ORAL (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदारातर्फे अड राहूल जोशी हजर. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. गैरअर्जदारानी दि.26.06.2009 रोजी असेसमेंट बिल तक्रारदारास दिले, त्या बिलाचा भरणा दि.31.07.2009 रोजी तक्रारदारानी केला. त्यानंतर दि.23.10.2009 रोजी मंचात तक्रार दाखल केली. गैरअर्जदारानी त्यांचा लेखी जबाब दाखल केला. लेखी जबाबासोबत स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट, असेसमेंट बिल, पंचनामा, तक्रारदारास पाठविलेली नोटीस, आणि टेस्ट रिपोर्ट दाखल केला. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार स्पॉट इन्स्पेक्शनच्या वेळेस तक्रारदाराचे मीटर तुटलेले, मीटरला टर्मिनल कव्हर नाही, बॉडी कव्हर नाही, मीटर सिल नाही अशी स्थिती सांगितली होती. त्यानंतर त्यांनी मीटर, टेस्टींगला पाठवून दिले. यावरुन गैरअर्जदार, तक्रारदाराची तक्रार इलेक्ट्रीसिटी अक्टच्या 135 आणि 138 नुसार तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात. मंचानी दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली. विशेषतः दि.23..06.2009 च्या स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट, पंचनामा पाहता, त्यामध्ये मीटर बॉक्स नॉट अव्हेलेबल, मीटर बॉडी नॉट अव्हेलेबल, मीटर टर्मिनल कव्हर नॉट अव्हेलेबल, स्टेटस मीटर स्लो, अक्युचेक मधील आलेला रिझल्ट 24.06% असा दाखविलेला आहे. त्यानंतर तक्रारदाराच्या मीटरचे टेस्टींग करण्यात आले, त्याचा अहवाल ज्युनिअर इंजिनिअरच्या सहीने मंचात दाखल केला आहे, त्यामध्ये Seal Position : all seals Intact तसेच Meter found (-) 20.36% Slow, all seals found intact / No foreign parts found/ No tamering found असा रिपोर्ट दिलेला आहे बाकीची अक्षरे वाचता येण्यासारखी नाहीत. गैरअर्जदारानी स्पॉट पंचनाम्यामध्ये मीटर सील तुटलेले आहे, असे दाखविले आहे. आणि रिपोर्टमध्येच सर्व काही व्यवस्थित आहे असे परस्पर विरोधी विधान करुन रिपोर्ट दिलेला आहे. वास्तविक पाहता, टेस्ट रिपोर्ट हा मीटरमधील आणि इलेक्ट्रीसिटी इंजिनिअरसारखे तज्ञ लोक देतात, त्यामुळे त्यांचा अहवाल हा अचुक व योग्य त्या स्पष्टीकरणासहीत येणे आवश्यक असते. परंतू गैरअर्जदारानी ज्युनिअर इंजिनिअरच्या सहीने हा रिपोर्ट दिलेला दिसून येतो. घटनास्थळ पंचनामा आणि रिपोर्टमध्ये तफावत असल्याचे दिसून येते. मीटर टेस्टींग अहवाल हा सेक्शन 135 आणि 138 हे ठरविण्यासाठीचा महत्वाचा पुरावा आहे. या पुराव्यावरुनच वीजचोरी आहे किंवा नाही हे ठरविता येते, तोच रिपोर्ट गैरअर्जदारानी अचुक व व्यवस्थित स्पष्टीकरणासहीत दिलेला नाही. त्यांच्या अहवालावरुन तक्रारदारानी वीजचोरी केली नाही असे दिसून येते. प्रश्न राहिला तो - 20.36% मीटर मंदगतीने फिरत असल्याचा, अहवालामध्ये मीटर – 20.36% मंदगतीने फिरत असल्याचे नमूद केले आहे. परंतू इलेक्ट्रीसिटी अक्टच्या कलम 135 नुसार मीटर मंदगतीने कुठल्या कारणामुळे फिरत आहे त्याचे स्पष्टीकरण, कारण देणे आवश्यक आहे. परंतू गैरअर्जदारानी तसे स्पष्टीकरण दिलेले नाही, म्हणून मंच, मीटर मंदगतीने फिरत असल्याचे ग्राहय धरत नाही. गैरअर्जदारानी घटनास्थळ पंचनामा केलेला आहे, सर्व पंचाची स्वाक्षरी आहे, टेस्ट रिपोर्ट दि.24.06.2009 चा आहे, नोटीसही दि.24.06.2009 ची आहे, आणि त्याच दिवशी मीटर टेस्टींग अहवालासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते, हे सर्व पाहता अशा प्रकारची नोटीस देणे हे योग्य नाही असे मंचाचे मत आहे. नोटीस दिल्यानंतर नियमाप्रमाणे अवधी तक्रारदारास द्यावयास पाहिजे होता. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये तक्रारदारानी वीजचोरी केली नाही हे सिध्द होते. गैरअर्जदार महावितरण कंपनीने यापुढे घटनास्थळ पंचनामा, मीटर टेस्टींग अहवाल योग्य त्या कारणासहीत, स्पष्टीकरणासहीत मंचात दाखल करावा. कारण, महावितरण कंपनीकडे त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असतात. या सर्व प्रकारामुळे तक्रारदारास शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल त्यामुळे ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतात असे मंचाचे मत आहे. तक्रारदारानी असेसमेंट बिल व कंपाऊंड बिल भरलेले आहे. गैरअर्जदारानी रक्कम रु..17,300/- दि.26.06.2009 पासून 9% व्याजाने तक्रारदारास परत करावी, नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावेत. असा आदेश मंच पारित करीत आहे. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) गैरअर्जदारानी, तक्रारदारास असेसमेंट बिल व कंपाऊंड बिलाची भरलेली रक्कम रु.17,300/- दि. 26.06.2009 पासून 9% व्याजाने परत करावी. नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रु. 5,000/- द्यावेत. या आदेशाची पुर्तता निकाल दिनांकापासून सहा आठवडयाच्या आत करावी. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |