Maharashtra

DCF, South Mumbai

CC/08/15

Sayyad R.P.S. Hakim - Complainant(s)

Versus

Dena Bank - Opp.Party(s)

Dsouza

30 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/08/15
 
1. Sayyad R.P.S. Hakim
Dongari Jeil Road, Alagym Place 5th Manjala Plat No.501
Mumbai
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Dena Bank
Shakha Noor Bag
Dogari Mumbai-40009
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष

ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
 

1) मूळ तक्रारदार सय्यद रजद यांचे सामनेवाला बँकेत बचत खाते क्रं.19396 होते. सदरचे तक्रारदारांचे खाते सामनेवाला बँकेत गेली 7-8 वर्ष होते. सामनेवाला बँकेनी तक्रारदारांना धनादेश क्रं.630941 ते 630960 ची धनादेश पुस्तिका दिली होती. तक्रारदारांनी आपल्‍या खात्‍यावरुन मोठया रकमेचा व्‍यवहार कधी केला नाही. तसेच, त्‍यांच्‍या खात्‍यावरील धनादेश कधी कोणत्‍या व्‍यक्तिला दिलेला नाही.
 
2) दि.29/07/2007 रोजी मयत तक्रारदार सय्यद रजद मुंबई येथून औरंगाबादला जाण्‍यापूर्वी सामनेवाला बँकेत जावून त्‍यांनी त्‍यांच्‍या बचत खात्‍याची चौकशी केली त्‍यावेळी त्‍यांच्‍या बचत खात्‍यात रु.67,361/- 40 पैसे जमा होते. त्‍यानंतर दि.13/09/2007 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला बँकेत जावून खाते पुस्तिका नोदणी करण्‍यासाठी दिली त्‍यांच्‍या खाते पुस्तिकेत नोंदी केल्‍यानंतर त्‍यांना त्‍यांच्‍या खात्‍यातून दि.02/08/2007 रोजी रक्‍कम रु.40,000/- काढल्‍याची नोंद निदर्शनास आली. वास्‍तविक तक्रारदारांनी रक्‍कम रु.40,000/- चा धनादेश कोणालाही दिलेला नव्‍हता किंवा स्‍वतः सदरची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यातून काढलेली नव्‍हती.
 
3) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या बचत खात्‍यातून दि.02/08/2007 रोजी रक्‍कम रु.40,000/- सामनेवाला बँकतील कर्मचारी यांनी संगनमत करुन तक्रारदारांची खोटी सही करुन काढली त्‍यास सामनेवाला बँकेतील अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. Withdrawal Slip वर रक्‍कम काढताना खाते पुस्तिका सादर करणे आवश्‍यक असते. बँक कर्मचा-यांनी Withdrawal Slip वरील खातेदाराच्‍या सहीची शहानिशा करणे आवश्‍यक असते. तथापि, या कामी सामनेवाला यांच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदारांच्‍या सहीची खात्री न करण्‍याचा बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा केल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- तक्रारदारांच्‍या संमतीशिवाय काढून घेण्‍यात आली.
 
4) तक्रारदारांनी सामनेवाला यांना वकिलांमार्फत दि. 19/10/2007 रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीसीप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारांची रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यात परत जमा केली नाही.
 
5) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे कोणा अज्ञात व्‍यक्तिने दि.02/08/2007 रोजी रक्‍कम रु.15,000/- त्‍यांच्‍या खात्‍यात वटविण्‍यासाठी धनादेश पाठविला परंतु सदरचा धनादेश न वटविता परत पाठविला गेला. त्‍यानंतर पुन्‍हा कोणा अज्ञात व्‍यक्तिने रु.15,000/-चा दि.06/08/2007 रोजी दूसरा धनादेश पाठविला परंतु तोही धनादेश न वटविता सामनेवाला बँकेने परत पाठविला. तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- तक्रारदारांच्‍या परवानगी शिवाय काढून फसवणूक केली म्‍हणून तक्रारदारांनी दि.13/09/2007 रोजी डोंगरी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दाखल केली. तसेच, सामनेवाला यांच्‍या प्रादेशिक व्‍यवस्‍थापक मुख्‍य कार्यालय बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स यांना अर्ज पाठविला. तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढण्‍यात आले त्‍यास सामनेवाला जबाबदार आहेत असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे म्‍हणून तक्रारदारांनी सदरचा अर्ज या मंचासमोर दाखल केला आहे. सामनेवाला यांच्‍याकडून रु.40,000/- वसूल करुन देण्‍यात यावे व या अर्जाचा खर्च व मानसिक त्रासापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.10,000/- द्यावे असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे.
 
6) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाला बँकेत असणा-या खात्‍याची खाते पुस्‍ि‍तकेची छायांकित प्रत, प्रादेशिक व्‍यवस्‍थापक मुख्‍य कार्यालय बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स यांना दि.21/09/2007 रोजी पाठविलेल्‍या पत्राची प्रत, Withdrawal Slip ची छायांकित प्रत, त्‍यांच्‍या खात्‍याचा खाते उतारा, धनादेशाची छायांकित प्रत, डोंगरी पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या FIR ची छायांकित प्रत इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
 
7) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली. तक्रारदारांचे सामनेवाला बँकेत बचत खाते आहे ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले सर्व आरोप नाकारलेले आहेत. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या सेवेत कसलीही कमतरता नसल्‍यामुळे तक्रार अर्ज रद्द होण्‍यास पात्र आहे असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे.
 
8) तक्रारदारांनी दि. 25/06/2001 रोजी सामनेवाला बँकेत बचत खाते क्रं. 19396 उघडले होते. त्‍या खात्‍यात तक्रारदारांनी अनेक वेळा रक्‍कम जमा केली व काढून घेतली. तक्रारदारांनी केलेल्‍या सर्व व्‍यवहारांच्‍या नोंदी त्‍यांच्‍या खाते पुस्तिकेत वेळच्‍या वेळी करण्‍यात आलेल्‍या आहेत. तक्रारदारांना जी धनादेश पुस्तिका दिली होती त्‍या धनादेशाव्‍दारे किंवा Withdrawal Slip ने तक्रारदार त्‍यांच्‍या खात्‍यातून पैसे काढत असत. तक्रारदारांची दि.19/10/2007 ची नोटीस मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांनी केलेल्‍या आरोपाबाबत चौकशी केली व त्‍यांच्‍या रेकॉर्डची तपासणी केली. तक्रारदारांची रक्‍कम रु.40,000/-च्‍या Withdrawal Slip वरील सही तक्रारदारांच्‍या नमुन्‍याच्‍या सहीशी मिळतीजुळती आहे. तक्रारदारांनी याबाबतीत केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. दि.02/08/2007 रोजी तक्रारदार सामनेवाला यांच्‍या शाखेच्‍या बचत खात्‍यातून पैसे काढण्‍यासाठी आले होते व सोबत त्‍यांनी त्‍यांची खाते पुस्तिका आणली होती. तक्रारदारांच्‍या विनंतीवरुन सामनेवाला कर्मचा-यांनी तक्रारदारांना Withdrawal Slip दिली व तक्रारदारांनी Withdrawal Slip वरील मजकूर भरुन त्‍या Slip वर सही केली व Slip खातेपुस्तिकेसह कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरकडे दिली. कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरने तक्रारदारांना टोकन क्रं. 55420 दिला. कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरने Withdrawal Slip वरील सहीची खातरजमा करण्‍यासाठी संबंधीत अधिका-यांकडे दिली. वरील प्रमाणे सर्व औपचारिकता पूर्ण केल्‍यानंतर Withdrawal Slip कॅशिअरकडे पाठविण्‍यात आली. कॅशिअरने सदरची रक्‍कम रु.40,000/- तक्रारदारांना दिली.
 
9) सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांच्‍याकडून दमदाटी करुन पैसे उकळण्‍याचा प्रयत्‍न फसल्‍यानंतर तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज या मंचाकडे दाखल केलेला आहे. त्‍यापूर्वी तक्रारदारांनी डोंगरी पोलीस स्‍टेशनला तक्रार केली होती परंतु पोलिसांना तक्रारदारांच्‍या आरोपात तथ्‍य आढळले नाही. तक्रार अर्जात केलेले सर्व आरोप सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेले आहेत व तक्रार अर्ज खर्चासहित रद्द होण्‍यास पात्र आहे असे म्‍हटले आहे.
 
10) मूळ तक्रारदारानी दि. 05/03/2008 रोजी या मंचासमोर अर्ज दाखल करुन सामनेवाला यांच्‍या दि.02/08/2007 च्‍या Withdrawal Slip तक्रारदारांना पाहण्‍यासाठी या मंचासमोर हजर करावी अशी विनंती केली आहे. तसेच, हस्‍ताक्षर तज्ञांची नेमणूक करुन त्‍यावरी सहीची खातरजमा करावी अशी विनंती केली होती. परंतु, तक्रारदारांनी सदरच्‍या अर्जाचा पाठपुरावा न केल्‍यामुळे तक्रारदारांचा सदर अर्ज दफ्तरी दाखल करण्‍यात आल्‍याचे दिसते. तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन सामनेवाला यांनी केलेले आरोप नाकारले. त्‍यानंतर दि.21/02/2010 रोजी मूळ तक्रारदार सय्यद रजद यांचे निधन झाले. त्‍यानंतर तक्रारदारांचे वारस रेकॉर्डवर आणण्‍यात आले. तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. सामनेवाला यांनीही लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदारांच्‍या वतीने अडव्‍होकेट ओ.ए.डिसोजा व सामनेवाला यांच्‍या वतीने अडव्‍होकेट प्रज्ञा लाडे आय/बी एम.व्‍ही.किनी आणि कं. यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला व तक्रार अर्ज निकालावर ठेवण्‍यात आला.
 
11) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-
 
मुद्दा क्रं. 1 – तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करतात काय?
उत्तर– नाही.
 
मुद्दा क्रं.2– तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍याकडून तक्रार अर्जात विनंती केल्‍याप्रमाणेरक्‍कम रु. 40,000/-, त्‍यावर व्‍याज इत्‍यादीची मागणी करता येईल काय?
उत्तर– नाही.
 
कारण मिमांसा :-
 
मुद्दा क्रं. 1 - मयत तक्रारदार सय्यद रजद यांचे सामनेवाला बँकेच्‍या डोंगरी शाखेत बचत खाते क्रं.19396 सन 2001 पासून होते ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या त्‍या खात्‍यावर व्‍यवहार करण्‍यासाठी खाते पुस्तिका दिलेली होती हे तक्रारदारांचे म्‍हणणे सामनेवाला यांना मान्‍य आहे.
 
          तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.29/07/2007 रोजी मुंबईवरुन औरंगाबादला गेले त्‍याआधी त्‍यांच्‍या बँकेच्‍या खात्‍यात रु.67,361/- 40 पैसे जमा होते. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या बँकेच्‍या खात्‍याचा खाते उतारा तक्रार अर्जासोबत दाखल केलेला असून उता-यातील नोंदीवरुन दि.02/08/2007 रोजी तक्रारदारांच्‍या वरील खात्‍यात रक्‍कम रु.67,930/-39 पैसे शिल्‍लक असल्‍याचे दिसते.
 
          तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.13/09/2007 रोजी ते सामनेवाला बँकेत त्‍यांच्‍या खाते पुस्तिकेतील नोंदी अद्यावत करण्‍यासाठी गेले त्‍यावेळी त्‍यांच्‍या खाते पुस्तिकेमध्‍ये सर्व व्‍यवहाराच्‍या नोंदी करण्‍यात आल्‍या. दि.02/08/2007 रोजी त्‍यांच्‍या खात्‍यातून रक्‍कम रु.40,000/- काढल्‍याची नोंद तक्रारदारांच्‍या निदर्शनास आली. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी कोणालाही रु.40,000/-चा धनादेश दिला नव्‍हता किंवा त्‍यांनी स्‍वतः जाऊन सामनेवाला बँकेतील खात्‍यातून रु.40,000/- काढलेले नाहीत. तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, दि.02/08/2007 रोजी सामनेवाला बँकेतील कर्मचा-यांनी संगनमत करुन Withdrawal Slip वर तक्रारदारांची खोटी सही करुन तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढले. वरील रक्‍कम त्‍यांच्‍या खात्‍यातून काढण्‍यास बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. Withdrawal Slip वरील सही तक्रारदारांची आहे का? याची खात्री करण्‍याची जबाबदारी सामनेवाला यांची होती. तसेच, Withdrawal Slip भरुन पैसे काढण्‍यासाठी त्‍या Slip सोबत खाते पुस्तिका सादर करणे आवश्‍यक असते. तक्रारदारांनी त्‍यांची खाते पुस्तिका कोणालाही दिली नव्‍हती. सामनेवाला यांच्‍या हलगर्जीपणामुळे व बेजबाबदारपणमुळे तक्रारदारांच्‍या खात्‍यातील रु.40,000/- तक्रारदारांच्‍या संमतीशिवाय काढण्‍यात आले. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या खात्‍यामध्‍ये रक्‍कम त्‍यांच्‍या वैद्यकीय उपचारासाठी जमा करुन ठेवलेली होती.
 
           वरील प्रमाणे रक्‍कम रु.40,000/- तक्रारदारांच्‍या खात्‍यातून त्‍यांची बनावट सही करुन काढल्‍याची माहिती तक्रारदारांना कळल्‍यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.19/10/2007 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठविली. त्‍या नोटीसीस सामनेवाला यांनी उत्‍तर पाठविले. तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठविलेल्‍या नोटीसीची प्रत व सामनेवाला यांनी त्‍या नोटीसीला दि.16/11/2007 रोजी पाठविलेल्‍या उत्‍तराची प्रत तक्रार अर्जासोबत दाखल केलेली आहे.
 
            तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे कोणी अज्ञात व्‍यक्तिने त्‍यांच्‍या खात्‍यात दि.02/08/2007 रोजी रक्‍कम रु.15,000/- चा धनादेश त्‍यांच्‍या खात्‍यामध्‍ये वटविण्‍यासाठी पाठविलेला परंतु सदरचा धनादेश न वटविता परत केला. त्‍यानंतर पुन्‍हा अज्ञात व्‍यक्तिने दि.06/08/2007 रोजी रु.15,000/- चा धनादेश पाठविला तो‍ही न वटविता सामनेवाला बँकेने परत पाठविला. तक्रारदारांनी सामनेवाला बँके विरुध्‍द डोंगरी पोलीस स्‍टेशनला फिर्याद दाखल केली व त्‍यानंतर सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केला आहे.
 
            सामनेवाला यांच्‍या वकिलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तकारदारांनी तक्रार अर्जात केलेला आरोप की, दि.02/08/2007 रोजी Withdrawal Slip वर त्‍यांची बनावट सही करुन बँकेच्‍या अधिकारी व कर्मचा-यांनी त्‍यांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढून घेतले हा धादांत खोटा आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.02/08/2007 रोजी तक्रारदार स्‍वतः सामनेवाला बँकेत आले होते. तक्रारदारांनी पैशांची तातडीने गरज आहे असे सांगून Withdrawal Slip ची मागणी केली. सामनेवाला यांनी त्‍यांना Withdrawal Slip दिली. तक्रारदारांनी त्‍यांची खाते पुस्तिका आणली होती. तक्रारदारांनी Withdrawal Slip भरुन खाते पुस्तिकेसोबत सदरची Withdrawal Slip कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरकडे दिली. कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरनी तक्रारदारांना टोकन क्रं.55420 दिला व कॉम्‍प्‍युटर ऑपरेटरनी सदरची Withdrawal Slip वरील सहीची खातरजमा करण्‍यासाठी संबंधित अधिका-यांकडे पाठविली. Withdrawal Slip वरील सही तक्रारदारांच्‍या नमुन्‍याच्‍या सहीशी मिळतीजुळती असल्‍याने Withdrawal Slip कॅशिअरकडे पाठविण्‍यात आली व कॅशिअरने सदरची रक्‍कम तक्रारदारांना दिली.
 
           तक्रारदारांचे अडव्‍होकेट डिसोजा यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.02/08/2007 रोजी तक्रारदार स्‍वतः बँकेत गेलेले नव्‍हते. तक्रारदारांनी रु.40,000/- काढण्‍यासाठी Withdrawal Slip भरुन सही करुन दिलेली नव्‍हती तसेच खाते पुस्तिकासुध्‍दा दिलेली नव्‍हती. त‍थापि, बँक कर्मचारी व अधिकारी यांनी संगनमत करुन Withdrawal Slip वर तक्रारदारांची बनावट सही करुन तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- ची रक्‍कम काढली. तक्रारदारांनी दि.13/09/2007 रोजी सामनेवाला बँकेत जावून खाते पुस्तिकेवरील नोंदी पाहिल्‍यानंतर दि.02/08/2007 रोजी त्‍यांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढल्‍याचे नोंद पाहिल्‍यानंतर त्‍यांनी स्‍वतः त्‍यांच्‍या खात्‍यातून दि.02/08/2007 रोजी पैसे काढले नाहीत किंवा त्‍या रकमेचा धनादेश कोणालाही दिली नव्‍हता असे सामनेवाला अधिका-यांना सांगितले. त्‍यावेळी सामनेवाला यांच्‍या अधिका-यांनी दि.02/08/2007 च्‍या संबंधीत Withdrawal Slip वरील सही तक्रारदारांची आहे का? याची खात्री घेणे आवश्‍यक होते. परंतु, सामनेवाला यांनी तशी खात्री करुन घेतली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारांना योग्‍य तो प्रतिसाद दिला नाही म्‍हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द डोंगरी पोलीस स्‍टेशनला FIR दाखल केली. सदर FIR ची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेली आहे. वरील FIR मध्‍ये दि.02/08/2007 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने देना बँक, डोंगरी शाखा येथील तक्रारदारांची Withdrawal Slip वर खोटी सही करुन ती बँकेत सादर करुन त्‍यांच्‍या बचत खात्‍यातून रक्‍कम रु.40,000/- काढून घेतले व त्‍यांची फसवणूक केली असा आरोप केलेला आहे. तक्रारदारांनी पोलिसांकडे दाखल केलेल्‍या FIR मध्‍ये कोणीतरी अज्ञात इसमाने त्‍यांची फसवणूक केली आहे असे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करुन खोटी सही करुन त्‍यांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढले हा आरोप पोलीसांकडे दाखल केलेल्‍या फिर्यादीमध्‍ये नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले आरोप हे तक्रारदारांनी डोंगरी पोलीस स्‍टेशनला केलेल्‍या फिर्यादीतील आरोपाशी विसंगत आहेत. पो‍लीस स्‍टेशनमध्‍ये दाखल केलेल्‍या फिर्यादीमध्‍ये बँक अधिकारी किंवा कर्मचा-यांनी त्‍यांची फसवणूक केली असा आरोप केलेला नाही किंवा बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांनी तक्रारदारांची खोटी सही केली हा ही आरोप केलेला नाही.
 
           तक्रारदारांचा तक्रार अर्ज बारकाईने वाचला असता दि.13/09/2007 रोजी सामनेवाला बँकेतील खाते पुस्तिकेच्‍या नोंदीमध्‍ये दि.02/08/2007 रोजी रक्‍कम रु.40,000/- काढल्‍याचे तक्रारदारांच्‍या प्रथम निदर्शनास आले असे म्‍हटले आहे. तथापि, त्‍यावेळी तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍याकडे दि.02/08/2007 ची भरलेल्‍या Withdrawal Slip वरील सहीची खातरजमा करण्‍यासाठी Withdrawal Slip पाहण्‍यास मागितली असे दिसत नाही. मूळ Withdrawal Slip न पाहता त्‍यावरील सही माझी नाही अशी तक्रारदारांनी तक्रार पोलीस स्‍टेशनला केल्‍याचे दिसते. पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या फिर्यादीबाबत पुढे काय तपास झाला याची काहीही माहिती तक्रारदारांनी या मंचासमोर दाखल केलेली नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि.02/08/2007 ची Withdrawal Slip ची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. त्‍या Withdrawal Slip वरील खातेदाराची सही निदर्शनास आणून ती तक्रारदारांच्‍या नमुन्‍याच्‍या सहीशी मिळतीजुळती असल्‍याचे सामनेवाला वकीलांनी निदर्शनास आणून दिले. Withdrawal Slip वर खातेदाराने खाते पुस्तिकेसहीत Withdrawal Slip बँकेत सादर करावे असे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे. तक्रारदार वकिलांनी Withdrawal Slip भरुन खाते पुस्तिकेसह बँकेत हजर करावे लागते हे मान्‍य केले. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.02/08/2007 रोजी ते स्‍वतः सामनेवाला बँकेत गेले नव्‍हते किंवा त्‍यांनी खाते पुस्तिका इतर कोणालाही दिली नव्‍हती. उलटपक्षी सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदार स्‍वतः सामनेवाला बँकेत दि.02/08/2007 रोजी आले होते व पैशांची निकड असल्‍या कारणानी Withdrawal Slip मागितली व ती Withdrawal Slip खाते पुस्तिकेसहीत हजर केली. तक्रारदारांच्‍या नमुन्‍याच्‍या सहीशी Withdrawal Slip वरील सहीची पडताळणी करुनच कॅशिअरनी रु.40,000/- दिले असे म्‍हटले आहे. त्‍या दिवशी तक्रारदारांना देण्‍यात आलेला टोकन क्रं.55420 होता हे ही सामनेवाला यांनी नमूद केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना बचत खाते उघडण्‍यासाठी सामनेवाला यांना भरुन दिलेल्‍या फॉर्म क्रं. 60 ची छायांकित प्रत या कामी दाखल केलेली आहे. तसेच, सामनेवाला बँक यांनी त्‍यांच्‍या डोंगरी शाखेत काम करणारे त्‍यांचे कर्मचारी माधव काशीनाथ बोढारे यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.
 
               तक्रारदार वकिलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी ज्‍यावेळी सामनेवाला बँकेच्‍या अधिका-यांकडे दि.02/08/2007 रोजी Withdrawal Slip वर त्‍यांची बनावट सही करुन त्‍यांच्‍या खात्‍यातून रु.40,000/- काढण्‍यात आले अशी तक्रार केली. त्‍यावेळी सामनेवाला बँकेनी संबंधित Withdrawal Slip हस्‍ताक्षर तज्ञाकडे पाठविणे आवश्‍यक होती. सामनेवाला यांनी Withdrawal Slip वरची सही तक्रारदारांची आहे का? याची खातरजमा केली नाही ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे. तसेच, सामनेवाला यांनी वरील प्रमाणे आरोप करुनसुध्‍दा Withdrawal Slip वरील सही तक्रारदारांची आहे का याची खात्री करण्‍यासाठी हस्‍ताक्षर तज्ञाचा अभिप्राय घेणे आवश्‍यक असताना तो घेतला नाही ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे. बँक अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करुन तक्रारदारांच्‍या बचत खात्‍यातून रु.40,000/- बेकायदेशीरपणे काढले असा तक्रारदारांच्‍या वकिलांनी आरोप केला.
 
                 वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदार वकिलांनी Withdrawal Slip चा आधार पैसे काढताना त्‍या खात्‍याची खाते पुस्तिका सादर करणे हे बँक नियमांप्रमाणे आवश्‍यक असते हे मान्‍य केले. वादातीत Withdrawal Slip वर तक्रारदारांची सही नाही असे दाखविणारा प्रथमदर्शनी काहीही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांनी दि.13/09/2007 रोजी डोंगरी पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या फिर्यादीतील मजकूराशी तक्रार अर्जातील मजकूर विसंगत आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जामध्‍ये त्‍यांच्‍या बचत खात्‍यावर मोठया रकमेचा व्‍यवहार कधी केला नाही असे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या खात्‍याचा खाते उतारा दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदारांनी अनेक वेळा त्‍यांच्‍या खात्‍यावर मोठया रकमेचा व्‍यवहार केल्‍याचे दिसून येते. तक्रारदारांनी दि.13/09/2007 रोजी डोंगरी पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या अर्जातील मजकूर वकिलांमार्फत दिलेल्‍या नोटीसीतील मजकूराशी विसंगत आहे. वादातील Withdrawal Slip वर तक्रारदारांची सही नाही असा हस्‍ताक्षर तज्ञांचा अभिप्राय या मंचासमोर दाखल केलेला नाही. वास्‍तविक तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले आरोप सिध्‍द करण्‍यासाठी हस्‍ताक्षर तज्ञांचा अभिप्राय दाखल करणे ही तक्रारदारांची जबाबदारी होती. वरील सर्व बाबी विचारात घेता तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले आरोपामध्‍ये काहीच तथ्‍य वाटत नाही. तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द केलेले आरोप सिध्‍द करता आले नाहीत व सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करता आले नाही. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
 
मुद्दा क्रं.2 - या प्रकरणातील उपलब्‍ध पुराव्‍यावरुन तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता सिध्‍द करता आली नाही. तक्रारदारांनी दि.02/08/2007 रोजी सामनेवाला बँकेत स्‍वतः जावून Withdrawal Slip च्‍या आधारे रु.40,000/- त्‍यांच्‍या खात्‍यातून काढल्‍याचे दिसते. सबब तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍याकडून काहीच रक्‍कम वसूल करुन मागता येणार नाही किंवा इतर कोणतीही दाद मागता येणार नाही.
 
              वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव सदरचा तक्रार अर्ज रद्द करण्‍यात येवून खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आ दे श
 
1) तक्रार अर्ज क्रं.15/2008 रद्द करण्या‍त येतो.
 
2) खर्चाबद्दल आदेश नाही.
 
3)सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देणेत यावी.
 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.