नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 139/2010 नोंदणी तारीख – 15/5/2010 निकाल तारीख – 5/7/2010 निकाल कालावधी – 50 दिवस श्रीमती सुचेता मलवाडे, प्रभारी अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, प्रभारी अध्यक्ष न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री पोपटराव बाबूराव जाधव 2. सौ जनाबाई पोपटराव जाधव दोघे रा. 13, पवार कॉलनी, गेंडामाळ, शाहुपूरी, सातारा ----- तक्रारदार (वकील श्री आनंद कदम) विरुध्द 1. धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या. गेंडामाळ शाहुपूरी, सातारा तर्फे चेअरमन श्री हणमंतराव बाळासाहेब चवरे 2. चेअरमन, श्री हणमंतराव बाळासाहेब चवरे धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या. गेंडामाळ शाहुपूरी, सातारा 3. संस्थापक/अध्यक्ष, श्री बाळासाहेब कमलगिरी गोसावी धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या. गेंडामाळ शाहुपूरी, सातारा 4. व्यवस्थापक, श्री दिलीप रामचंद्र ताटे, धर्मवीर संभाजी सहकारी पतसंस्था मर्या. गेंडामाळ शाहुपूरी, सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेतील बचत खात्यामध्ये व आवर्त खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, बचत खात्यातील व आवर्त खात्यातील रक्कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे नि. 12 ते 15 ला दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 4 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि. 6 ते 8 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती व नि.9 कडे बचत खात्याचे व आवर्त खात्याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. तसेच नि.9 कडील बचत खात्याचे व आवर्त खात्याचे पासबुकाचे अवलोकन केले असता सदरच्या खात्यांमध्येही रक्कम शिल्लक असल्याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि.5 सोबतच्या नि. 6 ते 8 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात तसेच बचत व आवर्त खात्यातील शिल्लक रकमा नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासहित द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 4. जाबदार क्र. 4 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 4 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 4 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 4 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.0000965, 4033, 0001171, 0000750, 0000632, 0000870 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. बचत खाते क्र.1137/5/66 कडील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. आवर्त ठेव खाते क्र.984/5/109 कडील शिल्लक रक्कम आवर्त खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 5. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 6. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.5/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) सदस्य प्रभारी अध्यक्ष
| , | HONORABLE test, PRESIDING MEMBER | , | |