जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ०२/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ०९/०३/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/१०/२०१२
विनोदकुमार प्रकाशचंद बंन्सल .............. तक्रारदार
उ.वय-५३ वर्षे, धंदा – व्यापार
रा. १४-ब, सुगंधनगर, कोरकेनगर जवळ,
मालेगांवरोड, धुळे.
विरुध्द
१. दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे., ..…...... विरूध्द पक्ष
रा. चितळे हॉस्पीटल समोर, देवपूर, ता.जि. धुळे.
(समन्सची बजावणी मॅनेजर श्रीसंजय विठठल अमृतकर यांच्यावर करण्यात यावी)
२. संजय विठठल अमृतकर, मॅनेजर
दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,
रा. चितळे हॉस्पीटल समोर, देवपूर, ता.जि. धुळे.
३. रामचंद्र रघुनाथ पितृभक्त, पासींग ऑफीसर,
वय सज्ञान, धंदा – नोकरी,
दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,
रा. सानेगुरूजी हौसिंग सोसायटी, चितोडरोड, ता.जि. धुळे.
४. गणेश आनंदा सुर्यवंशी, टेलर,
वय सज्ञान, धंदा – नोकरी,
दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,
रा.चिंचेच्या झाडाजवळ, जुनेधुळे, ता.जि. धुळे.
५. देवीदास वामन शिनकर, चेअरमन/संचालक,
दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,
रा.मातृसदन, गल्ली नं.४, देनाबॅंकेच्या वर, ता.जि. धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एन.यु. लोखंडे)
(विरुध्दपक्ष तर्फे – एकतर्फा)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
मुदत |
देय दिनांक |
१९९५२ |
५७,२६४/- |
२१/०५/२००७ |
१३ महिने |
२१/०६/२००८ |
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष पतसंस्था हे मे. मंचाची नोटीस लागुनही हजर न झाल्याने यांच्याविरूध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांच्या तक्रारीचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्यांच्या झेरॉक्स प्रती सादर केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती ची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती तसेच त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती मध्ये रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीत गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतींची व्याजासह होणारी रक्कम दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे., व विरूध्द पक्ष क्र.२ ते ७ संचालक मंडळ यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment ofthe co-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे संचालक मंडळाला वैयक्तिक जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे., यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- व मानसिक त्रासापोटी रु.१०००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
९. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे.,यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावतीमधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतींचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
मुदत |
देय दिनांक |
१९९५२ |
५७,२६४/- |
२१/०५/२००७ |
१३ महिने |
२१/०६/२००८ |
३. दादासो वामन विष्णु शिनकर नागरी सहकारी पतपेढी मर्या.धुळे यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.