मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
तक्रार अर्ज क्र.65/2011 नि.1 खालील आदेश शरणाप्पा अडीआप्पा शिवानगी .......तक्रारदार विरूध्द दत्त ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्या.,अतिथ व इ. .......जाबदार 1. विरुध्द पक्षकार यांनी दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व या बँकेच्या चेअरमन व संचालक मंडळांनी तक्रारदारांच्या ठेवपावतीवरील रक्कम अदा न केल्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. मंचाने तक्रारदाराची तकार दाखल करुन घेवून विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 6 यांना नोटीस बजावणी करण्याचे आदेश पारीत केले त्यानुसार विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 6 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली असून दि.01/06/2011 रोजी नोटीस बजावणीचा अहवाल येण्यासाठी प्रकरण ठेवण्यात आले. परंतु सदर प्रकरणात नोटीस बजावणी झाल्याचा कोणताही अहवाल दाखल झाला नाही किंवा पाठविलेल्या नोटीसचे लखोटे मंचाला परत आले नाहीत. त्यामुळे प्रकरण तक्रारदारांनी स्टेप्स घेण्यासाठी व पूर्तता करणेसाठी ठेवले आहे.
3. तक्रारदार किंवा त्यांचे वकील मंचासमोर दि. 01/06/2011 पासून हजर नाहीत व त्ंयानी विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 6 यांना नोटीस काढण्यासंबंधाने तजवीज केली नाही. आज देखील सायकाळी 4 वाजेपर्यंत तक्रारदार किंवा त्यांचे वकील मंचासमोर हजर नाहीत त्यामुळे तक्रारदारास ही तक्रार चालवावयाची नाही असे दिसून येत असून त्यादृष्टीकोनातून मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार व त्यांचे वकील सतत गैरहजर असल्यामुळे व त्यांनी स्टेप्स न घेतल्यामुळे सदरचे तक्रार प्रकरण (Dismiss for Default) करण्यात येते. 2. तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
3 खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत. सातारा दि. 16/09/2011 (श्री.महेंद्र एम. गोस्वामी) (श्रीमती सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |