Maharashtra

Kolhapur

CC/10/162

Babaso Bhupal Demanna - Complainant(s)

Versus

Datta Nagari Sah. Pat Sanstha Ltd. - Opp.Party(s)

Adv K P Mungale

31 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/162
1. Babaso Bhupal DemannaMangaon Tal. Hatkanangale Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Datta Nagari Sah. Pat Sanstha Ltd. Mangaon Tal. Hatkanangale Dist. Kolhapur 2. Shri Nabhiraj Bhauso Vanwade, Chairman.3. Shri Bhauso Kallappa Magdum, Vice Chairman.4. Shri Yuvraj Nanaso Jagdale, Secretary.5. Shri Sharad Narasgonda Patil, Director.6. Shri Moula Nasaruddin Jamadar, Director.7. Shri Shivaji Dattu Jog, Director.8. Shri Virupaksh Babaji Sutar, Director.9. Shri Tukaram Kallu Khot, Director.10. Prakash Vasant Koli, Director.11. Shri Gunda Kerba Jog, Director.12. Shri Sanjay Sabaji Jog, Director.13. Shri Shamrao Dhondiba Kambale, Director.14. Shri Mukund Bandu Sagare, Director.15. Sou Alka Babaso Patil, DirectorOpponent No.2 to 15 all r/o Mangaon, Tal Hatkangale, Dist Kolhapur16. .. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv K P Mungale, Advocate for Complainant

Dated : 31 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.31.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला अनुपस्थित आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील सामनेवाला क्र.1 ही सहकार कायद्यातील तरतुदीनुसार नोंदण्‍यात आलेली सहकारी पतसंस्‍था आहे. सामनेवाला क्र.2, 3 व 5 ते 15 हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक आहे. सामनेवाला क्र.4 हे सामनेवाला संस्‍थेचे मॅनेजर आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे श्री दत्‍त सुवर्ण मुदतबंद ठेवीच्‍या स्‍वरुपात र रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
213
25000/-
24.12.2002
23.06.2008
2.
214
25000/-
24.12.2002
23.06.2008

 
 
 
 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍याने दि.23.06.2008 अखेर दोन्‍ही पावत्‍यांवर प्रत्‍येकी रुपये 50,000/- प्रमाणे रक्‍कम रुपये 1,00,000/- इतकी रक्‍कम यातील सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे आवश्‍यक होते. तक्रारदारांना सदर रक्‍कमांची औषधोपचारासाठीच्‍या व इतर दैनंदिन गरजा भागविण्‍यासाठी आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.05.01.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 15 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 3 व 5 ते 12 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 हे सामनेवाला संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(6)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावती क्र.213 व 214 या श्री दत्‍त सुवर्ण ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या शपथेवरील तक्रारीत सदर पावत्‍यांची मुदतपूर्ण रक्‍कम प्रत्‍येकी रुपय 50,000/- अशी एकूण रुपये 1,00,000/- सामनेवाला यांचेकडून दि.24.06.2008 रोजीपासून व्‍याजासह मागणी केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे सदर पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 3 व 5 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदतपूर्ण रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.24.06.2008 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
अ.क्र.
ठेव पावती क्र.
देय रक्‍कम 
1.
213
50000/-
2.
214
50000/-
 
 
 
 (3)   सामनेवाला क्र.1 ते 3 व 5 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER