Complaint Case No. CC/76/2018 | ( Date of Filing : 21 Feb 2018 ) |
| | 1. MR. PRAKASH RAGHUNATH SHENAI. | B-104, POOJA COMPLEX, SHREE POOJA CHS ,WAGBIL NAKA, OFF GHODBUNDER ROAD, THANE WEST-400615 |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. DELL AUTHORIZED SERVICE CENTRE AND OTHRS. | A/336, 101, 1ST FLR, AISHA MANZIL, SV ROAD, ANDHERI WEST, MUMBAI-400053 | 2. Branch Manager, Reliance Digital Ltd. | Orion Business Park, Shop no. 4, Near Cine Wonder Mall, Kapurbavadi, Ghodbunder Road, Thane (west) 400604 | 3. Ms. Pritika Ojha, Branch Manager, Reliance Digital Ltd. | Orion Building, Shop no. 4, Near Cine Wonder Mall, Kapurbavadi, Ghodbunder Road, Thane (west) 400604. | 4. Mr. Nilesh, Customer Service Manager, | Orion Building, Shop no. 4, Near Cine Wonder Mall, Kapurbavadi, Ghodbunder Road, Thane (west) 400604. | 5. Mr. Mohan, Branch Manager, | C.T.P.I. Multibrand Authorised Service Center, Del Authorised Service Centre, Shop no. 2, Ground floor, Lakshmi Keshav Apartments, Dr. Ramesh Prasad Road, Talao Pali, Thane (west) |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | तक्रारदार स्वतः हजर. आदेश द्वारा. मा अध्यक्ष, श्री. एम. वाय. मानकर 1. तक्रारदार यांना तक्रार दाखल कामी ऐकण्यांत आले. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये दुरुस्ती करणेकामी अर्ज सादर केला. 2. तक्रार व त्यासोबतची कागदपत्रे पाहण्यात आली. तक्रारदार यांनी डेल कंपनीने उत्पादीत केलेले लॅपटॉप विकत घेतला. तक्रारदारांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये सोळा जीबी रॅम बसविण्याबाबत कळविले होते व त्यांची विनंती मान्य करण्यात आली होती. परंतु डिलीव्हरी प्राप्त झाल्यानंतर लॅपटॉप व्यवस्थित काम करीत नसल्याचे आढळून आले. सबब त्याबाबत सामनेवाले यांस सूचीत करण्यात आले. तक्रारदारांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदारांनी तक्रार विविध मागण्यांकरीता मंचात सादर केली. 3. ही तक्रार सामनेवाले क्र. 1 उत्पादन करणा-या कंपनीचे मुंबई येथील प्रतिनिधी, सामनेवाले क्र. 2 उत्पादन करणा-या कंपनीचे एजंट, सामनेवाले क्र. 3 व 4 सामनेवाले 2 चे अधिकारी व सामनेवाले क्र. 5 कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र यांचेविरुध्द दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांनी सामनवेाले क्र. 5 कडून लॅपटॉपची डिलीवरी घेतली व काही रक्कम त्यांना अदा केली. सामनेवाले क्र. 2 ते 5 हे या मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. तक्रारीच्या बाबी विचारात घेता, तक्रारीचे मुख्य कारण हे ठाणे येथे उद्भवले आहे. तसेच तक्रारदार हेदखील ठाण्याचे रहिीवासी आहेत. केवळ सामनेवाले क्र. 1 उत्पादन करणा-या कंपनीचे प्रतिनिधी असल्याने व काही रक्कम त्यांना अदा केल्याने ही तक्रार या मंचात चालविणे योग्य होणार नाही. आमच्या मते तक्रारीचे कारण स्पष्टपणे ठाणे येथे उद्भवल्याने तेथील मंचात तक्रार दाखल करणे सर्व दृष्टीने योग्य होईल. सामनेवाले क्र. 1 चे आधारावर तक्रार स्विकारल्यास ती एकाप्रकारे आमच्या मते, “Bench Hunting” केल्यासारखे होईल. सबब खालील आदेश, आदेश 1. तक्रार क्र. 76/2018 स्पष्ट क्षेत्रीय अधिकाराअभावी तक्रारदारांना परत करण्यात येते. 2. तक्रारदारांना लिमिटेशनच्या तरतूदीच्या अधीन राहून योग्य त्या मंचात तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येते. 3. खर्चाबाबत आदेश नाहीत. 4. या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात. 5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे. | |