द्वारा: मा. सदस्या: श्रीमती. एस. ए. बिचकर, // नि का ल प त्र // 1) सदरची तक्रार तक्रारदाराने जाबदार यांचे विरुध्द त्यांनी जाबदार यांचेकडून खरेदी केलेला कॉर्डलेस सेट खराब लागल्याने बदलून मिळणेसाठी किंवा खरेदी केलेल्या कॉर्डलेस सेटचे पैसे 18 % व्याजाने परत मिळणेसाठी तसेच मानसिक त्रासापोटी व जाणेयेणेचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2) तक्रारदाराची तक्रारच थोडक्यात अशी की, तक्रारदाराने जाबदार यांचे दुकानामधून दि;13/7/2001 रोजी नोकीया-6150 कंपनीचा कॉर्डलेस सेट रक्कम रु.5,500/- चा किंमतीस खरेदी केलेला आहे. परंतु कॉर्डलेस खरेदी केल्यापासून तो चालूस्थितीत नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने लगेचच जाबदार यांचे दुकानात जाऊन त्याबाबत कळविले. त्यावेळेस जाबदार यांनी तक्रारदार यांना किरकोळ दुरुस्ती आहे व कॉर्डलेस ठेवून घेतला. दुरुस्ती करुन देऊ असे सांगीतले. अंदाजे 4 ते 5 दिवसांनी तक्रारदार हे जाबदार यांचे दुकानात जावून कॉर्डलेस सेट आणण्यास गेल्यावर जाबदार यांनी चेक करण्यास अटीना नाही. घरी गेल्यावर जोडून पहा व्यवस्थीत चालेल असे सागीतले. त्या प्रमाणे तक्रारदार यांनी घरी आल्यावर जोडून पाहिल्यावर तो बंद स्थितीतच होता. 3) तक्रारदार हे पुन्हा जाबदांर यांचेकडे कॉडलेस सेट घेऊन गेले असता त्यांनी हयांड सेट रिंग कट होत नाही. म्हणून खोलून पाहिले असता 10 किलो मीटर पर्यंत रेंज मिळेल असे सांगीतले. परंतु तरीही कॉर्डलेस सेट चालू होत नव्हता. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वरचेवर जावून कॉर्डलेस सेट बदलून देणेसाठी विनंती केली. परंतु जाबदार यांनी बदलून दिला नाही म्हणून तक्रारदार यांनी दिनांक 29.09.2001 रोजी जाबदार यांना पत्र पाठविले. तरीही जाबदार यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदरची तक्रार जाबदार यांचे विरुध्द दाखल करणे भाग पडत आहे. तक्रारदाराने क्रारी सोबत शपथपत्र तसेच जाबदार यांचेकडून कॉडलेस सेट खरेदी केलेल्याची पावती, (निशाणी- 3/1) इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 4) मंचाने जाबदार यांना दिनांक 22.07.2010 रोजी निशाणी – 6 ने नोटीस पाठविली असता दिनांक 31.07.2010 रोजी निशाणी – 7 ला जाबदार यांना नोटीस मिळाल्याची पोष्टाची पोहच पावती मंचास प्राप्त झालेली आहे. जाबदार यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचे म्हणणे , शपथपत्र दाखल केले नाही. म्हणून मंचाने दिनांक 27.09.2010 रोजी निशाणी – 1 वर जाबदार यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित केलेला आहे. 5) मंचाने तक्रारदारांचे शपथपत्र व दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोन केले असता मंचाचे विचारार्थ खालील मु्द्ये – मुद्ये उत्तरे 1) जाबदार यांनी तक्रारदार यांना : दिलेल्या सेवेमध्ये त्रृटी आहे काय : अंशत: आहे. 2) आदेश : अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणमिमांसा:
6) तक्रारदाराने जाबदार यांचेकडून दिनांक 13.07.2001 रोजी रक्कम रु. 5500/- या किंमतीस नोकीया – 6150 कॉर्डलेस सेट खरेदी केलेला आहे. खरेदी केलेल्याची पावती नं. 473 तक्रारदाराने तक्रारी सोबत निशाणी - 3/1 ने दाखल केलेली आहे त्यावरुन सिध्द होते. 7) तक्रारदाराने जाबदार यांचेकडून खरेदी केलेला कॉडलेस सेट हा खरेदी केल्या पासून चालू स्थितीत नव्हता. जाबदार यांनी तक्रारदार यांना 1 ते 2 वेळा कॉडलेस सेट तात्पूरता दुरुस्त करुनही दिला. परंतु घरी आणल्यानंतर तो पुन्हा बंद पडत होता. त्यासाठी तक्रारदार यांनी जाबदार यांना अनेकवेळा लेखी व तोंडी कळविले. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांची दखल घेतली नाही. 8) मंचाने जाबदार यांना दिनांक 22.07.2010 रोजी निशाणी – 6 ने नोटीस पाठविली असता जाबदार यांना दिनांक 31.07.2010 रोजी निशाणी – 7 ने नोटीसही मिळाली. असे असता नाही जाबदार हे मंचात हजर राहीले नाहीत व त्यांनी त्यांचे म्हणणे, शपथपत्र दाखल केले नाही. त्यामुळे जाबदार हे तक्रारदारांची तक्रार नाकारु शकत नाहीत हे स्पष्ट होते. 9) तक्रारदार हे जाबदार यांचेकडे अनेक वेळा जाऊनही त्यांनी कॉडलेस सेट व्यवस्थीत दुरुस्त करुन दिला नाही व बदलुनही दिला नाही ही जाबदार यांची ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2(1) (ग) प्रमाणे सेवेतील त्रृटी ठरते आणि म्हणूनच तक्रारदार हे जाबदार यांचेकडून त्यांनी खरेदी केलेल्या कॉडलेस सेट ची रक्कम रु. 5,500/- ही 7 % व्याजाने मिळण्यास हक्कदार ठरतात. तसेच तक्रारदार यांनी जाबदार यांना त्यांनी खरेदी केलेला नोकीया – 6150 कॉडलेस सेट परत दयावा व त्यानंतर जाबदार यांनी तक्रारदार यांना सदर कॉडलेस सेटची रक्कम रु. 5,500/- ही 7 % व्याजाने दयावी या निर्णयाप्रत मंच आलेले आहे. 10) तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- नुकसानभरपाई मागीतलेली आहे. परंतु एकदा रक्कम व्याजासहीत दिलेली असल्यास वेगळी नुकसानभरपाई देणेची आवश्यकता नाही. त्यासाठी मंच खालील निवाडयाचा आघार घेत आहे. ( “ Skipper Bhavan V/S Skipper scales Pvt.Ltd. 1995, CPJ,210, (NC) वरील सर्व विवेंचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारित करत आहे. // आ दे श // 1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते. 2) जाबदार यांनी तक्रारदार यांना कॉडलेस सेटची रक्कम रु. 5,500/- (रु. पाच हजार पाचशे) ही 7 % व्याजाने तक्रार दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 14.01.2002 पासून ते रक्कम अदा करे पर्यंन्त दयावी. व त्यानंतर तक्रारदाराने जाबदारांस त्यांचेकडून खरेदी केलेला नोकीया 6150 कॉडलेस सेट परत दयावा. 3) जाबदार यांनी तक्रारदार यांनी तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- ( रु. पाचशे) अदा करावी. 4) वर नमुद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांने निकालपत्राची प्रत मिळाले पासून तीस दिवसांचे आत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. 5) निकालपत्राच्या प्रती दोन्ही बाजूना नि:शुल्क पठवाव्यात. |