निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 13/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 26/05/2011 कालावधी 05 महिने 10 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 सुधाकर पिता दत्तराव पौळ. अर्जदार वय 40 वर्षे.धंदा. शेती. अड.एस.एस.चव्हाण. रा.मौजे.सुरपिंप्री.ता.जि.परभणी. 2 नारायण पिता दत्तराव पौह. वय 47 वर्षे.धंदा शेती. रा.मौजे.सुरप्रिप्री.ता.जि.परभणी. 3 भगवान पिता दत्तराव पौळ. वय 55 वर्षे.धंदा शेती. रा.मौजे.सुरपिंप्री.ता.जि.परभणी. 4 राधाकिशन पिता दत्तराव पौळ. वय 45 वर्षे.धंदा शेती. रा.मौजे.सुरपिंप्री.ता.जि.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. म.रा.विज तवतरण कं.म.जिंतूर रोड.परभणी. अड.एस.एस.देशपांडे. 2 सहाय्यक अभियंता. म.रा.विज वितरण कं.म.उपविभाग (ग्रामीण) जिंतूर रोड.परभणी.ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,अर्जदार क्रमांक 1 ते 4 हे मौजे सुरपिंप्री ता.जि.परभणी येथील कायमचे राहणारे असून गट नं. (209) संपूर्ण क्षेत्रफळ 2 हेक्टर 59 आर चे अधिक पोटखराब (5) अकार रुपये 8.76 पैसे शिवार मौजे सुरपिंप्रीचे मालक व ताबेदार असून वरील वर्णनाची जमीन अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांची वडीलोपार्जित असून सर्व अर्जदार हे आपसामध्ये सख्खे भाऊ आहेत.सर्वजण संयुक्त कुंटूंबातच राहतात.अर्जदार क्रमांक 1 याच्या नावे 53 आर आकार रुपये 1.53 पैसे अर्जदार क्रमांक 2 यांच्या नावे 59 आर रुपये 1.70 पैसे अर्जदार क्रमांक 3 यांच्या 98 आर आकार रुपये 2.83 पैसे व अर्जदार क्रमांक 4 यांच्या नावे हेक्टर 49 आर रुपये 1.41 पैसे शेत जमीन आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या परवानगीने विद्युत पुरवठा अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना बद्दल परवाना दिला असून अर्जदारांनी वेळोवेळी वरील विद्युत वापराची विद्युत आकारणी शुल्क हे वरील कार्यालया मध्ये भरलेले आहे.म्हणून ते गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत.अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी गट नंबर 209 मध्ये वर्ष 2006 ते वर्ष 2007 व वर्ष 2007 ते वर्ष 2008 यामध्ये काही क्षेत्रामध्ये ऊसाचे व केळीचे बागायती पीक घेतले होते अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी वरील जमीन गट क्रमांक 209 मध्ये त्याच्या विहीरीवर विद्युत मोटार बसवली असून गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा त्या मोटारीवर घेण्यासाठी विहीरी पर्यंतचा विद्युत पुरवठा गैरअर्जदाराने लावलेल्या पोलच्या तारां मार्फत करीत होते हे जे विद्युत तारांचे पोल अर्जदाराच्या शेतातून गेलेले होते तेव्हा त्या दरम्यान इलेक्ट्रीक पोलच्या तारा ढिल्या झाल्यामुळे व वारंवार तारा घासल्यामुळे ठिणग्या देखील उडत होत्या ही बाब गैरर्जदारांना तोंडी व लेखी अर्जाव्दारे गैरअर्जदारांना कळवली होती, परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही तसेच गट क्रमांक 209 मध्ये विद्युत तारांची तात्काळ पाहणी करुन सुरक्षीत असे डिव्हायडर्स विद्युत पोलमध्ये घ्यावे असे ही गैरअर्जदाराना सुचविले होते, परंतु गैरअर्जदारांनी त्याकडे स्पेशल दुर्लक्ष केले.अर्जदार क्रमांक 1 ते 4 यांनी गट क्रमांक 209 मध्ये पाच एकर 7 आर ऊस व 0 हेक्टर 53 आर केळीचे पीक घेतलेले होते सदरील दोन्ही पीके हे काढण्यासाठी आलेले होते परंतु दुर्दैवाने दिनांक 02/05/2008 रोजी दुपारी 3 वाजता तारांचे घर्षण होवुन त्याच्या ठिणग्यापडून आग लागली व ऊसाचे संपूर्ण क्षेत्र व केळीचे संपूर्ण क्षेत्र जळून जावुन राख झाले सदरील घटना दिनांक 06/05/2008 रोजी दैठणा पोलिस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली. तसेच तहसिलदार संबंधीत तलाठी यांच्याकडे यासंबंधीची लेखी तक्रार दिली. यानंतर संबंधीत तलाठी व तहसिलदार यांनी घटनास्थळास प्रत्यक्ष भेट घेवुन पंचनामा केला. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना सुचना देवुन देखील त्यांनी स्थळ पाहणी केली नाही, किंवा साधी चौकशी देखील केली नाही गैरअर्जदारांच्या हलगीर्जीपणामुळे अर्जदारांचे आतोनात नुकसान झाले व गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्याचे नकारले म्हणून अर्जदारांनी हि तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदारांनी केळीचे रु. 3,00000/- व ऊसाचे रुपये 2,64,350/- नुकसान भरपाई द्यावी.संपूर्ण जमीनीच्या क्षेत्रफालावर हस्तीपाईप लाइन जळाल्याबद्दल 1,30,000/- ची नुकसान भरपाई तसेच मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रक्कम रु.30,000/- व दाव्याचा खर्च रु.5000/- तसेच जळालेला ऊस केळी व पाईपलाईन हे काढण्यासाठी लागलेला मजुरी खर्च रुपये 1,50,000/- द्यावे अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदारांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/8 नि.18/1 ते नि. 18/27 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना मिळाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि.14 वर दाखल करुन अर्जदाराचे म्हणणे बहुतअंशी अमान्य केले आहे.गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी नुसार अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक नाहीत.तसेच सदरील तक्रार ही दिवाणी स्वरुपाची असल्यामुळे व गुंतागुंतीची असल्यामुळे ग्राहक मंचास हा वाद चालविण्याचा अधिकार पोहचत नाही.तसेच सदरील तक्रार ही मुदत बाह्य आहे.अर्जदारांनी खोटी व बनावट तक्रार मंचासमोर दाखल केलेली असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.अशी विनंती गैरअर्जदारांनी मंचासमोर केली आहे. गैरअर्जदारांनी लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि. 15 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीत आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी असा बचाव घेतला आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज मुदत बाह्य आहे.हा कायदेशिर मुद्दा असल्यामुळे हा मुद्दा निकालासाठी विचारार्थ घेणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 24 (अ) (1) प्रमाणे तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षांच्या आत तक्रार अर्ज दाखल करावा लागतो. सदर प्रकरणात दिनांक 02/05/2008 रोजी अर्जदाराच्या शेतातील ऊस व केळीचे क्षेत्र संपूर्ण क्षेत्र जळून जाऊन राख झाले. म्हणजे तक्रारीस कारण दिनांक 02/05/2008 रोजी घडले अथवा दिनांक 07/06/2008 रोजी (म्हणजे तलाठी यांनी केलेला पंचनामा ) घडले असे जरी मानावयाचे झाल्यास तरी तेंव्हा पासूनही 2 वर्षांच्या आत अर्जदारांनी तक्रार दाखल केलेली नाही. अर्जदारांनी तक्रार दिनांक 13/12/2010 रोजी दाखल केलेली आहे.व या दरम्यान तक्रार अर्जास सलग कारण घडल्याचा पुरावा ही मंचासमोर अर्जदारा मार्फत दाखल करण्यात आलेला नाही.तसेच तक्रार अर्जासोबत विलंब माफीचा अर्जही दाखल करण्यात आलेला नसल्यामुळे सदर प्रकरण हे कायदेशिर मुदतीत नसल्याचे मंचाचे मत आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1) अर्जदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2) दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |