जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 230/2008. प्रकरण दाखल तारीख - 26/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/09/2008 समक्ष – मा.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्य विश्वनाथ पि. रावसाहेब हंबर्डे वय 31 वर्षे धंदा, शेती, अर्जदार. रा. मु.पो.वाका ता. लोहा जि. नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादित ता. लोहा जि. नांदेड मार्फत सहायक अभिंयता. 2. महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादित. गैरअर्जदार विद्यूत भवन नांदेड मार्फत कार्यकारी अभिंयता. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.जी.कोलते गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तकार दाखल केली आहे. अर्जदार हे शेतकरी असून त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून विज पूरवठा घेतलेला आहे. त्यांचे कूटूंब दिवसभर शेतात काम करते व राञीच्या वेळी घरात येते. त्यांचेकडे टी.व्ही. फ्रिज, फॅन नाही. फक्त दोन बल्ब आहे व त्यांने स्वतःच्या घरच्या वापरासाठी घरेलू आटा चक्की घेतलेली आहे व तीला दोन एचपीची मोटार असून ती सिंगल फेजवर चालते. आटा चक्कीचा उल्लेख केल्यामूळे व्यावसायीक या सदराखाली मीटर देण्यात आले. खेड गावात सतत 14-14 तास लोडशेंडीग आहे व आटाचक्की एक वर्षापासून नादूरुस्त आहे. त्यामूळे विज वापर फारच कमी आहे. अर्जदाराच्या विज मिटरमध्ये काहीही बीघाड नाही. अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी नाही. मार्च,2008 मध्ये कनिष्ठ अभिंयता यांनी अचानक घरी येऊन दि.24.5.2008 रोजी रु.25,380/- चे बिल दिले. बिल भरा नसता विज पूरवठा बंद करण्यात येईल अशी धमकी दिली. दि.9.6.2008 रोजी अर्जदाराचे मिटरवर 843 रिंडीग आहे. बिल हे खोडसाळपणे दिले असून तयावर मिटर नंबर देखील नाही. सक्षम अधिका-याने बिल जारी केलेले नाही, बिल असेंसमेट बिल असे लिहीलेले आहे. विजेचा गैरवापर किंवा चोरी असे कूठेही लिहीलेले नाही किंवा पंचनामा ही केलेला नाही. अर्जदार यांची मागणी आहे की, दि.24.5.2008 रोजीचे रु.25,380/- चे बिल रदद करावे, नूकसान भरपाई बददल रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- मिळावा अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे, प्रतिपक्षावर दबाव टाकण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदारांच्या सक्षम अधिका-याने भेट दीली असता तीथे विजेचा अनाधिकृत वापर करताना आढळला. त्यामूळे अनाधिकृत वापराचे बिल देण्यात आलेले आहे. अर्जदाराने विज पूरवठा हा व्यावसायीक कारणासाठी घेतलेला आहे. त्यामूळे कलम 2 (1)(ड)(2) नुसार ते ग्राहक होऊ शकत नाहीत. अर्जदार यांचेकडे टी.व्ही., फ्रिज, व फॅन नाही हे म्हणणे चूकीचे आहे असे म्हटले आहे. अर्जदाराच्या घरी एक फॅन आहे व 60 एच.पी. चे आठ बल्ब, व आटा चक्की घेतली आहे असा विज वापर आढळला आहे. म्हणजेच पाहणी केलेली असता मिटरला टर्मिनल कव्हर नव्हते परंतु मिटरपर्यत विज पूरवठा करुन देणारी सर्व्हीस वायरला एक छेद करुन त्यामूळे बर्हिगत मार्गाने सर्व्हीस वायरला जोडून त्यावर डायरेक्ट वायर स्वतःच्या घरात घेतले होते. यांचा अर्थ त्यांच्याकडे येणारी विजेची नोंद मिटरवर न होऊ देता त्यापूर्वीच वळती करुन घेऊन डायरेक्ट विज घेतली. हा विजेचा अनाधिकृत वापर होता. अर्जदार हा मिटरमध्ये नोंद होऊ न देता डायरेक्ट विज वापरत होता म्हणून विजेच्या अनाधिकृत वापराखाली अर्जदारास विज कायदा,2003 च्या कलम 126 नुसार विज बिल देण क्रमप्राप्त होते व प्रचलित दरानुसार 1926 यूनिटचे बिल त्यांना देण्यात आले ते अद्यापही त्यांने भरले नाही व ते बिल योग्य आहे. त्यामूळे गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही ञूटी केली नसल्यामूळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात होय. काय ? 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने ग्राहक नंबर 563410233767 या क्रंमाकानुसार गैरअर्जदाराकडून विज पूरवठा घेतलेला आहे व ते नियमितपणे बिल भरत आहेत व त्यांचा विजेचा वापर कमी आहे याबददल बरेच विज देयके दाखल केलेली आहेत. या संबंधीचे दि.4.6.2008 चे असेंसमेट बिल रु.25,380/- दाखल केलेले आहे. यावर जेई/कापशी/टे.भे./103 24.5.08 असे लिहीलेले आहे. हे बिल अर्जदाराने चॅलेंज केलेले आहे. गैरअर्जदारांनी या संबंधी दि.21.5.2008 रोजीचा स्पॉट इस्पेक्शन रिपोर्ट दाखल केलेला आहे. यावर मिटर बॉडी सिल ओके असे लिहीलेले आहे. परंतु क्र.15 वर The Joint is made to seselice utive (Incoming supply) so as to use the electricity directly. व मिटरमध्ये नोंदही लो कन्झंमशंन असे लिहीलेले आहे. हया स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्टवर काशिनाथ व कनिष्ठ अभिंयता या दोघांची सही आहे. अर्जदारांनी यावीषयी आक्षेप घेतला आहे. या स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्टवर अर्जदार यांची सही नाही. शिवाय गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात म्हटल्याप्रमाणे सर्व्हीस वायरला मिटरच्या अगोदर छेद करुन सप्लॉय डायरेक्ट करुन घेतला. त्यामूळे मिटरमध्ये त्यांची नोंद होत नव्हती. हया त्यांच्या म्हणण्यास पूष्टी मिळण्यासाठी व अर्जदार यांचेवर विज चोरीचा आरोप करण्यासाठी त्यांनी दोन पंच बोलावून त्यांची समक्ष घटनास्थळावर व वस्तूस्थितीचा पंचनामा करणे आवश्यक असताना त्यांनी तसे केले नाही. म्हणून स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणजे पंचनामा असे म्हणता येणार नाही. अर्जदार यांनी कनिष्ठ अभिंयता हे अशा प्रकारची कारवाई करण्यास सक्षम अधिकारी नाही असा आक्षेप घेतला आहे. यावीषयी कनिष्ठ अभिंयत्यांना काय अधिकार आहेत यावीषयीचाही पूरावा गैरअर्जदार यांनी दिलेला नाही. परंतु आपल्या लेखी म्हणण्यात फक्त ते सक्षम अधिकारी आहेत एवढेच म्हटले आहे. ती कारवाई अर्जदार यांचे समोर झालेली नाही. व यात गैरअर्जदार यांचेशिवाय वस्तूस्थिती कोणीही पाहिलेली नाही. त्यामूळे अर्जदाराचे म्हणणे खरे का ? गैरअर्जदाराचे म्हणणे खरे ? यावीषयी संभ्रम निर्माण होतो. यांचा फायदा अर्जदार यांना मिळू शकतो. गैरअर्जदार यांचे अधिकारी कारवाई करतात परंतु त्यांला पूरेसा आधार नसतो. त्यामूळे अर्जदाराने जरी विजेची चोरी केलेली आहे असे गैरअर्जदार यांचे म्हणणे खरे असेलच असे म्हणता येत नाही. अर्जदार यांचे मिटर चालू स्थितीत आहे सिल ओके आहे, तेव्हा गैरअर्जदार यांनी विज अधिनियम,2003 कलम 126 नुसार बिल देता येणार नाही व असे बिल गैरकायदेशीर ठरते. अर्जदार यांचा आक्षेप मिटरमध्ये विज प्रवाह जर जातच नसेल व तो अगोदरच वळता केला असेल तर त्यांचे मिटरमध्ये नोंद येणार नाही व मिटरमध्ये 843 यूनिटची नोंद आलेली आहे. हा आक्षेप ग्रहीत धरण्यात येतो. गैरअर्जदाराने दिलेले बिल हे गैरकायदेशीर आहे म्हणून ते रदद करण्याच्या योग्यतेचे आहे. असे करुन गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी केलेली आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी दिलेले दि.24.5.2008 चे बिल रु.25,380/- रदद करण्यात येते. 3. हया निकालापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी मिटरवरील यूनिटची नोंद लक्षात घेऊन त्याप्रमाणे अर्जदारास विज वापराचे दूरुस्त विज देयक देण्यात यावे व ते अर्जदाराने ताबडतोब भरावे. 4. मानसिक ञासाबददल रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु.1,000/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |