निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18/08/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011 तक्रार निकाल दिनांकः- 13/03/2012 कालावधी 06 महिने. 24 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ज्ञानेश्वर राघोजी लाटे, अर्जदार वय 61 वर्ष.धंदा.- सेवानिवृत्त(राज्य शासकीय कर्मचारी) स्वतः रा.अंबिका नगर,वांगीरोड.हडकोजवळ,परभणी. विरुध्द 1 श्री.नागरगोजे.उप अभियंता. गैरअर्जदार. (मोबाईल) भारत संचान निगम लि.परभणी. अड.जी.एम.आनेराव. शनिवार बाजार,परभणी. 2 प्रबंधक.भारत संचार निगम लि.(मो.) महादजी शिंदे भवन. पुणे. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराच्या मोबाईल मध्ये भरलेली बॅलेन्स रक्कम वापर न करता वारंवार कमी होत असल्याबाबत अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा 2006 पासून भारत संचार निगम या कंपनीच्या मोबाईल सेवेचा उपभोक्ता आहे.प्रीपेड ग्राहक असल्यामुळे कंपनीकडे मोबाईल सेवा वापरासाठी आवश्यक असलेला बँलेन्स वारंवार डिपॉझीट करत आलेला आहे.दरम्यानच्या काळात आउटगोइंग व इनकमिंग सेवशिवाय इतर कोणत्याच सेवेची कधीही मागणी केलेली नाही.गैरअर्जदाराकडे डिपॉझीट केलेली रक्कम आणि मोबाईल सेवेचा केलेला वापर पहाता मोबाईल सेवेचा वापर केलेला नसतानाही डिपॉझीट केलेल्या रक्कमे मधून रक्कम वारंवार कमी झालेली आहे.त्यामुळे अर्जदाराने दिनांक 31/05/2010 रोजी लेंखी तक्रार केलेली आहे.त्याला कंपनीने उत्तर दिलेले नाही. अर्जदाराने वेळोवेळी जमा केलेली रक्कम व मोबाईचा वापर यांचा ताळेबंद मिळण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार केलेली आहे. व गैरअर्जदाराकडून रु. 2900/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदारांशी केलेला पत्रव्यवहार पैसे भरल्याच्या पावत्या इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने मोबाईलवर दिनांक 21/02/2011 ते दिनांक 01/07/2011 दरम्यान क्रिकेटच्या सवलतीचा वापर केलेला आहे. व दिनांक 19/07/2011 ते 19/08/2011 या काळात रेडीओ सेवेचा वापर केलेला आहे. त्यामुळे अर्जदाराच्या बॅंलेन्स मधून योग्यती रक्कम कपात केलेली आहे. कॉल सेंटर रिपोर्ट वरुन दिनांक 01/07/2011 रोजी दुपारी 14.42 मिनीटानी अर्जदाराच्या मोबाइलव्दारे क्रिकेट सेवा खंडीत करण्याची विनंती केली. तसेच अर्जदाराने रु.110/- जमा केले होते त्यातील रु.10,25 सेवा शुल्क वजा रु.99.75 शिल्लक व रु.7.83 चा कॉल केला व रु.15/- ची क्रिकेट सेवा कपात झाली असे रु.76.92 जमा होते तसेच रु.50/- मधील सेवा शुल्क वजा रु.43.33 जमा झाले अर्जदाराने रेडीओ सेवेचा वापर केला होता म्हणून रु.25/- वजा जाता रु.21.45 शिल्लक होते व रु.3/- चा कॉल केला व रु.18.45 शिल्लक राहिले त्यामुळे अर्जदाराची कोणतीही फसवणुक अथवा लुबाडणुक केलेली नाही. अर्जदारास वारंवार खोट्या तक्रारी करायची सवय आहे, म्हणून अर्जदाराची खोटी तक्रार रु. 5000/- च्या नुकसान भरपाईसह नामंजूर करण्याची विनंती केलेले आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, कॉल डिटेल्स, डिव्हीजनल इंजिनिअरनी दिलेला रिपोर्ट इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदार गैरअर्जदाराचा मोबाईल क्रमांक 9421867545 चा ग्राहक आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराच्या तक्रारी नुसार अर्जदाराने गैरअर्जदाराच्या वापर न केलेल्या सेवांसाठीसुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराकडून रक्कम वसुल केलेली आहे.गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदाराने त्याच्या मोबाईलवर क्रिकेट व रेडीओ सेवेचा वापर केलेला आहे.त्यामुळे अर्जदाराकडून या सेवेबाबत योग्य तीच रक्कम कपात केलेली आहे.तसेच दिनांक 01/07/2011 रोजी अर्जदाराने क्रिकेटची सेवा खंडीत करण्याची विनंती केली व ती खंडीतही करण्यात आली.अर्जदाराने स्वतःच फोन करुन ही सेवा खंडीत करण्याची विनंती केलेली होती हे नि.13/2 वरील स्टेटमेंट वरुन सिध्द होते. अर्जदाराने स्वतः फोन केला म्हणजे अर्जदाराला या सेवेबाबत माहिती होती गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने जमा केलेली रक्कम व त्याचा झालेला विनियोग सविस्तर दिलेला आहे. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हांस वाटत नाही, म्हणून खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |