आदेश (पारीत दिनांक : 09.05.2011) श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. तक्रारकर्त्याने वि.प.पतसंस्थेत मुदती ठेवीत खालील प्रमाणे रक्कम ठेवली होती. D:\JUDGE CO-OP.SOCIETIES\CC 2 of 2011.doc पावती क्रमांक | मुदतठेव दिनांक | रक्कम | कालावधी | व्याजदर | 000350 | 05/05/2010 | 6,00,161/- | 1 वर्ष | 10 टक्के | 000395 | 31/03/2010 | 6,66,980/- | 1 वर्ष | 10.5 टक्के | 000328 | 06/04/2010 | 2,88,000/- | 1 वर्ष | 10.5 टक्के |
2. तक्रारकर्त्याला महत्वाचे कामा निमित्य म्हणजे भूखंड खरेदी करण्या करीता रकमेची आवश्यकता होती म्हणून त्यांनी वि.प.पतसंस्थेकडे मुदतपूर्व जमा ठेवीचे रकमेची मागणी केली परंतु त्यास ती रक्कम वेळीच दिल्या गेली नाही, त्यामुळे भूखंड खरेदी करता आला नाही. त्यामुळे त्यास शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झालेले आहे. 3. तक्रारकर्त्याने वि.प.कडे दिनांक 14/05/2010 रोजी लेखी अर्ज देऊन मुदतपूर्व रकमेची मागणी केली होती परंतु त्याला रक्कम देण्यात आली नाही. वि.प.ने रक्कम न देण्याचे कोणतेही कारण दिले नाही. 4. त.क.ने या संबधी सहायक निबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचेकडे तक्रार केली असता, तीन पैकी, एका मुदत ठेवीची रक्कम रुपये-6.00 लक्ष दिली परंतु उर्वरीत रक्कम दिली नाही. त्यानंतर पुन्हा या संबधी सहायक निबंधकांकडे तक्रार करावी लागली आणि तदनंतर दिनांक 21/06/2010 रोजी तक्रारकर्त्यास उवरीत रक्कम परत करण्यात आली. परंतु वेळीच रक्कम देण्यात आली नाही. तसेच फक्त मुदतठेवीची रक्कम दिली असून व्याज दिले नाही. 5. तक्रारकर्ता वि.प.चा ग्राहक असून, वि.प.ने, त.क.यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. वि.प.चे दोषपूर्ण सेवेमुळे त.क.यास शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला. त.क.ने, वि.प.यांना नोटीस पाठविली असता, त्यास वि.प.ने चुकीचे उत्तर दिले. वि.प.ने मुदत ठेवी व त्यावरील व्याज देण्यास विलंब केल्याने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. 6. म्हणून शेवटी त.क.यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन, तीद्वारे, झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल नुकसान भरपाई रुपये-3.00 लक्ष वि.प.कडून मिळावे आणि ठेवी वर जमा तारखे पासून ते ठेवीची रक्कम परत करे पर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे व इतर अनुतोष मिळावा अशी प्रार्थना केली आहे. D:\JUDGE CO-OP.SOCIETIES\CC 2 of 2011.doc 7. मंचाचे मार्फतीने वि.प.वर नोटीस तामील झाली असता त्यांनी आपले म्हणणे सादर केले व त्यांचे विरुध्दचे सर्व आक्षेप फेटाळलेत. दिनांक 14/05/2010 चे तक्रारपत्रात खोडतोड आहे, त्यांचे संस्थेत व्यवस्थापकाचे पद अस्तित्वातच नाही. वि.प.संस्थेला कोंडीत पकडून लुबाडण्याचे उद्येश्याने प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. प्रस्तुत तक्रार कायदेशीररित्या मंचा समक्ष चालू शकत नाही, ती फेटाळण्यात यावी. तक्रारकर्त्यास, तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारीस आवश्यक मुद्रांक शुल्क लावलेले नाही. तक्रारकर्त्याने 12 पावत्याची रक्कम जवळजवळ रुपये-9.00 लक्ष दिनांक 05 मे,2010 ते 15 मे,2010 या दरम्यान काढलेली असून, ती त्यास देण्यात आलेली आहे. त.क.ने मुदतपूर्व रक्कम मिळावी म्हणून कधीही कोणताही अर्ज वि.प.कडे केलेला नाही. म्हणून प्रस्तुत तक्रार खर्चासह खारीज करावी अशी प्रार्थना वि.प.ने केलेली आहे. 8. त.क.ने तक्रारी सोबत 11 दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मुदत ठेवीच्या 03 पावत्या, वि.प.ला दिलेले पत्र, सहायक निबंधकांना दिलेले पत्र व त्याचे उत्तर, नोटीस व त्याचे उत्तर असे दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 9. वि.प.ने लेखी जबाबा सोबत तक्रारकर्त्याने मुदतठेवी संबधी वि.प.कडे दिनांक 11/05/2010 रोजी केलेल्या पत्राची झेरॉक्सप्रत व सोबत मुदतठेवीच्या झेरॉक्सप्रती दाखल केल्यात. 10. उभय पक्षांचे शपथेवरील लेखी कथन, दाखल कागदपत्र, पुरावे इत्यादीचे अवलोकन केले असता, मंचाद्वारे निर्णयान्वीत करण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली काय ? होय. (2) कायआदेश? अंतीम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 व 2 : 11. त.क.ला मुदती ठेवी अंतर्गत जमा रक्कम मिळालेली आहे. आता वाद हा फक्त त.क.ला रक्कम उशिरा मिळाल्या बद्यलचा असून त्यामुळे त.क.चे व्याजाचे नुकसान झालेले आहे आणि या सर्व प्रकारामुळे त.क.ला मानसिक व शारिरीक त्रास झालेला असून त्या बद्यल त.क.ने नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्याचे वतीने अधिवक्ता श्री टावरी यांनी युक्तीवाद केला की, जमा मुदत ठेवीची रक्कम वेळीच परत करण्याची D:\JUDGE CO-OP.SOCIETIES\CC 2 of 2011.doc जबाबदारी वि.प.ची आहे. त.क.ने दिनांक-14/05/2010 रोजी वि.प.चे कार्यालयात अर्ज दिला आणि वि.प.चे कर्मचारी/मॅनेजर माथनकर यांना सदर अर्जाची प्रत दिलेली आहे. तरी देखील मुदतठेवीची रक्कम वेळेत मिळालेली नाही आणि तिचा उपयोग घेता आला नाही. तक्रारकर्त्याला या बद्यल सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दिनांक-28/05/2010 व दिनांक-15/06/2010 रोजी लेखी तक्रारी कराव्या लागल्या नंतरच वि.प.ने रक्कम दिलेली आहे. वेळीच रक्कम न मिळाल्यामुळे त.क.चे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि म्हणून मागणी नुसार त.क.चा क्लेम मंजूर करावा. 12. वि.प.चे वतीने अधिवक्ता श्री साळवे यांनी युक्तीवाद केला की, मागणी केल्या बरोबर त.क.चे पत्नीला, वि.प.पत संस्थेनी बरीच मोठी रक्कम परत केलेली आहे आणि ती सुध्दा मुदतपूर्व परत केलेली आहे. वि.प.संस्था ही एक कर्मचा-यांची पतसंस्था आहे आणि सदर कर्मचा-यांचे पैसे संस्थेत जमा असतात व त्यातूनच वि.प.संस्था कर्ज वितरीत करते आणि अशा स्थितीत वि.प.संस्थेकडे रक्कम जमा नसते, तरी देखील मागणी नुसार ताबडतोब रक्कम देण्यात आलेली आहे. असे असताना देखील त.क. फक्त द्वेषापोटी व वि.प.संस्थेस त्रास देण्याचे हेतुने प्रस्तुत तक्रारीचा पाठपुरावा करीत आहे. वि.प.यांनी त्याचे लेखी जबाबातील परिच्छेद क्रं-13 मध्ये नमुद केल्या नुसार त.क.यांना जवळ जवळ 12 मुदतठेवीच्या पावत्यांची रक्कम मे-2010 मध्येच दिलेली आहे.अशा स्थितीत त.क.यांनी वि.प.पतसंस्थे विरुध्द प्रस्तुत चुकीची तक्रार दाखल केलेली आहे. वि.प पतसंस्थे तर्फे पुढे असा युक्तीवाद करण्यात आला की, माथनकर नावाचे मॅनेजर त्यांचेकडे नाहीत आणि दिनांक-14/05/2010 रोजीचे पत्र त्यांना मिळालेले नाही आणि सदर पोचवर वि.प.संस्थेचा शिक्का नाही. 13. यावर तक्रारकर्त्या तर्फे युक्तीवाद करण्यात आला की, मंचा मार्फत वि.प.नां रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीस संबधाने रजिस्टर पोस्टाच्या पोच अनुक्रमे पान क्रं-28 व 29 वर उपलब्ध असून त्यावर पोच म्हणून सदर कर्मचारी माथनकर यांची सही आहे आणि माथनकर हे वि.प.संस्थेत कार्यरत आहे आणि मॅनेजरचे वतीने वकीलपत्र दाखल केलेले आहे, सही मध्ये फरक जरी असला , तरी त्याच व्यक्तीला पत्र दिल्या गेलेले आहे आणि अशी स्थिती असताना उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे त.क. यांनी, वि.प.पतसंस्थेचे कार्यालयात दिलेले दिनांक-14/05/2010 रोजीचे पत्र वि.प.यांना मिळालेच नाही हा वि.प.चा युक्तीवाद योग्य नाही. 14. मंचाने दाखल दस्तऐवज पान क्रं-15 व 29 चे सुक्ष्म अवलोकन केले असता, पान क्रं-15 वर त.क.ने, वि.प.पतसंस्थेकडे मुदतठेवीचे रकमेची मागणी करणारे पत्र व त्यावर पोच D:\JUDGE CO-OP.SOCIETIES\CC 2 of 2011.doc म्हणून संस्थेचा शिक्का आहे आणि पान क्रं-28 व 29 वरील रजिस्टर पोस्टाचे पोच वर माथनकर यांची सही आहे. म्हणजेच नोटीस मिळाल्याचे तारखेला माथनकर वि.प.संस्थेत कार्यरत होते, ते काय पदावर होते? या वादात न जाता, वि.प.संस्थेला, त.क.चे सदर पत्र दिनांक-14/05/2010 ला न मिळाल्या बद्यल स्वतंत्र प्रतिज्ञालेखाद्वारे मंचा समक्ष सिध्द करता आले असते परंतु वि.प. पतसंस्थेने असे काहीही केलेले नाही. पान क्रं-16 वरील त.क.यांनी, वि.प.पतसंस्थेस दिलेल्या दिनांक-28/05/2010 चे पत्रात सुध्दा माथनकर यांचा उल्लेख आहे. तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी, वि.प.पतसंस्थेस दिलेल्या दिनांक-03/06/2010 चे पत्रात सुध्दा माथनकर यांचे नावाचा उल्लेख आहे परंतु वि.प. पतसंस्थे तर्फे या दोन्ही पत्रांचे उत्तर दिल्याचे कुठेही नमुद नाही किंवा तसे दस्तऐवज दाखल केलेले नाहीत आणि म्हणून मंचाचे असे मत आहे की, वि.प.संस्थेकडे दिनांक-14/05/2010 रोजीचे पत्राद्वारे, त.क.ने मुदतठेवी अंतर्गत रकमेची मागणी केली होती आणि ती रक्कम तक्रारकर्त्याला विलंबाने मिळालेली आहे. 15. परंतु मुदतपूर्व (परिपक्ता तिथीचे आधी) मागणी असल्याने आणि कालावधी खूप कमी असल्याने प्रचलीत व्याज आकारणे हा वि.प.पतसंस्थेचा अधिकार आहे. उभय पक्षाने मंचा समक्ष ही बाब स्पष्ट केलेली नाही की, त.क.ला सदर मुदत ठेवी अंतर्गत किती रक्कम व त्यावर किती व्याज दिल्या गेलेले आहे आणि म्हणून त.क.ची सदर मुदतठेवी वरील परिपक्वता तिथी नंतरचे देय पूर्ण व्याजाची मागणी मंच नामंजूर करीत आहे. तसेच वि.प. पतसंस्थेने विलंबाने त.क.ला रक्कम दिल्यामुळे, तक्रारकर्त्याने नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. मंचाचे मते वि.प.पतसंस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे की, त्यांनी वेळीच तक्रारकर्त्याची रक्कम परत करणे, परंतु वि.प.पतसंस्थेस जाणीव असताना देखील त.क.ची मुदतठेवीची रक्कम वेळीच दिल्या गेलेली नाही आणि अशा स्थितीत तक्रारकर्त्याला वेळीच रक्कम न मिळाल्यामुळे त्यास उपभोग घेता आलेला नाही. 16. तक्रारकर्त्याने नमुद केले की, त्याला वि.प.पतसंस्थे कडून वेळीच मुदत ठेवीची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे भूखंड खरेदी करता आला नाही आणि त्या करीता सर्वस्वी वि.प.जबाबदार आहेत. परंतु त.क.ने मिळकत/भूखंड इत्यादीचे वर्णन किंवा प्लॉटचे व्यवहारा संबधाने कथीत दलालाचा प्रतिज्ञालेख प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेला नाही म्हणून मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम पूर्णपणे मान्य करता येत नाही. परंतु हे सुध्दा तेवढेच खरे आहे की, D:\JUDGE CO-OP.SOCIETIES\CC 2 of 2011.doc तक्रारकर्त्याला त्याची मुदतठेवीची रक्कम मिळण्या करीता सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे दोनदा तक्रार करावी लागली आणि त्यानंतर त्याला वि.प.पतसंस्थे कडून विलंबाने रककम दिल्या गेलेली आहे, ही बाब मंचा समक्ष सिध्द झालेली आहे आणि म्हणून वि.प.पतसंस्थेनी, त.क.ला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे आणि म्हणून तक्रारकर्ता वि.प.पतसंस्थे कडून रास्त नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च सुध्दा मिळण्यास पात्र आहे. 16. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात ,न्यायमंच, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1½ तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2) वि.प.पतसंस्थेनी, त.क.ची मुदतठेव रक्कम मागणी करुन देखील त.क.ला वेळीच न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. 3) वि.प.पतसंस्थे तर्फे संबधितांनी सदर आदेश प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत त.क.ला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल व आर्थिक नुकसानी बद्यल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) त.क.ला देय करावे. 4) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क देण्यांत यावी. 5) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ.सोमाणी) (सौ.सुषमा प्र. जोशी) अध्यक्ष सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वर्धा
| HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi, Member | HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani, PRESIDENT | , | |