Maharashtra

Gadchiroli

CC/6/2014

Gurudev Mahadev Chaple - Complainant(s)

Versus

D.D.Kantode Branch Manager Gachiroli Dist. Co. Bank and other one - Opp.Party(s)

26 Nov 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli, M.I.D.C. Road, T - Point, Navegaon, Tah. Dist. Gadchiroli, Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/6/2014
 
1. Gurudev Mahadev Chaple
At Adpalli, Post. Gogao, Ta. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. D.D.Kantode Branch Manager Gachiroli Dist. Co. Bank and other one
The Gachiroli District Central Co-opp. Bank Ltd. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
2. Shri. Satish Ayalwar, Chief Executive Officer
The Gadchiroli District Central Co.Opp. Bank Ltd.Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्‍यक्ष)

(पारीत दिनांक : 26 नोव्‍हेंबर 2014)

                                      

                  अर्जदार यांनी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदार यांनी दि गडचिरोली जिल्‍हा मध्‍यवर्ती सह.बँक लि., मख्‍य कार्यालय गडचिरोली यांचेकडून नविन घर बांधणी करीता ‘गृहकर्ज योजना’ अंतर्गत रुपये 5,00,000/- चे दि.8.11.2008 ला कर्ज घेतले. मा.शाखाधिकारी अमिर्झा यांनी दि.14.8.2009 पासून कर्जाची वसुली मासीक हप्‍ता रुपये 5350/- प्रमाणे नियमित कपात अर्जदाराचे खाते क्र.3184 मधून करण्‍यात आले. गृहकर्ज खात्‍याची चौकशी केली असता व्‍याजात अधिक रक्‍कम वसुल केल्‍याचे आढळले. त्‍यानुसार शाखाधिकारी अमिर्झा यांनी मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्र.कार्या. गडचिरोली यांना दि.2.8.2013 ला गृहकर्जावरील जादा वसुल केलेल्‍या व्‍याजाबाबत पञ पाठविले. त्‍यानुसार, डेलीप्रॉडक्‍टसने वसुल केलेले व्‍याज आणि मासिक हप्‍त्‍यानुसार येणारे व्‍याज यातील फरकाची रक्‍कम रुपये 80,163/- खर्चाला नावे टाकून गृहकर्ज खात्‍याला जमा करण्‍याकरीता परवानगी देण्‍याबाबत पञ पाठविले. या पञावर कोणतीही कार्यवाही केली नाही. दि.4.10.2013 ला त्‍यांचेकडे चौकशी केली व बॅलेनशीटची मागणी केली असता ती दिली नाही. अर्जदार यांनी गृहकर्ज बंद करण्‍याचा निर्णय घेतला, त्‍यानुसार दि.11.6.2013 ला शाखाधिकारी अमिर्झा यांचेकडून कर्ज असल्‍याचे प्रमाणपञ घेतले व गृहकर्ज परतफेडीकरीता भविष्‍य निर्वाह निधी पथक गडचिरोली यांना प्रस्‍ताव सादर केले.   गृहकर्ज परतफेड करण्‍याकरीता रुपये 3,50,000/- मंजूर होऊन दि.10.7.2013 ला खात्‍यात जमा करण्‍यात आले. घेतलेले कर्ज व्‍याजासह परत केल्‍यामुळे कर्ज नसल्‍याचे प्रमाणपञ मिळण्‍याबाबत व खात्‍यातुन हप्‍त्‍याची वसुली न करण्‍याबाबत कळविले व सोबत हिशोबाचे विवरण जोडून सादर केले. अर्जदाराने कर्जापोटी एकूण रुपये 6,28,850/- गैरअर्जदाराकडे जमा केले.  बँकेने दि.4.12.2013 ला अर्जदाराचे खात्‍यातून रुपये 65,369/- वसूल केले, तसेच दि.11.12.2013 ला रुपये 11,408/- अतिरिक्‍त व्‍याजाची रक्‍कम म्‍हणून गृहकर्ज खात्‍यात जमा करुन खाते निरंक केले.  गैरअर्जदारामुळे अर्जदारास मानसिक व शारीरिक ञास होत आहे. त्‍यामुळे, गैरअर्जदाराकडून अर्जदारास दावा रक्‍कम रुपये 65,611/- व्‍याजासह देण्‍याबाबत गैरअर्जदाराला निर्देश द्यावे. अर्जदारास शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- देण्‍यातबाबत गैरअर्जदाराला निर्देश द्यावे, अशी प्रार्थना केली. 

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.7 नुसार लेखी उत्‍तर व नि.क्र.8 नुसार 3 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.

 

3.          गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.7 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात अर्जदाराची बहुतांश तक्रार अमान्‍य केली.  गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लेखी बयाणातील विशेष कथनात पुढे नमूद केले की, अर्जदाराने गृहकर्ज रुपये 5,00,000/- पंधरा वर्षाचे मुदतीकरीता द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजाने घेतले.  कर्जाची परतफेड मासिक हप्‍ता एकूण रुपये 5,350/- प्रमाणे होते.  अर्जदाराने सदर रकमेची परतफेड मासिक हप्‍त्‍यानुसार 15 वर्षे म्‍हणजेच 180 महिण्‍यात करावयास पाहिजे होती. परंतु, अर्जदाराने कर्जाची परतफेड 50 महिण्‍यात केलेली आहे.  त्‍यामुळे व्‍याजाची तफावतीची रक्‍कम ही डेली प्रॉडक्‍टनुसार करुन खाते बंद करण्‍यात आले.  अर्जदाराकडून एकूण व्‍याज रुपये 2,05,619/- वसुल करण्‍यात आले.  परंतु, डेली प्रॉडक्‍टनुसार रुपये 1,94,211/- वसुल केले व अर्जदारास रुपये 11,408 परत दिलेले आहे.  डेली प्रॉडक्‍टनुसार जेवढे दिवस कर्ज बाकी बँकेत होती तेवढया दिवसावर 10 टक्‍के दराने व्‍याज आकारलेले आहेत.  अर्जदाराने कर्जाची परतफेड 50 महिण्‍यात केल्‍याने गैरअर्जदार बँकेस व्‍याजाचे रकमेत नुकसान होते.  बँकेने प्रचलीत डेली प्रॉडक्‍ट पध्‍दतीने अर्जदाराकडून व्‍याज वसुल करण्‍यात आले.  कर्जाची वसुली नियमानुसार करण्‍यात आलेली आहे.  गैरअर्जदाराने कुठलीही अतिरिक्‍त रक्‍कम अर्जदाराकडून घेतलेली नाही.  अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.

 

4.          अर्जदाराने नि.क्र.9 नुसार पुरसीस, नि.क्र.16 सोबत 4 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज व नि.क्र.13 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केले.  गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.11 नुसार 5 व नि.क्र.15 नुसार 1 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज व नि.क्र.14 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                   :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?           :  होय  

 

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2  ने अर्जदाराप्रती न्‍युनतापूर्ण       :  होय

सेवा दिली आहे काय ?

 

3)    गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्‍यवहार पध्‍दती             :  होय

अवलंबीली आहे काय ?

 

4)    अंतीम आदेश काय ?                              : अंतिम आदेशाप्रमाणे

 

                                                      

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-  

 

5.          अर्जदार यांनी दि गडचिरोली जिल्‍हा मध्‍यवर्ती सह.बँक लि., मख्‍य कार्यालय गडचिरोली यांचेकडून नविन घर बांधणी करीता ‘गृहकर्ज योजना’ अंतर्गत रुपये 5,00,000/- चे दि.8.11.2008 ला कर्ज घेतले. मा.शाखाधिकारी अमिर्झा यांनी दि.14.8.2009 पासून कर्जाची वसुली मासीक हप्‍ता रुपये 5350/- प्रमाणे नियमित कपात अर्जदाराचे खाते क्र.3184 मधून करण्‍यात आले, ही बाब दोन्‍ही पक्षांना मान्‍य असून अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होत आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-   

 

6.          अर्जदाराने गृहकर्ज म्‍हणून रुपये 5,00,000/- पंधरा वर्षाचे मुदतीकरीता द.सा.द.शे.10 टक्‍के व्‍याजावर कर्ज घेतले होते त्‍याचा मासिक हप्‍ता रुपये 5,350/- याप्रमाणे होते.  परंतु, अर्जदाराने कर्जाची परतफेड 50 महिण्‍यात केली आहे.  अर्जदाराकडून एकूण व्‍याज रुपये 2,05,619/- गैरअर्जदाराने वसुल केले आहे.  ही बाब, गैरअर्जदाराला मान्‍य आहे.  गैरअर्जदाराने सदर व्‍याज डेली प्रॉडक्‍टनुसार अर्जदारावर लावलेला आहे.  त्‍याप्रमाणे गैरअर्जदाराने जेवढे दिवस कर्ज बाकीचे मुदत होती तेवढया दिवसांवर 10 टक्‍के दराने व्‍याज आकारले आहेत व त्‍या आकारलेल्‍या व्‍याजावर अर्जदारापासून व्‍याज वसुल करण्‍यात आले, ही बाब गैरअर्जदारास मान्‍य आहे.  सदर व्‍याज कर्जाचे नियमानुसार आकारण्‍यात आले होते ही बाब सिध्‍द करण्‍याकरीता गैरअर्जदाराने कोणत्‍याही साक्षीपुरावा किंवा दस्‍ताऐवज सदर प्रकरणात दाखल केलेले नाही.  तसेच गैरअर्जदाराने सदर व्‍याजाची रक्‍कम कोणत्‍या आधाराने डेली प्रॉडक्‍टनुसार व्‍याज आकारुन अर्जदाराकडून वसुल करण्‍यात आले, ही बाब सुध्‍दा गैरअर्जदार सदर प्रकरणात स्‍पष्‍ट करु शकले नाही.   गैरअर्जदाराने नि.क्र. 15 वर भारतीय रिजर्व बँकेनी काढलेला दि.1 जुलै 2013 चे पञ व त्‍यासोबत लावलेले नियम क्र.4.2 A & B  याची पडताळणी करतांना असे दिसले की, कोणतीही बँक कर्जदाराकडून अवधीपूर्वी कर्ज परत करण्‍याबाबत कोणतेही शुल्‍क किंवा दंड घेऊ शकत नाही.  तसेच कर्ज घेणा-या ग्राहकाकडून व्‍याज आकारण्‍याचा निर्णय त्‍या बँकेच्‍या बोर्डाकडे अधिकार क्षेञ आहेत व त्‍यावर निर्णय घेऊन कर्जदारांकडून त्‍या व्‍याजदरावर कर्ज देवून वसुल करण्‍याचे प्रावधान आहे.  सदर प्रकरणात गैरअर्जदाराने अर्जदाराला लावलेले अतिरिक्‍त व्‍याज व कर्जाची परतफेड अवधीपूर्वी केल्‍यामुळे डेली प्रॉडक्‍ट पध्‍दतीने व्‍याज लावून अर्जदारापासून वसुल करण्‍यात आले. याबाबतचा कोणताही सदर बँकेच्‍या बोर्डाचा निर्णय सदर प्रकरणात दाखल केलेला नाही.  गैरअर्जदाराने अर्जदाराला डेली प्रॉडक्‍ट पध्‍दतीने व्‍याज आकारुन व अर्जदारापासून वसुल करुन अनुचीत व्‍यवहार पध्‍दतीची अवलंबना केली आहे व अर्जदाराप्रती न्‍युनतम सेवा दर्शविली आहे, असे सिध्‍द होत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  

                       

 

 

मुद्दा क्रमांक 4 बाबत :-  

 

7.          मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.       

                 

अंतिम आदेश  -

 

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.  

 

(2)   गैरअर्जदाराने अर्जदारापासून घेतलेली अतिरिक्‍त व्‍याजाची रक्‍कम रुपये 65,611/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.

 

(3)   गैरअर्जदाराने अर्जदाराला झालेल्‍या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 2500/-  आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.

 

(4)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी. 

 

     

गडचिरोली.

दिनांक :-26/11/2014 

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.