जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे
ग्राहक तक्रार क्रमांक – ७२/२०१३
तक्रार दाखल दिनांक – २२/०८/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १२/०४/२०१४
श्री.सुभाष शामराव पाटील - तक्रारदार
उ.व. ३५, धंदा – नोकरी
रा.६५ अ, रघुकुल नगर, टेलिफोन कॉलनी,
नंदुरबार,ता.जि.नंदुरबार.
विरुध्द
दादासाहेब शिवाजीराव कोंडाजी मराठे -सामनेवाले
नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,धुळे
नोटीसीची बजावणी चेअरमन यांच्यावर व्हावी
रा.मातोश्री प्लॉट नं.६३ अ,शिवशक्ती कॉलनी,
चितोड रोड,धुळे
रा.मातोश्री प्लॉट नं.६३ अ,शिवशक्ती कॉलनी,
चितोड रोड,धुळे
तडजोड निकालपत्र
- १) या मंचात कामकाज चालू असलेल्या उपरोक्त प्रकरणातील उभयपक्षांच्या विनंतीनुसार, दि.१२-०४-२०१४ रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतमध्ये सदर प्रकरण ठेवण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणी वाद विषया बाबत, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात आपसात सामंजस्याने तडजोड झाली आहे. सदर तजडजोड पुरसीस नि.नं.१५ वर दाखल असून, त्यातील मजकूर दोन्ही पक्षकारांनी मान्य केलेला आहे. तसेच त्यावर उभयपक्षांच्या स्वाक्षरी आहेत. उभयपक्षात लोकन्यायालय प्रमुख व लोकन्यायालयाचे सदस्यांसमक्ष सामंजस्याने ठरलेल्या तडजोडीच्या अटी खालीलप्रमाणे आहे.
तडजोडीच्या अटी
- तक्रारदार यांची बचत खात्यातील जमा रक्कम दरमहा २० तारखेपर्यंत तक्रारदार यांच्या खात्यात जमा करणेत येईल. (दरमहा रु.५०००/-) रुपये मात्र. देणेस पतसंस्था (जाबदेणार तयार आहेत)वरील अटीचा भंग झाल्यास तक्रारदारांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार राहिल.
(२) उपरोक्त तडजोड पुरसीसचे अवलोकन करता, उभयपक्षात सामंजस्याने तडजोड झाली असून तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही असे दिसून येते. सबब तडजोड पुरसीसला अनुसरून पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातील एकूण जमा रकमेपैकी, रक्कम ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) दरमहा वीस तारखेचे आत, या प्रमाणे संपूर्ण रक्कम तक्रारदारांच्या खात्यात जमा करावी.
(ब) सामनेवाले यांनी, उपरोक्त आदेश “अ” ची पुर्तता मुदतीत न केल्यास, तक्रारदार सामनेवाले यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायद्यान्वये वसुली अर्ज दाखल करु शकतील.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे