नि.22 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 160/2010 नोंदणी तारीख – 06/07/2010 निकाल तारीख – 21/10/2010 निकाल कालावधी – 105 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री सावळाराम सखाराम मोरे रा.अतीत, ता.जि.सातारा 2. श्रीमती छाया शंकर यादव रा.गोवे (लिंब), ता.जि.सातारा 3. सौ मनिषा दिपक कदम रा.सोनगाव (माहुली), ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री जे.पी.शिंदे) विरुध्द 1. दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अतीत मुख्य कार्यालय मु.पो.अतीत ता.जि.सातारा तर्फे चेअरमन लक्ष्मण मारुती जाधव, रा.अतीत ता.जि.सातारा 2. दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. करिता व्हाईस चेअरमन बाजीराव कृष्णा यादव 3. दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. करिता संचालक अमृत जयसिंगराव जाधव 4. दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. करिता संचालक जयहिंद गणपती जाधव वरील सर्व रा.अतीत ता.जि.सातारा 5. दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. अतीत मुख्य कार्यालय अतीत ता.जि.सातारा करिता प्रशासक महेंद्र शिवाजीराव साळुंखे द्वारा सहायक निबंधक सह.संस्था सातारा सहकार भवन, अजिंक्य कॉलनी, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी नि.21 कडे लेखी म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार सदरचे पतसंस्थेवर अन्य 10 ते 12 संचालक असताना केवळ दोनच संचालकांना याकामी सामील केले आहे. ठेवीदाराच्या व्यवहाराचे दायित्व संपूर्ण संचालक मंडळावर येते परंतु याकामी इतर संचालकांना सामील केले नाही. अर्जदारचे ठेवपावत्यांवर जाबदार यांची कोठेही सही नाही. अर्जदार यांनी शाखाधिकारी यांना पक्षकार केलेले नाही. संस्थेचे व्यवस्थापक श्री धनाजी रामचंद्र गुरव यांनी गैरव्यवहार केला असून तो फरार आहे. त्यांचेवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेला असून त्याचा तपास चालू आहे. संस्थेचा संपूर्ण कारभार हा प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जाबदार यांना याकामी हस्तक्षेप करता येत नाही. 3. जाबदार क्र.5 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा प्रस्तुतकामी दाखल आहे. जाबदार क्र. 5 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी नि.21 कडे कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे व अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. निर्विवादीतपणे अर्जदार यांनी कोणाला व कितीजणांना जाबदार म्हणून पक्षकार करायचे हा अर्जदारचा अधिकार आहे. सबब सर्व संचालक जाबदार नाहीत म्हणून तक्रार चालणेस पात्र नाही या जाबदारचे कथनात तथ्य नाही. ठेवपावतींवरती कॅशियर व मॅनेजर यांचीच सही आहे, सबब सदर संचालकांची सही नसलेने ते जबाबदार नाहीत याही जाबदारचे कथनात तथ्य नाही कारण पावतीवर नियमानुसार कॅशियर व मॅनेजरचे सहीची आवश्यकता असते. व्यवस्थापक गुरव यांने संचालकांना अंधारात ठेवून रु.1 कोटीचा गैरव्यवहार केला सबब तो आवश्यक पक्षकार आहे. याही संचालकांचे म्हणण्यात तथ्य नाही. संस्थेचा अंतर्गत व्यवहार काय झाला याचेशी अर्जदारचा संबंध नाही. तसेच प्रशासक नेमलेसंबंधी जाबदारने कोणताही पुरावा दाखल केला नाही. सबब जाबदारचे कोणत्याही म्हणण्यामध्ये तथ्य दिसून येत नाही. 5. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.7 सोबत ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि.7 सोबतच्या ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. जाबदार क्र. 5 हे प्रशासक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र.5 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र.1 ते 4 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 5 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 5 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.6186, 6288, 4773, 5602, 5601, 4759, 3523 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 21/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |