Maharashtra

Jalna

EA/10/11

Purna Sahakari Kharedi Vikri Sangh - Complainant(s)

Versus

Deputy Director Balaji Sahakari Sakhar Kharkhana - Opp.Party(s)

D.M.Janjal

13 Oct 2010

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
EXECUTION APPLICATION NO. 10 of 11
1. Purna Sahakari Kharedi Vikri Sangh Akola Deo, Tq. Jafarabad JalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Deputy Director Balaji Sahakari Sakhar KharkhanaAt.Post.Tq.Risod WashimMaharashtra2. Collector, JalnaJalnaJalnaMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 13 Oct 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आदेश
                                                                                                (दि.13.10.2010)
     
     तक्रारदाराने कलम 27 ग्राहक संरक्षण कायदा 1986  नुसार हा अंमलबजावणी अर्ज दाखल केला आहे.
      तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍याने या मंचासमोर दाखल केलेली तक्रार क्रमांक 90/2001 मध्‍ये या मंचाने दिनांक 23.05.2003 रोजी पारीत केलेल्‍या आदेशानुसार गैरअर्जदार बालाजी सहकारी साखर कारखाना यांनी आदेशीत रक्‍कम दिली नाही व मंचाच्‍या आदेशाचे पालन केले नाही. म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द दंडात्‍मक कार्यवाही करावी.
      तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व कागदपत्रांचे अवलोकन केल्‍यानंतर गैरअर्जदारांना समन्‍स बजावण्‍यात आले. गैरअर्जदार आरोपी क्रमांक 1 बालाजी सहकारी साखर कारखाना मर्या. मसलापेन ता.रिसोड जि.वाशीम यांच्‍या वतीने मंचासमोर जिल्‍हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्‍था वाशीम हे हजर झाले. त्‍यांनी नि. 8 द्वारे असे निवेदन केले की, बालाजी सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्‍यात आलेला असुन, अवसायक म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती सदर कारखान्‍यावर करण्‍यात आलेली आहे आणि अवसायकाकडे काहीही आर्थिक अधिकार नाहीत.
      कोणत्‍याही सहकारी संस्‍थेवर अवसायकाची नेमणूक झालेली असेल तर अशा अवसायका विरुध्‍द कलम 27 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार फौजदारी कार्यवाही करता येऊ शकत नाही. बालाजी सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्‍यात आलेला असुन त्‍या कारखान्‍यावर जिल्‍हा विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्‍था वाशीम यांना अवसायकम्‍हणून नेमण्‍यात आल्‍याबाबतचे साखर आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांचे आदेश जिल्‍हा विशेष लेखा परीक्षकांनी सादर केलेले आहेत. बालाजी सहकारी साखर कारखाना अवसायनात काढण्‍यात आलेला असल्‍यामुळे जिल्‍हा विशेष लेखा परिक्षक यांचे विरुध्‍द कलम 27 ग्राहक संरक्षण अधिनियमा नुसार कार्यवाही करणे योग्‍य ठरणार नाही. किंबहूना त्‍यांचे विरुध्‍द अशा प्रकारची कार्यवाही चालू शकत नाही. तसेच तक्रारदाराने सदर प्रकरणात जिल्‍हाधिकारी जालना यांना आरोपी केलेले आहे. परंतू मुळ तक्रार 90/2001 मध्‍ये जिल्‍हाधिकारी जालना यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश पारीत करण्‍यात आलेले नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांना या प्रकरणात विनाकारण आरोपी करण्‍यात आलेले आहे. म्‍हणून प्रस्‍तुत अंमलबजावणी अर्ज फेटाळण्‍यात येतो.           

HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, MemberHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,