जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ७३/२०१३
तक्रार प्राप्त दिनांक – ०९/०७/२०१३
तक्रार निकाली दिनांक – ३०/०८/२०१३
(१)खेमराज नवल महाले,उ.व.३३, धंदा-शेती. ----- तक्रारदार.
(२)नवल कन्हैयालाल पाटील (महाले),उ.व.५५,धंदा-शेती.
(३)जिभाअ कडू पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(४)बिभीषण कडू पाटील, उ.व.६०, धंदा-शेती.
(५)दिगंबर कडू पाटील, उ.व.६५, धंदा-शेती.
(६)निंबा भिका अहिरे, उ.व.३५, धंदा-शेती.
(७)दाजभाअ श्रावण पाटील, उ.व.३०, धंदा-शेती.
(८)घामरा चिंधा पाटील, उ.व.६०, धंदा-शेती.
(९)भास्कर रघुनाथ पाटील, उ.व.३५, धंदा-शेती.
(१०)गुलाब तुळशीराम पाटील, उ.व.३२, धंदा-शेती.
(११)कौतीक विठ्ठल पाटील, उ.व.६५, धंदा-शेती.
(१२)राजेंद्र मोतीराम पाटील, उ.व.४०, धंदा-शेती.
(१३)विक्रम सखाराम शेलार, उ.व.७०, धंदा-शेती.
(१४)जगन्नाथ रघुनारथ पाटील, उ.व.४५, धंदा-शेती.
(१५)रतन रावजी बोरसे, उ.व.६०, धंदा-शेती.
(१६)संजय मोतीराम पाटील, उ.व.३५, धंदा-शेती.
(१७)पांडुरंग देवचंद पाटील, उ.व.५५, धंदा-शेती.
(१८)काशीराम तुकाराम पाटील, उ.व.७५, धंदा-शेती.
(१९)पुंडलिक चैत्राम पाटील, उ.व.६८, धंदा-शेती.
(२०)सिध्दीनाथ बळीराम बोरसे, उ.व.५०, धंदा-शेती.
(२१)सोमनाथ नारायण पाटील, उ.व.३५, धंदा-शेती.
(२२)बन्सीलाल दसोद पाटील, उ.व.६६, धंदा-शेती.
(२३)गोपीचंद विठ्ठल पाटील, उ.व.४०, धंदा-शेती.
(२४)लालचंद राजाराम पाटील, उ.व.३८, धंदा-शेती.
(२५)गोरख खंडु पाटील, उ.व. , धंदा-शेती.
(२६)मच्छींद्र रघुनाथ पाटील, उ.व.३६, धंदा-शेती.
(२७)पुंजाराम चैत्राम पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(२८)प्रकाश अंकुश पाटील, उ.व.३६, धंदा-शेती.
(२९)राजेंद्र विठ्ठल पाटील, उ.व.३२, धंदा-शेती.
(३०)रतन उत्तम पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(३१)सदाशिव देवचंद पाटील, उ.व.५५, धंदा-शेती.
(३२)रुपचंद गेंदा पाटील, उ.व.३८, धंदा-शेती.
(३३)राजेंद्र चैत्राम पाटील, उ.व.५५, धंदा-शेती.
(३४)बापुजी शामभाअ पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(३५)काशीनाथ दशरथ (चैत्राम) पाटील, उ.व.६०, धंदा-शेती.
(३६)नाना (वसंत) यशवंत पाटील (बागुल), उ.व.४०, धंदा-शेती.
(३७)पांडुरंग तानका पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(३८)पाचा भगवान पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(३९)बन्सीलाल यशवंत पाटील, उ.व.५५, धंदा-शेती.
(४०)निंबा नारायण पाटील, उ.व.७०, धंदा-शेती.
(४१)रोहिदास सशाशिव पाटील, उ.व.३५, धंदा-शेती.
(४२)विजय चैत्राम पाटील, उ.व.४०, धंदा-शेती.
(४३)दौलत भटू निकम, उ.व.४०, धंदा-शेती.
(४४)पांडुरंग गोकूळ पाटील, उ.व.४५, धंदा-शेती.
(४५)दादा रघुनाथ पाटील, उ.व.४५, धंदा-शेती.
(४६)शांतीलाल गरबड पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
(४७)नानाभाअ गोकुळ पाटील, उ.व.५०, धंदा-शेती.
सर्व रा.शिरधाने परगणे नेर,ता व जि.धुळे.
विरुध्द
(१)दाजभाअ निंबा भदाणे ----- सामनेवाले.
उ.व.३५, धंदा-व्यापार.
रा.शिरधाने परगणे नेर,ता व जि.धुळे.
(२)अजय गोविंदराव माळी
उ.व. , धंदा-व्यापार.
रा.अकलाड मोराणे,ता व जि.धुळे.
(३)आमोदे परिसर तेलबिया अत्पादक संस्था लिमिटेड,
आमोदे,बाबूराव वैद्य मार्केट,
शिरपूर-४२५४०५, जि.धुळे.
(४)मोनसॅंटो होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड,
आहुरा सेंटर,५ वा मजला,९६ महाकाली रोड,
अंधेरी पूर्व,मुंबई ४०००९३
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.जी.व्ही.गुजराथी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार क्र.१ ते ४७ यांनी सामनेवाले क्र.१ ते ४ यांचे विरुध्द, स्टेपलॉन बीजी-२ या कापसाच्या बियाण्याची पेरणी केली परंतु त्यापासून उत्पन्न न आल्यामुळे रु.१९,०३,५००/- नुकसान भरपाई मिळण्याकामी, सदरची तक्रार दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्र नि.न.१ ते ८ यांचा विचार करुन, सदर तक्रार अर्ज हा दाखल करुन घेण्याचे टप्प्यावर असतांना, “सदर तक्रार अर्ज दाखल करुन घेण्यास पात्र आहे काय” ? या मंचामार्फत काढण्यात आलेल्या प्राथमिक मुद्यावर युक्तिवादाकामी ठेवण्यात आला आहे.
(३) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार क्र.१ ते ४७ यांनी सामनेवाले क्र.४ मोनसॅंटो होल्डिंग प्रा.लि. या कंपनीने उत्पादीत केलेले बियाणे सामनेवाले क्र.३ आमोदे परिसर तेलबिया उत्पादक सहकारी संस्था, लि.धुळे या वितरका मार्फत, सामनेवाले क्र.१ व २ यांनी अनुक्रमे नांमे दाजभाअ निंबा भदाणे व अजय गोविंदराव माळी हे प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी, शिरपूर यांचे सभासद असल्याने, त्यांना सामनेवाले क्र.३ कडून बियाणे लवकर व सवलतीच्या दरात मिळू शकत असल्याने त्यांच्या नांवावर दि.२३-०६-२००९ व दि.२४-०६-२००९ रोजी एकूण १४१ पाकीटे खरेदी केली. परिशिष्ठात नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे तक्रारदार क्र.१ ते ४७ यांना बियाणे सामनेवाले क्र. १ व २ यांनी दिले. त्यातून सामनेवाले क्र.१ व २ यांना मिळणारे कमिशन हे त्यांनी घ्यावयाचे ठरले होते.
(४) तक्रारदारांनी त्यांच्या शेतात सदर बियाणे पेरले. बियाणे उगवले परंतु त्यांना फळ आले नाही. या बाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे तक्रारी केल्या. सामनेवाले क्र.४ यांच्या संबंधीत अधिका-यांनी पाहणी केली व त्यांनी नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले. त्यावेळी सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी तक्रारदारांना सांगितले की, बियाणे खरेदीची बिले ही सामनेवाले क्र.१ व २ यांच्या नांवे असल्यामुळे नुकसान भरपाई ही सामनेवाले क्र.१ व २ यांच्या नांवे करावी लागेल व त्या प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम रु.१९,०३,५००/- सामनेवाले क्र.१ व २ यांना धनादेशाने अदा केले. सदर नुकसान भरपाई ही वैयक्तिक रित्या तक्रारदार क्र.१ ते ४७ यांना मिळणे आवश्यक होते. परंतु ती मिळालेली नाही. शेतकरी अधिका-यांनी तसेच सामनेवाले क्र.४ कंपनीने सुध्दा केलेले पंचनामे तक्रारदारांच्याच मालकीच्या आणि प्रत्यक्ष कबजे उपभोगातील शेतांचेचे होते व आहेत असे केले आहेत. सर्व तक्रारदार हे या वादातील कायदेशीर हक्क, हितसंबंध समान किंबहुना एकच असल्यामुळे या कायद्याचे कलम १२ (१)(सी) प्रमाणे अर्ज केलेला असून, नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
(५) सदर प्रकरण हे दाखल करुन घेण्याच्या टप्प्यावर असतांना, “प्रकरण मंचात दाखल करुन घेण्यास पात्र आहे काय” तसेच सदर तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेप्रमाणे “ग्राहक” आहेत काय ? या प्राथमीक मुद्यावर तक्रारदारांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकला.
सदर अर्जामध्ये तक्रारदारांनी पान क्र.३० व ३१ वर सामनेवाले यांच्याकडून बियाणे खरेदी केल्याच्या पावत्या दाखल केलेल्या आहे. सदर पावत्या पाहता त्यावर, सामनेवाले क्र.१ व २ अनुक्रमे दाजभाअ निंबा पाटील व अजय गोविंदराव माळी असे नावं नमूद असून त्यावर बिल नंबर १२३३ व १३४५ रु.४८,१००/- व रु.५१,७५०/- एकूण रकमेस स्टेपलॉन बीजी-२ हे बियाणे खरेदी केल्याचे नमूद असून त्या सदर पावत्या सामनेवाले क्र.३ यांनी दिल्याचे दिसत आहे. या पावतीवरुन असे दिसून येते की, सदर बियाणे हे सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ यांचेकडून खरेदी केलेली आहे. तक्रारदार यांनी सदरचे बियाणे हे सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेले नाही. तक्रारदारांच्या पावत्यांवर नांवे नाहीत.
तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तिवाद केला की, सामनेवाले क्र.४ यांच्या प्रतिनिधींनी, सदर “शिरधाने प्र.नेर स्टेपलॉन कापूस नुकसान भरपाई बाबत चौकशी अहवाल” तयार केला आहे तो पान नं.६९ वर दाखल आहे. या अहवालामध्ये शेतक-यांचे जबाब घेऊन त्या बाबत नोंद केली आहे. त्यात एकूण ४६ शेतक-यांनी एकत्र येऊन एकूण १४१ पाकीटे खरेदी करण्याकामी पैसे सामनेवाले क्र.१ व २ अनुक्रमे दाजभाअ निंबा भदाणे व अजय गोविंदराव माळी यांचेकडे दिले आहेत, याचा आधार घेऊन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होत आहेत. परंतु दाजभाअ निंबा भदाणे व अजय गोविंदराव माळी हे सूतगिरणी व आमोदे परिसर तेलबिया उत्पादक सह.संस्था लि.आमोदे चे सभासद असल्याने उत्पादीत कापसाची विक्री त्यांच्या नांवावर करता येत असल्याने व कापूस बियाणे फक्त त्यांना मिळत असल्याने, सामनेवाले क्र.१ व २ यांनी सामनेवाले क्र.३ कडून बियाणे खरेदी केले आहे व तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांचेकडून बियाणे खरेदी केले आहे.
तसेच सदर पावत्यांचा विचार करता तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक होत नाहीत. तसेच सामनेवाले क्र.१ व २ आणि सर्व तक्रारदार यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे लाभधारक (Beneficiary) नाहीत. सामनेवाले क्र.१ व २ हे कंपनी उत्पादक किंवा विक्रेते नाहीत. सामनेवाले हे केवळ सभासद असल्याने त्यांना बियाणे लवकर व सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने, त्यांनी ते सामनेवाले क्र.३ यांचेकडून खरेदी केले आहे व सर्वच तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून ते वाटप करुन घेतलेले दिसत आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ ते ४ यांचे “ग्राहक” नाहीत.
या बाबत ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम २ (ड) प्रमाणे “ग्राहक” या व्याख्येचा विचार करणे योग्य होईल.
2(d) : “ Consumer” means any person who –
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buy such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) [hires or avails of] any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such services other than the person who [hires or avails of] the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person [but does not include a person who avails of such services for any commercial purpose]
सदर व्याख्येचा विचार करता कोणताही ग्राहक व विक्रेता यांच्यामध्ये खरेदी विक्री हा व्यवहार होणे आवश्यक आहे. परंतु प्रस्तुतच्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार हे या सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याबाबतचा पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाले यांच्यात, ग्राहक व विक्रेता असा नाते संबंध निर्माण झाला नसल्यामूळे या कायद्यांतर्गत तक्रारदार हे या सामनेवालेंचे “ग्राहक” होत नाहीत असे सिध्द होत आहे.
(६) सदरचा चौकशी अहवाल हा सामनेवाले क्र.४ यांनी चौकशी करुन तयार केलेला आहे. तसेच सदर अहवालाप्रमाणे सामनेवाले क्र.१ व २ यांना सामनेवाले क्र.३ यांनी बियाणे विक्री केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होत नाहीत. तसेच सामनेवाले क्र.१ व २ हे सामनेवाले क्र.३ व ४ यांचे ग्राहक आहेत असे अहवालात नमूद केले आहे. चौकशी प्रमाणे सामनेवाले यांनी नुकसान भरपाईची जबाबदारी स्वीकारुन प्रति पाकीट रु.१३,५००/- नुकसान भरपाई प्रमाणे अजय गोविंदराव माळी यांना धनादेश क्र.६०३५३५ अन्वये दि.११-०६-२०१० रोजी रक्कम रु.९,३१,५००/- व दाजभाअ निंबा भदाणे यांना धनादेश क्र.६०३५३६ अन्वये दि.११-०६-२०१० रोजी रक्कम रु.९,८५,५००/- अशा रकमा सेटलमेंट करतेवेळी दिलेल्या आहेत. सदरच्या रकमा या सामनेवाले क्र.१ व २ यांच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत. तसेच सदर अहवालामध्ये पुढे असे नमूद केले आहे की, सदर बियाणे विक्रेत्यांनी एकाच व्यक्तीच्या नांवे इतकी पाकीटे देणे योग्य नव्हते. बियाणे विक्रेत्याने घाऊक पध्दतीने शेतक-यास विक्री केलेली आहे. दोन्ही शेतक-यांचे नांवे असलेली जमीन बघता इतक्या मोठया प्रमाणात पाकीटे देणे योग्य नव्हते. तसेच नुकसान भरपाईची सर्व रक्कम देण्यात आलेली असून त्यासाठी अवलंबण्यात आलेली कार्यपध्दती ही योग्य नाही. या सर्व बाबीचा विचार करुन शेतक-यांच्या वतीने अजय गोविंदराव माळी व दाजभाअ निंबा भदाणे यांच्या विरुध्द दि.१३-०३-२०११ रोजी धुळे तालूका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. अशा आषयाचा मजकूर नमूद आहे.
या अहवालावरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले क्र.१ व २ हे सामनेवाले क्र.३ व ४ चे ग्राहक आहेत व सामनेवाले क्र.१ व २ यांनी खरेदी केलेल्या बियाण्याच्या लागवडीपासून झालेली नुकसान भरपाई ही सामनेवाले क्र.४ कंपनी यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांना अदा केलेली आहे. या बाबीचा विचार करता सामनेवाले क्र.३ व ४ यांनी नुकसान भरपाईची रक्कम देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द सदर तक्रारीस कारण राहिलेले दिसत नाही.
(७) चौकशी अहवाला प्रमाणे, तक्रारदारांना सामनेवाले क्र.१ यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. सदरची नुकसान भरपाईची रक्कम सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे जमा केली गेलेली आहे. यावरुन तक्रारदार यांना सदरची नुकसान भरपाई ही सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून वसुली करावयाची दिसत आहे. परंतु या कामी तक्रारदारांना या ग्राहक मंचात दाद मागता येणार नाही. कारण या ग्राहक मंचामध्ये केवळ सेवे बाबत किंवा एखाद्या वस्तू खरेदी बाबत तक्रारी असल्यास विक्रेत्याकडून त्या बाबतची नुकसानभरपाई मागण्याची तरतूद आहे. त्यामुळे सदर वाद विषया बाबत, तक्रारदार यांनी, त्यांना नुकसानभरपाई वसूल होऊन मिळण्याकामी योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागणे योग्य होईल असे आमचे मत आहे.
सदर तक्रार अर्जाचा विचार करता तक्रारदार यांनी सदर बियाण्यामध्ये दोष असल्याबाबत कोणताही पुरावा तसेच कृषि अधिकारी यांचा पंचनामा दाखल केलेला नाही. केवळ सामनेवाले क्र.१ व २ यांनी नुकसान भरपाई न दिल्याने सदराचा तक्रार अर्ज दाखल केलेला दिसत आहे. सदरची बाब ही योग्य व रास्त नाही असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करुन घेण्यास पात्र नाही.
(८) वरील सर्व कारणांचा विचार करता तक्रारदार क्र.१ ते ४७ हे सामनेवाले क्र.१ ते ४ यांचे “ग्राहक” नाहीत. या कायदेशीर मुद्याचा विचार करता सदरची तक्रार या मंचात दाखल करुन घेण्यास पात्र नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
(९) वरील सर्व बाबीचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
· तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल करुन घेण्याच्या मुद्यावर, रद्द करण्यात येत आहे.
धुळे.
दिनांकः ३०/०८/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)