादरम्यान अर्जदाराने पुराव्यात कोटेशन कोटेशन भरल्याची पावती देखील दाखल केली आहे. अर्जदाराने कोटेशनची रक्कम भरल्यानंतर फेब्रुवारी 2011 पर्यन्त विद्युत जोडणी दिलेली नव्हती ही अडमीटेड फॅक्ट आहे. अर्जदारास जोडणी न देण्याचा जो खुलासा गैरअर्जदाराने लेखी जबाबात दिला आहे त्या संबंधीचा कसलाही कागदोपञी पुरावा उदा. कुषी पंपासाठी शेतक-याने मागणी केलेल्या नावाची यादी, कोणत्या शेतक-याला नवे कनेक्शन दिले त्याचा खुलासा, अर्जदाराने विद्युत मिळाली नाही म्हणुन वकिला मार्फत पाठविलेल्या नोटीसीचे गैरअर्जदाराने उत्तर पाठविले होंते. परंतु उत्तर नोटीस उत्तराची प्रत यापैकी कोणताही पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे गैरअर्जदाराने लेखी जबाबातुन घेतलेला जबाब कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय मान्य करता येणार नाही. विद्युत जोडणीचे कनेक्शन भरल्यानंतर 4 वर्षा पर्यंत अर्जदाराला कनेक्शन न मिळाल्यामुळे त्याला प्रस्तुत तक्रार अर्जाव्दारे गैरअर्जदारा विरूध्द कायदेशीर दाद मागणे भाग पडले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुणावणीच्या दिवशी अर्जदारातर्फे प्रकरणात नि.16 चा अर्ज देवुन गैरअर्जदाराकडुन अर्जदाराचा ग्राहक मंचात दाखल केल्यानंतर विद्युत जोडणी मिळाली आहे असे नमुद करून नुकसान भरपाई पुरता प्रकरणात निकाल द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे ती विचारात घ्यावी लागेल. गैरअर्जदाराने विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतीत कोणत्याही सबळ कारणाशिवाय अक्षम्य दिरंगाई केली असल्यास याबाबतीत गैरअर्जदाराकडुन निश्चितपणे सेवाञुटी झालेली आहे. त्यामुळे अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाञ आहे. अर्जदाराने पिकाच्या नुकसानीपोटी रूपये 1,00,000/- मागणी केलेली आहे ती अवास्तव व गैरलागु आहे शिवाय त्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नसल्याने ती मान्य करता येणार नाही. वरील सर्व बाबी विचारात घेवुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आदेश 1) तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदाराने आदेश तारखेपासुन 30 दिवसाचे आत अर्जदारास मानसीक ञासापोटी व सेवाञुटी व विज कनेक्शन देण्याच्या बाबतीत विलंब केल्यास नुकसान भरपाई म्हणुन एकञीत रूपये 13,000/- व अर्जाचा खर्च रूपये 2,000/- द्यावा. आदेश मुदतीत रक्कम न दिल्यास नुकसान भरपाई रक्कम द.सा.द.शे. 09 टक्के दराने व्याजासह रक्कम वसुल करण्याचा अर्जदाराचा हक्क राहील.. 4) पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |