Maharashtra

Parbhani

CC/11/83

Nathrao Nivaratti Sanp - Complainant(s)

Versus

Deputy Engineer,MSEDC.Ltd.Gangakhed - Opp.Party(s)

Adv.D.U.Darade

14 Oct 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/83
1. Nathrao Nivaratti SanpR/o Wagdhari Tq.GangakhedParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Deputy Engineer,MSEDC.Ltd.GangakhedSub Division-Gangakhed Thandhale Bangla,Adovcate Colony.GangakhedParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.D.U.Darade, Advocate for Complainant

Dated : 14 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  29/03/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 14/10/2011

                                                                                    कालावधी 06 महिने 09 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

          नाथराव पिता निवृत्‍ती सानप.                                 अर्जदार

वय 65 वर्ष.धंदा. सेवा निवृत्‍त                            अड.डि.यु.दराडे.

रा.वागदरी ता.गंगाखेड जि.परभणी.

               विरुध्‍द

      महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कं.लि.                      गैरअर्जदार.    

      तर्फे सहाय्यक अभियंता,उपविभाग गंगाखेड.                    अड.गणेश सेलुकर.                      

      तांदळे यांचा बंगला,वकिल कॉलनी.गंगाखेड.            

      ता.गंगाखेड जि.परभणी.                                                    

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------         

        (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

     

            अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की,

      अर्जदार वागदरी ता.गंगाखेड येथील रहिवासी आहे. यवतमाळ जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत तो नोकरी करत होता तो 01 ऑगस्‍ट 2004 मध्‍ये सेवा निवृत्‍त होवुन गावी राहण्‍यास आला. वागदरी येथे त्‍याच्‍या मालकीची गट नंबर 200 क्षेत्र 1 हेक्‍टर 90 आर.शेत जमीन आहे.गैरअर्जदाराने दिनांक 22/01/2007 तारखेचे रु.57,270/- चे अर्जदाराच्‍या नावाचे कृषी पंपाचे बिल दिले अर्जदाराचे म्‍हणणे असे की, त्‍याच्‍या शेतात विहीर नाही त्‍याने कृषी पंपासाठी गैरअर्जदाराकडून विज कनेक्‍शन ही घेतलेले नसतांना दिलेले बिल रद्द करावे म्‍हणून दिनांक 21/03/2007 रोजी अर्ज दिला, परंतु त्‍याबाबत गैरअर्जदाराने काही दखल घेतली नाही.त्‍यानंतर पुन्‍हा गैरअर्जदाराने दिनांक 06/02/2010 व 29/10/2010  तारखेची बिले दिली.दिनांक 29/10/2010 चे रु.87,730/- चे बिल दिले म्‍हणून अर्जदाराने पुन्‍हा दिनांक 30/12/2010 रोजी गैरअर्जदारकडे तक्रार करुन बिल रद्द करण्‍याची मागणी केली.परंतु त्‍याची दखल न घेता गैरअर्जदाराने वकिला मार्फत उत्‍तर देवुन अर्जदारानेच मागणी केले वरुन विज पुरवठा दिला असल्‍याचे कळविले अशा रितीने गैरअर्जदाराने कनेक्‍शन घेतले नसतांना बिल देवुन मानसिकत्रास दिला म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन दिलेली बिल तारीख 08/03/2011 चे बिल रद्द व्‍हावे. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.4 लगत कृषी पंपाची वादग्रस्‍त तारीख 22/01/2007, 06/02/2010, 29/10/2010 दिलेली बिले, गैरअर्जदाराना तारीख 29/03/2007 व 30/12/2010 रोजी दिलेले तक्रार अर्जाच्‍या स्‍थळप्रती आणि गैरअर्जदाराने वकिला मार्फत पाठविलेल्‍या उत्‍तराची प्रत तसेच तलाठी सज्‍जा पिंपळदरी याचा दाखला अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर त्‍याने तारीख 11/02/2011 रोजी प्रकरणात लेखी जबाब (नि.12) दाखल केलेला आहे.लेखी जबाबात त्‍याने तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारली आहे.गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे की, अर्जदाराने तारीख 02/03/96 पूर्वी त्‍यांच्‍याकडे कृषी पंपाचे विज कनेकशन साठी रितसर अर्ज करुन कागदपत्रांची पुर्तता करुन विज कनेक्‍शन घेतलेले आहे.परंतु थकबाकी वाढल्‍यामुळे त्‍याने युक्‍ती योजून खोटी केस केली आहे.अर्जदाराने त्‍याच्‍याकडे बिले रद्द करण्‍या बाबत दिलेला तक्रार अर्ज खोटा असून त्‍यांना मान्‍य नाही.त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदाराने 1996 आणि 2007 पर्यंत घेतलेल्‍या विज कनेक्‍शनची बिले नाहरकत भरलेली होती.त्‍यानंतर बिले न भरल्‍यामुळे व थकबाकी वाढल्‍यामुळे विज कनेक्‍शन त्‍याने घेतलेलेच नव्‍हते असा बनाव करुन विज कनेक्‍शन बिल भरावे लागु नये यासाठी खोटा अर्ज दिला आणि त्‍यानंतर पुन्‍हा प्रस्‍तुतची तक्रार केलेली आहे.अर्जदाराला दिलेल बिल बरोबर असून त्‍याबाबतीत कोणतेही अनुचित प्रथा अवलंबलेली नाही.सबब तक्रार अर्ज रु.3,000/- चे कॉम्‍पेन्‍सेटरी कॉस्‍टसह फेटाळण्‍यात यावे. अशी शेवटी विनंती केलेली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.13) दाखल केले आहे आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.15 लगत 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

प्रकरणाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.दराडे आणि गैरअर्जदार तर्फे अड सेलूकर यांनी युक्तिवाद केला.

निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्ये                                 उत्‍तर

1              अर्जदार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या ग्राहक संज्ञेत येतो काय ?  होय     

   2        अर्जदारानेच गैरअर्जदारा कडून शेती पंपासाठी विज कनेक्‍शन

         घेतले होते हे शाबीत केले आहे काय ?                     नाही    

    3       निर्णय ?                                   अंतिम आदेशा प्रमाणे.  

                        कारणे

मुद्या क्रमांक 1 

      अर्जदाराने तक्रार अर्जात गैरअर्जदारकडून विद्युत पुरवठा घेतलेला नाही तो त्‍यांचा ग्राहक नाही अशी तक्रार घेवुन आल्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार गैरअर्जदाराचा ग्राहक म्‍हणून चालणेस पात्र नाही असा लेखी जबाबात गैरअर्जदाराने आक्षेप घेतलेला आहे, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराच्‍याच नावे वादग्रस्‍त बिले दिलेली असल्‍यामुळे प्रथमदर्शनी या पुराव्‍यातूनच अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असल्‍याचे दिसून येत असल्‍यामुळे अर्जदार ग्रा.सं.कायद्याच्‍या कलम 2 (1) (ड) नुसार गैरअर्जदारा विरुध्‍द दाद मागु शकतो. 

मुद्दा क्रमांक 2

गैरअर्जदारानी अर्जदारास 22/01/2007 तारखेचे रु.57,270/- चे बिल (नि.4/1) दिल्‍यानंतर अर्जदाराने त्‍या बिलावर आक्षेप घेवुन गैरअर्जदाराकडून त्‍याने कृषी पंपासाठी मुळीच विज कनेक्‍शन घेतलेले नाही त्‍याच्‍या शेतात विहिर नाही त्‍याच्‍या नावे कदाचित वडील भावाने शेती पंपासाठी कोटेशन भरले असेल ते मला माहित नाही विज कनेक्‍शन मागणी अर्जावर त्‍याने सही केलेली नाही त्‍यामुळे दिलेले बिल रद्द करावे असा 21/03/2007 रोजी  हस्‍तपोच अर्ज (नि.4/2) दिला होता तसा अर्ज आल्‍यानंतर वास्‍तविक गैरअर्जदाराने त्‍याची दखल घेवुन कृषी पंपासाठी अर्जदाराचे नावे दिलेले विज कनेक्‍शन हे नेमके कुणा व्‍यक्‍तीला आणि कोणत्‍या जमिनीतील विहिरीसाठी दिले याची सखोल चौकशी व खातरजमा लगेच करायला पाहिजे होती.मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करुन पुन्‍हा गैरअर्जदाराने तारीख 06/02/2010 चे रु.90,080/- चे बिल (नि.4/3) आणि त्‍यानंतर पुन्‍हा तारीख 29/10/2010 चे रु.87,730/- चे देयक (नि.4/4) दिले असल्‍याचे पुराव्‍यातून दिसते अर्जदाराने या संबंधात तारीख 21/03/2007 रोजी अर्ज देवुन ही गैरअर्जदाराने त्‍याची दखल न घेता पुन्‍हा बील दिल्‍यामुळे अर्जदाराने 30/12/2010 रोजी पुन्‍हा दुसरा अर्ज (नि.4/5) देवुन दिलेले बील रद्द व्‍हावे मी विज कनेक्‍शन घेतलेलेच नाही असे कळवल्‍यानंतर तरी गैरअर्जदाराने ही बाब सिरीयसली घेवुन त्‍याची सत्‍यता पडताळून पाहायला हवी होती.उलट त्‍याकडे दुर्लक्ष करुन वकिला मार्फत तारीख 26/02/2011 रोजी नोटीस उत्‍तर देवुन अर्जदाराची तक्रार अमान्‍य करुन त्‍याचे विज कनेक्‍शन रितसर कागदपत्रांची पुर्तता करुन घेतलेले आहे.त्‍याचा 1996 पासून वापर केला आहे.केवळ थकीत बिलाची रक्‍कम द्यावी लागु नये म्‍हणून विज कनेक्‍शन घेतल्‍याचे खोटे अर्ज दिले आहे.असे कळवले असल्‍याचे नोटीस उत्‍तरातून दिसते.याबाबतीत मंचाचे मत असे की, अर्जदार ज्‍याअर्थी ठामपणे मी विज कनेक्‍शन घेतलेलेच नाही माझ्या नावे अन्‍य कोणीतरी घेतले असावे असे ज्‍यावेळी म्‍हणतो आणि तशी लेखी तक्रार स्‍वतःच्‍या सहीनिशी देतो म्‍हंटल्‍यानंतर गैरअर्जदारानी ज्‍या कोणाच्‍या अर्जावरुन 1996 साली विज कनेक्‍शन दिले होते त्‍या विज मागणी अर्जावरील सही आणि अर्जदाराने अलीकडे त्‍यांच्‍याकडे दिलेल्‍या अर्जावरील सही पडताळून पाहून शिवाय अर्जदाराने त्‍याच्‍या जमिनीत विहिर नाही असे सांगितल्‍यानंतर पुन्‍हा खात्री करण्‍यासाठी दिलेले कनेक्‍शन नेमक्‍या कोणत्‍या जमिनीतील विहिरीवर दिले आहे. ती जमीन कोणाच्‍या मालकीची आहे अर्जदाराने त्‍यांच्‍याकडे दिलेल्‍या तक्रारीतील सत्‍यता आहे किंवा नाही हे काहीच न पाहता किंवा त्‍याची शहानिशा न करता वकिला मार्फत उत्‍तर पाठवुन अंग झटकण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे असेच यातून अनुमान निघते अर्जदाराने ग्राहक मंचात तक्रार दाखल केल्‍यानंतर त्‍याने दाखल केलेली तक्रार खोटी आहे विज कनेक्‍शन त्‍यानेच घेतलेले आहे हे ठोस व सबळ पुराव्‍यानिशी शाबीत करण्‍याची कायदेशिर जबाबदारी गैरअर्जदाराची असतांना देखील त्‍यासंबंधीचा कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.त्‍यामुळे गैरअर्जदारानी घेतलेला बचाव मुळीच ग्राह्य धरता येणार नाही.याउलट अर्जदाराने पुराव्‍यात तलाठी सज्‍जा पिंपळदरी ता.गंगाखेड यांचे प्रमाणपत्र (नि. 4/7) दाखल केले आहे.त्‍यामध्‍ये अर्जदाराच्‍या मालकीची वागदरी येथील गटनंबर 200 क्षेत्र 1 हेक्‍टर 90 आर.मध्‍ये विहिर नाही असे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे त्‍यामुळे अर्जदाराच्‍या तक्रारीमध्‍ये निश्चितच तथ्‍य आहे असे स्‍पष्‍ट दिसते.दुसरी गोष्‍ट अशी की, कृषी पंपासाठी विज कनेक्‍शन घेतले नसल्‍याबाबतची अर्जदाराची तक्रार आल्‍यानंतर ज्‍या विहिरीवर गैरअर्जदाराने 1996 साली दिले होते ती विहिर  व ती ज‍मीन नेमकी कोणाच्‍या मालकीची आहे विज मागणी करणा-या फॉर्मवर सही करणारी व्‍यक्‍ती कोण होती याची चौकशी करुन पंचनामे करायला हवे होतेत्‍या संबंधीचा देखील  कसलाही पुरावा गैरअर्जदारांनी मंचासमोर दाखल केलेला नाही.नि.15 लगत दाखल केलेल्‍या एफ 1 रजिस्‍टरच्‍या उता-यातुन अनुक्रम नंबर 13 ला अर्जदाराच्‍या नावे विज कनेक्‍शन दिले असल्‍याचे तपशिल दिला असला तरी आणि नि.15/2 वरील बिल अर्जदाराच्‍याच नावचे दिसते असले तरी मुळातच अर्जदाराने त्‍यावरच आक्षेप घेवुन तथाकथीत विज कनेकशन त्‍याने घेतलेलेच नाही अशी तक्रार केलेली असल्‍यामुळे गैरअर्जदारातर्फे दाखल केलेल्‍या पुराव्‍यातून बचावाला मुळीच बळकटी येत नाही.

       वरील सर्व बाबी विचारात घेता गैरअर्जदाराकडून अर्जदारानेच कनेक्‍शन घेतले असले संबंधीचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही व त्‍यांच्‍याकडून शाबीत ही झालेले नाही त्‍यामुळे मुद्दा क्रमांक दोनचे उत्‍तर नकारार्थी देवुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.

         आदेश                         

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार याने अर्जदाराच्‍या नावे ग्राहक क्रमांक 536200062571 च्‍या कृषी पंपावरील विज वापराची दिलेली तारीख 22/01/2007, तारीख 06/02/2010 व तारीख 29/10/2010 रद्द करण्‍यात येत आहे.

3     गैरअर्जदारास असाही आदेश देण्‍यात यतो की,संबंधीत ग्राहक नंबर वरच्‍या कृषी पंपाची बिले यापुढे अर्जदाराला देवु नयेत.

4     अर्जदाराने विज कनेक्‍शन घेतले नसतांनाही बिले देवुन मानसिक त्रास व सेवेतील त्रूटी केल्‍याबद्दल  नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 3,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member