(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे, अध्यक्ष,(प्रभारी))
1. अर्जदाराने, सदर दरखास्त ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25(3) अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराने, गैरअर्जदाराचे विरुध्द ग्राहक तक्रार क्र. 14/2007 दाखल केली. सदर तक्रारी मध्ये अंतिम आदेश 3 जानेवारी 2008 ला पारीत करुन तक्रार मंजुर करण्यात आली. गैरअर्जदाराने, पारीत केलेल्या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे गैरअर्जदाराची जंगम मालमत्ता जप्तकरुन आदेशानुसार एकुण रुपये 15,904/- व कविता संग्रहाची मुळ हस्तलिखीत मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराची दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदारास नोटीस तामील होऊनही हजर झाला नाही.
... 2 ... चौ.अ.क्र. 3/2008.
3. अर्जदाराने, निशाणी 6 नुसार अर्ज दाखल करुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 अंतर्गत गैरअर्जदारावर कार्यवाही करण्यात यावी आणि दिनांक 3/1/2008 चे आदेशाचे पालन केले नाही, तसेच गैरअर्जदार न्यायमंचात हजर झाले नाही. त्यामुळे, गैरअर्जदारावर कलम 27 नुसार कार्यवाही करण्यात यावी. सदर अर्ज पूर्वा अध्यक्षानी दिनांक 15/5/2008 ला अर्ज मंजुर केला. त्यानुसार गैअर्जदाराचे विरुध्द जमानती वॉरंट काढण्यात आला. गैरअर्जदार हा दरखास्त न्यायप्रविष्ठ असतांनाच दिनांक 16/9/2008 ला मृत झाल्याचा, पोलीस स्टेशन हडपसर, पुणे यांनी अहवाल सादर केला, तो निशाणी 20 व 22 वर आहे. सदर अहवालानुसार गैरअर्जदार हा मृत झाला असल्यामुळे, त्याचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 ची कार्यवाही ही अबेट झाली आहे.
4. अर्जदाराने, दरखास्तमध्ये गैरअर्जदार मृत्यु झाला असल्यामुळे, त्याची वारस पत्नी हिला गैरअर्जदार म्हणून जोडण्याची परवानगी मिळावी असा अर्ज केला. परवानगी देऊन नोटीस काढण्यात आला, परंतु ती हजर झाली नाही. अर्जदाराने आपले दरखास्त सोबत, गैरअर्जदार यांचे कार्यालयातील कॉम्प्युटर्स, फर्निचर, वाहन व जप्तीचे वेळेस मिळून येणारे कार्यालयातील इतर साहित्य जप्त करुन, आदेशानुसार रक्कम वसूल करण्यात यावी. जंगम जप्तीची यादी निशाणी 5 वर दाखल आहे.
5. अर्जदाराने, ग्राहक तक्रार क्र. 14/2007 आदेश दि. 3/1/2008 च्या आदेशानुसार साहित्य कला याञी भवन, केशव नगर, मुंढवा, पुणे या कार्यालयातील मालमत्ता जप्त करुन, आणि मृतकाने सोडलेली मालमत्ता जप्त करुन आदेशानुसार रक्कम मिळवून देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ती मागणी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 (3) नुसार मंजुर करण्यास पाञ आहे. गैरअर्जदार मृतकाचे विरुध्द आदेश पारीत होऊनही, आदेशाचे फळ अर्जदारास मिळालेला नाही व ती कागदोपञी आदेश (पेपरडीग्री) फक्त राहीलेली आहे. अर्जदारास, आदेशानुसार रक्कम मिळण्याकरीता ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 नुसार कारवाई होणे आवश्यक आहे. गैरअर्जदार दादासाहेब लोणकर याचा मृत्यु झालेला आहे. परंतु, प्रकाशन कार्यालय अस्तित्वात असून, वसूलीची कारवाई करुन, मृतक गैरअर्जदार यांची चल अचल मालमत्ता जप्त करुन, आदेशाचे पालन होणे न्यायोचीत होईल. याकरीता, गैरअर्जदार यांची मालमत्ता जिल्हाधिकारी पुणे यांनी जप्तीची कारवाई करुन, अर्जदारास आदेशीत रक्कम मिळवून द्यावे. त्याकरीता, रिकव्हरी प्रमाणपञ जिल्हाधिकारी पुणे यांना पाठविण्यात यावे, असे या न्यायमंचाचे मत आहे. याच आशयाचे मत मा. तामीलनाडू राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी, एस.एच. विजयानथी –विरुध्द – ए.बी.अनंथा पद्मनाथन (मृतक) व इतर, 1(2009)-सी.पी.जे.215, या प्रकरणात दिले आहे. सदर न्यायनिवाडयात दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागू पडतो, त्यातील महत्वाचा भाग खालीलप्रमाणे.
(i) Consumer Protection Act, 1986 -- Sections 25 and 27 --- Execution of Order--- Penalties – Power conferred upon Section 27, penal in nature—
... 3 ... चौ.अ.क्र. 3/2008.
Cannot be exercised by decree holder against legal heirs of deceased judgment debtor – Section 25, in nature of civil process, empowers redressal agencies to issue recovery certificate for recovery of amount due --- Sole judgment debtor died—Procedure under Section 25 can be invoked – Applicant entitled for recovery certificate to proceed against estate of deceased judgment debtor.
S.H. Vijayanthi
-V/s.-
A.B. Anantha Padmanaban (Deceased) & Ors.
Tamil Nadu State Consumer Disputes Redresal Commission, Chennai.
1(2009) CPJ 215
****** ****** ****** ******
6. प्रस्तुत प्रकरणात दिनांक 3/1/2008 च्या आदेशाचे पालन होण्याकरीता, गैरअर्जदार यांचे कार्यालयातील संगणक, फर्नीचर, वाहन इत्यादी साहित्य शेतसारा वसूली कारवाई प्रमाणे (as a revenue recovery) जप्ती करुन, आदेशीत रक्कम जिल्हाधिकारी पुणे यांनी अर्जदारास मिळवून देणे क्रमप्राप्त आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे, अर्जदाराची दरखास्त ग्राहक संरक्षण कायद्याचे 25 नुसार मंजूर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची दरखास्त मंजूर.
(2) प्रबंधक यांनी या आदेशाची प्रत, ग्राहक तक्रार क्र. 14/2007
आदेश दिनांक 3/1/2008 ची प्रत आणि दरखास्त अर्जाची
प्रत जिल्हाधिकारी पुणे यांना वसूली कारवाईकरीता पाठविण्यात
यावे.
(3) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :–22/07/2009.