Maharashtra

Nanded

CC/09/15

Shaikh Amjod S/o Shaikh Ameenab - Complainant(s)

Versus

Dept.Eng.MSEDCL.Nanded - Opp.Party(s)

Adv.Shrirang T.Choudhary

04 Apr 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/15
1. Shaikh Amjod S/o Shaikh Ameenab R/oKhudvovnagar,Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Dept.Eng.MSEDCL.Nanded Vidduat Bhavan,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 04 Apr 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.2009/15.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  16/01/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 04/04/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील       अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
शेख अमजद पि. शेख अमीन साब
वय 28 वर्षे, धंदा व्‍यापार,                                अर्जदार
रा.खुदवईनगर, ब्रम्‍हपुरी, नांदेड
 
विरुध्‍द
अधिक्षक अभिंयता,
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी,                       गैरअर्जदार
विद्युत भवन, नांदेड.
 
 
अर्जदारा तर्फे.           - अड.श्रीरंग तु. चौधरी
गैरअर्जदार तर्फे         - अड.विवेक नांदेडकर.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी यांच्‍या ञूटीच्‍या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे.
              अर्जदार हे प्‍लॉट नंबर 96 मौजे ब्रम्‍हपूरी या जागेत अनेक वर्षापासून राहतात. प्‍लॉटची मालकीण व अर्जदाराची बहीण शेख फरीदाबी यांचे नांवाने विज मिटर नंबर 550010787700 असा असून कोटेशनची पूर्ण रक्‍कम व डिसेंबर 2008 पर्यतची सर्व बिले अर्जदार यांनीच भरलेली आहेत. मिटर जरी शेख फरीदाबी हिच्‍या नांवावर असला तरी त्‍यांचा उपभोग अर्जदार हेच घेत आहेत. त्‍यामूळे ते खरे लाभार्थी आहेत.   असे असताना प्‍लॉट मालक व अर्जदाराची बहीण शेख फरीदाबी यांनी कायदेशीरपण अर्जदाराला बेदखल करुन हाकलून देण्‍याचा चंग बांधला आहे. त्‍यासाठी तिने पोलिसामध्‍ये दि.29.11.2008 रोजी तक्रार केली व पूढे मा. दिवाणी न्‍यायालयात दिवाणी दावा क्र.571/08 दाखल केला असून प्रकरण न्‍याय प्रविष्‍ठ आहे.
 
              यासर्व पार्श्‍वभूमीवर शेख फरीदाबी हिने खोडसाळपणे तक्रार करुन व गैरअर्जदारांची दीशाभूल करुन अर्जदाराचा विज पूरवठा बंद केला आहे. अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदाराला गैरअर्जदाराकडून सेवेचा लाभ पूर्ववत मिळवून दयावा तसेच त्‍यांना विज पूरवठा करण्‍यात यावा. म्‍हणून हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
              गैरअर्जदार हे व‍किलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. विज वितरण कंपनीच्‍या अधिका-याच्‍या वैयक्‍तीक पदनामाने तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. विज कायदा कलम 168 नुसार असे करता येत नाही. अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण दाखल होऊ शकत नाही. अर्जदाराने ग्राहक शेख फरीदाबी यांना पार्टी केलेले नाही. अर्जदाराने प्‍लॉटची मालकीन व त्‍यांची बहीण शेख फरीदाबी हिचे नांवावर मिटर ग्राहक क्र. 550010787700 याद्वारे रितसर पैसे भरले आहेत हे अर्जदाराचे म्‍हणणे चूकीचे आहे. सदरील विज जोडणीचा ग्राहक शेख फरीदाबी शेचा यूसुफ या आहेत. खरा लाभार्थी अर्जदार हे म्‍हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराने दिवाणी दाव्‍याची प्रत दाखल केलेली आहे व सदर प्‍लॉट हा वादग्रस्‍त असल्‍याचे दाखवलेले आहे. शेख फरीदाबी यांनी दि.04.12.2008 रोजी गैरअर्जदार यांना अर्ज दिला व अर्जदाराला खाजगी कामामूळे बाहेरगांवी जावे लागत आहे म्‍हणून सहा महिन्‍यासाठी विज पूरवठा बंद करावा असे म्‍हटले आहे. त्‍यामूळे त्‍यांच्‍या विनंतीवरुन विज पूरवठा तात्‍पूरता तोडला आहे. शेख फरीदाबी यांनी त्‍या प्‍लॉटवर स्‍वतः काबीज असल्‍याचे प्रतिपादन केलेले आहे. अशा दृष्‍यमान परिस्थितीमध्‍ये फरीदाबी नामक व्‍यक्‍ती मालक असल्‍याचे दिसून येते, ती ग्राहक देखील आहे. त्‍यामूळे अर्जदार हे ग्राहक नाहीत. त्‍यांची मागणी चूक आहे. म्‍हणून अर्जदाराचा अर्ज हा खर्चासह फेटाळावा असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                               उत्‍तर
   1.   अर्जदार हे ग्राहक आहेत काय ?                 नाही.
   2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द             नाही.
होते काय ?                
 3.  काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
 
                          कारणे
 
मूददा क्र.1 व 2  ः-
 
              अर्जदाराने ग्राहक क्र.550010787700  या ग्राहक क्रमांकाचे विज बिल दाखल केलेले आहे. त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे फरीदाबी शेख अहेमद यूसुफ  असे लिहीलेले आहे. कोटेशन देखील फरीदाबी यांचे नांवानेच भरलेले आहे. हे कोटेशनची पावती व विज बिल अर्जदार स्‍वतः भरत आहेत असे उपलब्‍ध पूरावा नाही. अर्जदार यांचेकडे प्‍लॉट नंबर 96  कसा आला  यावर त्‍यांचा ताबा आहे, याबददलचा कोणताही पूरावा उपलब्‍ध नाही. अर्जदार व प्‍लॉट मालक यांचेत भाडेकरु व मालक असे नाते आहे काय ? हे देखील अर्जदार सिध्‍द करु शकलेले नाहीत. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक कसे काय होतील ? अर्जदारांनी वादग्रस्‍त प्‍लॉटवर त्‍यांचा ताबा आहे असे म्‍हटले आहे. परंतु शेख फरीदाबी यांनी अर्जदाराचे विरुध्‍द आरसीएस नंबर 571/2008 IInd Joint Civil JudgeJunior Dsivision, Nanded  यांचे न्‍यायालयात Possession बाबत Temporary Injunction चा दावा दाखल केलेला आहे. अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायदा,1986 मधील कलम 2(ड) नुसार ग्राहक होऊ शकत नाहीत. शिवाय एखादया न्‍यायालयात प्रकरण चालू असल्‍यानंतर त्‍या न्‍यायालयाचा निकाल लागण्‍याआधी परत दूस-या न्‍यायालयात तक्रार दाखल करणे हे कायदयाने योग्‍य नाही. अर्जदाराने कोणत्‍या तरी एका न्‍यायालयात तक्रार दाखल करावी. एकंदर कागदपञावरुन व गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍यावरुन प्‍लॉट हा वादग्रस्‍त आहे व प्‍लॉट कूणाच्‍या ताब्‍यात आहे हे सिध्‍द करणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत अर्जदार हे लाभार्थी होऊ शकत नाहीत किंवा अन्‍य असा कोणताही पूरावा समोर आलेला नाही. गैरअर्जदारांनी दि.04.12.2008 रोजीचे एक पञ गैरअर्जदार यांचे नांवे दिलेले आहे व त्‍यात ते त्‍यांचे काही खाजगी कामानिमीत्‍त  बाहेरगांवी जात होते. त्‍यामूळे त्‍यांचा विज पूरवठा तात्‍पूरता बंद करावा असा अर्ज दिलेला आहे असे करुन गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी केलेली नाही. अर्जदार हे ग्राहक असल्‍या बाबत किंवा लाभार्थी असल्‍या बाबत ठोस असा कोणताही पूरावा मंचात देऊ शकलेले नाहीत. म्‍हणून यांच मूददयावर त्‍यांचा अर्ज खारीज करणे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने योग्‍य ठरते.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
                          आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
(बी.टी.नरवाडे,पाटील)       (श्रीमती.सुजाता पाटणकर)        (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                                सदस्‍या                       सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.